या राजाने ब्रिटीशांना सलाम ठोकण्याची पद्धत बंद केली…

तुमच्या घरात एखादा अन्याय होत असेल तर तुम्ही काय कराल..?

कदाचित तुम्हाला त्यात चुक अशी काहीच वाटणार नाही, कदाचित तुम्ही शांत बसाल, कदाचित कुटूंबातील व्यक्तींना समजून सांगण्याचा प्रयत्न कराल, अतीच वाटत असेल तर पोलीस केस कराल..

या माणसाच्या घरात देखील एक चुकीची गोष्ट घडली होती, पण या माणसाने संपूर्ण भारतातून ती चुकीची आणि अनिष्ट प्रथा बंद करुन टाकली. ती पद्धत होती ती सतीप्रथा. स्वत:च्या घरात आपल्या वहिनीला सती जाताना त्याने पाहिले व त्यानंतर सतीप्रथेविरोधात आवाज बुलंद केला. त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे भारतातून सतीप्रथा पद्धत बंद झाली.

बंगालच्याच नव्हे तर भारताच्या सुधारणावादी लोकांमध्ये ज्यांच नाव सर्वात पहिला घेतलं जातं ते म्हणजे राजा राममोहन रॉय. त्यांनी सतीप्रथाच नव्हे तर बालविवाह आणि विधवा पुर्नविवाहाला देखील चालना दिली.

अशा या राजा राममोहन राय यांचे पाच किस्से…

१. आई आणि वडील वेगवेगळ्या पंथाचे

राजा राम मोहन राय यांची आई शैव पंथाची होती तर वडील वैष्णव पंथाचे होते. या दोन्ही पंथात त्या काळात प्रचंड विरोध होता. असे असूनही त्यांचे लग्न झाले होते. थोडक्यात घरातून प्रथा, परंपरांना मुठमाती देण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र असे असले तरी सनातनी कट्टर हिंदू प्रथा परंपरांना राजा राम मोहन रॉय यांच्या घरातल्यांचा विरोध होता असे नव्हते.

२. आईच्या विरोधात जावून सुधारणा घडवून आणल्या

समाजाच्या विरोधात जाणे, लोकांच्या विरोधात जाणे याहून अधिक अवघड गोष्ट असते ती आपल्या घरातल्यांच्या विरोधात जाण्याची. राजा राम मोहन रॉय हे त्यांच्या आईच्या सर्वात जवळ होते.

त्याच सोबत त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी देखील त्यांना आईसमान होती. एका वेळ अशी आली की राजा राम मोहन राय यांना इंग्लडला जावे लागले. इंग्लडवरून आल्यानंतर त्यांना समजलं की त्यांच्या भावाचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची वहिनी सती गेली आहे. चौकशी केल्यानंतर वहिनीची सती जाण्याची इच्छा नव्हती पण गाववाल्यांनी तिला जबरदस्ती सती जाण्यास भाग पाडल्याची माहिती त्यांना समजली.

त्यानंतर त्यांनी सती प्रथेचा विरोध करण्यास सुरवात केली. त्यासाठी आंदोलन उभा केलं. हिंदू परंपरा व प्रथांविरोधात आक्रमकपणे बोलण्यास सुरवात केली.

त्यांच्या या वागणुकीवर आई प्रचंड नाराज झाली पण आईचा विरोध न जुमानता त्यांनी सतीप्रथेला विरोध कायम ठेवला.

३. मुलाच्या मृत्यूच्या बातमीचा देखील त्यांच्यावर फरक पडला नाही..

अशी मान्यता होती की राजा राम मोहन रॉय यांच्याकडे ब्रह्मज्ञान आहे. त्यांना सर्व गोष्टी आधीपासूनच माहिती असतात. याच गोष्टींची खात्री करण्यासाठी राजा राम मोहन राय यांच्या दोन मित्रांनी एक युक्ती केली.

त्यांनी राजा राम मोहन राय यांना पत्र पाठवून त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी त्यांच्यापर्यन्त पोहचवली. ही बातमी वाचून ते कसे व्यक्त होतात हे त्यांना पहायचं होतं. राजा राम मोहन राय यांनी ते पत्र वाचलं पण नंतर काहीच झालं नसल्याप्रमाणे शांतपणे आपलं काम करत राहिले.

या प्रकारानंतर त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. वास्तविक राजा राम मोहन राय यांच्याकडे मनावर ताबा ठेवण्याची अचाट शक्ती होती. पण त्यामध्ये आपल्या कामाबद्दलची एकाग्रता होती न की अलौकिक शक्ती वगैरे.

४. ब्रिटीशांना सलाम ठोकण्याची प्रथा त्यांच्यामुळे बंद झाली..

पूर्वी प्रत्येक सामान्य भारतीय माणसाला ब्रिटीश व्यक्ती दिसल्यानंतर त्याला सलाम ठोकावा लागे. प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट बंधनकारक होती. अस केलं नाही तर त्यासाठी शिक्षेची तरतुद देखील करण्यात आली होती.

एक दिवस राजा राम मोहन राय रस्त्यातून जात असताना त्यांच्या समोर कलकत्ता चे कलेक्टर सर फेड्रिक हैमिल्टन आले. समोर येवूनही राजा राम मोहन राय यांनी सलाम न ठोकल्याचा कलेक्टर साहेबांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी राजा राम मोहन राय यांना अडवून त्याचा जाब विचारला.

या घटनेनंतर राजा राम मोहन राय यांनी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड मंटो यांच्याशी पत्रव्यवहार केला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मंटोने ही प्रथा नष्ट करुन टाकली.

Leave A Reply

Your email address will not be published.