सरदेसाई म्हणाले क्रिकेटर व्हायला टॅलेंट लागतं, पत्रकार व्हायला टॅलेंट लागत नाही

एकेकाळी आयबीएनचे संपादक असलेले आणि सध्या आज तकवर दिसणारे सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई. भारतात न्यूज चॅनलची संस्कृती रुजवण्याचा यांचा मोठा हात मानला जातो.

पण तुम्हाला ठाऊक आहे का, राजदीप सरदेसाई यांच खरं स्वप्न भारतीय क्रिकेट टीममध्ये सामील होण्याचं होतं.

राजदीप यांचे वडील म्हणजे दिलीप सरदेसाई हे एकेकाळी भारतातील सर्वश्रेष्ठ फलंदाजापैकी एक होते. ते मूळचे गुजराती पण वाढले गोव्या मध्ये. मुंबईमध्ये कॉलेजमध्ये शिकताना त्यांच्यातील गुणवत्ता हेरली गेली आणि ते क्रिकेटकडे वळले.

मुंबईसारख्या बलवान टीमकडून खेळण्याची दिलीप सरदेसाई यांना संधी मिळाली. तिथे जबरदस्त कामगिरी केल्यावर ते भारताकडूनही खेळले.

IMG 20200524 205526

दिलीप सरदेसाई स्पिनर विरुद्ध आपल्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध होते.

एकदा वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेले असता दिलीप सरदेसाई यांना तिथल्या विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवलं व तुमच्या जवळ काय आहे असं विचारलं, तेव्हा ते म्हणाले,

‘I have come here with runs’ and I’ll go back with more’.

ज्या काळी वेस्ट इंडियन बॉलर्सना खेळताना जग घाबरायचं त्याकाळी दिलीप सरदेसाई तिथल्याच भूमीत जाऊन असले डायलॉग मारायचे. नुसता डायलॉग मारायचे नाहीत तर खरोखर धावा सुद्धा बनवायचे.

त्या सिरीजमध्ये त्यांनी साडे सहाशे धावा ठोकल्या जो की एक विक्रम होता. त्यात त्यानी एक डबल सेंच्युरीदेखील तडकवली होती. त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर भारताने विंडीजवर पहिला कसोटी विजय मिळवला.

विजय मर्चंट यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा खेळाडू म्हणजे दिलीप सरदेसाई.

अशा या महान क्रिकेटरचा मुलगा असल्यामुळे राजदीपला सुद्धा आपण महान क्रिकेटर बनू अस स्वप्न पडायचं. तो शालेय लेव्हल वर चांगलं खेळायचा देखील. मुंबईत असताना राजदीप आपल्या शाळेचा क्रिकेटचा कॅप्टन होता.

दिलीप सरदेसाई यांनी देखील राजदीपला जगातील सगळ्यात महागडी बॅट, क्रिकेटिंग किट आणून दिला होतं. मुंबईच्या मोठ्या क्लब मध्ये तिथल्या कोच कडे तो शिकत होता, शिवाय वडील देखील मार्गदर्शन करण्यासाठी होतेच.

राजदीप अभ्यासात देखील हुशार होता.

मुंबईच्या झेव्हीअर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्राची डिग्री मिळवल्यावर त्याने इंग्लंडमधील सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लॉ स्कुलमध्ये प्रवेश मिळवला.

दिलीप सरदेसाई आपल्या मुलावर खुश होते. ऑक्सफर्ड जगातली सर्वोत्तम युनिव्हर्सिटी तर होतीच पण त्याशिवाय त्याला इंग्लिश कौंटी क्रिकेट खेळायला मिळेल, तिथलं स्पर्धात्मक वातावरणात शिकता येईल ही देखील अपेक्षा होती.

शिवाय ऑक्सफर्डमध्ये शिकलेले भारताचा टायगर पतौडी, पाकिस्तानचा इम्रान खान यांचा वारसा चालवण्याची संधी राजदीपला मिळेल अशी देखील त्यांची सुप्त इच्छा होती.
राजदीपने आपल्या कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये चांगलं नाव कमावलं,

त्याच विद्यापीठाच्या टीममध्ये सिलेक्शन देखील झालं.

ऑक्सफर्डमध्ये राजदीप फेमस विद्यार्थी होता. त्याने खेळाबरोबर अभ्यासातही आपला नंबर कायम ठेवला. तिथल्या वादविवाद स्पर्धा, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये त्याच नाव चमकत होत.

ऑक्सफर्ड विद्यापीठाची टीम इंग्लंडमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळते. राजदीपने आपल्या पहिल्याच फर्स्ट क्लास मॅचमध्ये जोरदार 63 धावा तडकवल्या. त्याकाळचा खतरनाक बॉलर डेरेक अंडरवूड समोर खेळणे देखील मोटजी गोष्ट होती.

भावी टायगर पतौडी म्हणून राजदीपला ओळखू लागले.

ऑक्सफर्डचा फेमस ब्लु हा अवॉर्ड देखील त्याने पटकावला.

पण पुढच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. ऍलन डोनाल्ड, एडी हेमिंगज, माईक आथरटन आशा जबरदस्त बॉलर्स समोर त्याला खेळणे अवघड जात होते. प्रत्येक मॅच गणिक त्याचा आत्मविश्वास ढळू लागला.

१९८७ साली इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीम इंग्लंड दौऱ्यावर आली.

ऑक्सफर्ड आणि केंब्रिजच्या संयुक्त विद्यापीठीय टीम विरुद्ध पाकिस्तानचा एक सराव सामना आयोजित करण्यात आला होता. राजदीपची देखील या टीममध्ये निवड झाली.

या सामन्यात चांगली कामगिरी करून भारतीय सिलेक्टर्स च्या नजरेत भरायचं अस त्याने ठरवलं.

पण तुफानी पाकिस्तानी बॉलर्स समोर राजदिपला जराही खेळायला जमले नाही. त्यांचा महान स्पिनर अब्दुल कादिरने तर अगदी नवशिक्या फलंदाजाप्रमाणे राजदिपला रडवले. त्याच्या एका गुगली राजदिप क्लीन बोल्ड झाला.

अवघ्या २ धावा काढून राजदिप पव्हेलीयनकडे परतला. जाताना एका पाक खेळाडूने त्याला कुत्सितपणे म्हटले,

“अरे तुम तो इंडियन प्लेअर हो और तुम्हे स्पिन बॉलिंग खेलनी नहीं आती?”

राजदिपला एकदम धक्काच बसला. भारतातल्या एखाद्या गल्ली प्लेअरला सुद्धा गुगली खेळणे सहज जमते, शिवाय स्पिनर विरूद्ध खेळण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या दिलीप सरदेसाईंचा तो मुलगा होता. त्याला स्पिन खेळायला न जमणे हा एक प्रकारचा अपमान होता.

राजदिपला त्याच दिवशी साक्षात्कार की,

आपण महान क्रिकेटर काही बनू शकते नाही, गप्प वेगळे प्रोफेशन निवडणे यातच आपलं हित आहे.

यानंतरही त्याने ऑक्सफर्डकडून एक दोन सामने खेळले. शेवटच्या इनिंगला त्याने ४० धावा काढल्या होत्या मात्र भारतात परतल्यावर त्याने परत हातात बॅट घेतली नाही.

७ प्रथम श्रेणी सामन्यात २७.५ च्या एव्हरेजने २२२ धावा असे त्याचे क्रिकेटचे स्टॅटिस्टिक्स होते.

ऑक्सफर्डची कायद्याची डिग्री असल्यामुळे राजदिपने मुंबई च्या कोर्टात वकिलीचा हातपाय मारून बघितला पण तिथेही डाळ न शिजल्यामुळे अखेर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये रिपोर्टर म्हणून जॉईन झाला.

१९९१ नंतर आलेल्या जागतिकीकरणामुळे भारतात दूरदर्शन सोडून इतरही उपग्रहिय चॅनल सुरू झाले. अशातच एनडी टीव्ही च्या माध्यमातून राजदीप ने भारतात न्यूज चॅनलची मुहूर्तमेढ रोवली.

एकदा त्याला एका मुलाखतकाराने
राजदिप सरदेसाईला तुम्ही क्रिकेटसोडून पत्रकारिता का सुरू केली असा प्रश्न विचारला तेव्हा राजदिप गंमतीमध्ये म्हणाला,

“to be a good cricketer you need merit, to be journlaist you can survive without merit”

जर माझ्या कडे टॅलेंट असतं तर मी क्रिकेटर बनलो असतो, मला काहीच जमत नाही म्हणून पत्रकार बनलो अस सांगणाऱ्या राजदिप सरदेसाई यांचा आज वाढदिवस.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.