निवड समितीच्या राजकारणाने बळी गेलेला मराठी खेळाडू हा जगातला फास्टर बॉलर ठरला असता.
आजवरच्या क्रिकेट क्षेत्रात अनेक खतरनाक आणि मातब्बर बॉलर होऊन गेले. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट हे बॉलर लोकांचा भुसा बनवायचा खेळ आहे असेही आरोप बॉलर लोकांच्या समर्थनार्थ करण्यात आले. मात्र खरी बॉलिंगची धार पाहायला मिळते ती कसोटीमध्ये. कसोटीमध्ये बॉलरचा कस तर लागतोच सोबत बॅट्समनचासुद्धा लागतो.
बॅट्समनच्या नुसत्या उभ्या राहण्यावरून बॉलरला त्याची मनस्थिती कळत असे आणि त्यानुसार बॉलिंग केली जाते. म्हणजे वेगवान गोलंदाज म्हणलं कि बॅट्समनच्या पोटात गोळा येत असे. भारताला तर कायम शिव्या पडत आल्या कि भारताकडे चांगले बॉलर नाही म्हणून. भारताकडे स्विंग बॉलर, उत्तम स्पिनर होते पण वेगवान गोलंदाज नव्हते. आता तरी सध्याच्या घडीला भारताकडे ताफाच आहे.
भारताचं आणि बॉलिंग डिपार्टमेंटचं तसं वाकडचं होतं, ना भारताकडे इतरांच्या तुलनेत वेगवान बॉलर होते आणि ना फास्टर बॉलरचा सामना भारतीय फलंदाजांना करावा लागत होता. स्विंग आणि स्पिन इतकेच काय ते अस्र भारताकडे होते. पण भारताकडे एक हुकुमी एक्का होता ज्याने जगभरातल्या बॅट्समनची आपल्या वेगवान गोलंदाजीने झोप उडवली होती.
असे कैक ए वन दर्जाचे खेळाडू केवळ निवड समिती आणि कर्णधारच्या दिरंगाईमुळे आपण गमावले. अगदी फॉरेनर लोकांना सुद्धा कळलं होतं कि भारताकडे फक्त बॅट्समन भरायचं काम चालतं. पण या स्वीन्गच्या ताफ्यात त्यावेळी एका मराठी भिडूने आपल्या स्पीडच्या जोरावर आक्ख ऑस्ट्रेलिया हादरवलं होतं.
राजू कुलकर्णी. अस्सल मराठी खेळाडू. तुफ्फान स्पीड आणि उत्कृष्ट कटर बॉलिंग. १६० च्या स्पीडने बॉलिंग करणारा हा खेळाडू बॅट्समनच्या बॅटला सुद्धा चेंडू लागू देत नसायचा. जेव्हा राजू कुलकर्णी रनअप घेऊन पळत यायचा तेव्हा बॅट्समन विकेट वाचवायचं सोडून आपले पाय अगोदर सांभाळायचा. राजू कुलकर्णी यांचा बॉलिंगचा स्पीड पाहून लोकांनी त्यांना टोपणनाव दिलं होतं थॉमसन.
राजू कुलकर्णी हे भारतीय निवड समिती कडून मुद्दामून डावलल्या गेलेल्या खेळाडूंपैकी एक. पुढे जाऊन हि भारताची मोठी चूक ठरली. राजू कुलकर्णी यांच्या बॉलिंगचा भारताला नीट उपयोग करून घेता आला नाही.
वानखेडे टेस्टमध्ये कपिल देव जखमी झाला तेव्हा रवी शास्त्री कर्णधार होता त्याने आवर्जून राजू कुलकर्णीला ओव्हर दिली आणि राजू कुलकर्णींनी आपल्या धारदार आणि वेगवान बॉलिंगने ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी पार उध्वस्त करून टाकली. जिऑफ मार्श आणि डेव्हिड बून यांना स्वस्तात कुलकर्णींनी बाद केलं.
दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र जेव्हा कपिल देव पुन्हा खेळायला उतरले तेव्हा त्यांनी एक मोठी चूक केली. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या कुलकर्णींना ओव्हर देण्याऐवजी स्पिनर मणिंदर सिंगला ओव्हर दिली. थेट ७२ व्या ओव्हरला राजू कुलकर्णींना बॉलिंगसाठी बोलावलं. मात्र इथेही केवळ सहाच ओव्हर बॉलिंग दिली. यावरून लोकांनी राजू कुलकर्णींनवर अन्याय केल्याच्या टीका कपिल देववर केल्या.
वेगवान बॉलरचं म्हणून नाही तर राजू कुलकर्णी हे उत्कृष्ट फलंदाज सुद्धा होते. अनेक सामन्यांमध्ये त्यांनी आपल्या बॅटिंगची चमक दाखवून दिली. इराणी ट्रॉफीमध्ये चंदू पंडितसोबत त्यांनी ९ व्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी विरुद्ध संघात बॉलिंग अटॅकमध्ये कपिल देव, मनोज प्रभाकर, मणिंदर सिंग, शिवरामकृष्णन होते. तेव्हा राजू कुलकर्णी यांनी ९७ धावांची खेळी केली होती.
त्यांच्याविषयी योगराज सिंग म्हणाले होते कि,
कॅप्टनच्या आवडत्या आणि नावडत्या खेळाडूंमध्ये त्यांचा बळी गेला. नाहीतर त्यांच्याइतका वेगवान बॉलर मी तरी कधी पाहिला नव्हता. राजू कुलकर्णी हे प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीमुळे बाहेर गेले नाहीतर ते जगातले क्लास वन बॉलर होते.
केवळ ३ कसोटी सामने आणि १० वनडे त्यांना भारताकडून खेळता आले. रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये १११ धावांमध्ये त्यांनी ८ विकेट घेतल्या होत्या तेव्हा त्यांचं सिलेक्शन भारतीय संघात झालं होतं. ७९ फर्स्ट क्लास मॅचमध्ये २३२ विकेट त्यांच्या नावावर आहेत.
आजवर आपल्याला राजू कुलकर्णींविषयी काहीच माहिती नसेल पण राजू कुलकर्णी यांच्या हातातून सुटलेल्या चेंडूकडे बघताना बॅट्समनला काय वाटत असेल हे त्या बॅट्समनलाच ठाऊक.
हे हि वाच भिडू :
- एका डाकूला माझ्या बॉलिंगची किंमत कळली पण निवड समिती मला ओळखू शकली नाही.
- भल्या भल्या लिजंड खेळाडूंना जमलं नाही पण तिवारीने राजकारणात आल्या आल्या सिक्सर ठोकला
- १७ वर ५ आउट असताना कपिल देव मैदानात आला आणि वर्ल्डकपचं स्वप्न पूर्ण झालं.
- आजही लोक प्रश्न विचारतात, भारतात पुढचा कपिल देव कधी जन्माला येणार ?
Kahi pan fake news takat jau naka re 160kmh speed ne raju kulkarni bowling करायचे mhane..ajun ekahi bowler nahi india kadin evadha speed wala…