त्यांनी दोन दिवसात ६१८ कोटी कमावले आहेत.

भारतात एक माणूस आहे जो बऱ्याच जणांचा रोल मॉडेल आहे. म्हणजे कस तर UPSC करणारे विश्वास नांगरे पाटलांना पाहून इन्स्पायर होतात. पिक्चर लाईनमध्ये काम करणारे नवाझुद्दीन सिद्दिकी, नागराज मंजुळेला पाहून इन्स्पायर होतात. बिझनेस करणारे टाटा बिर्लां अंबानीला पाहून इन्स्पायर होतात.

असाच एक माणूस आहे जो समाजातल्या एका विशिष्ट वर्गाला इन्स्पायर होण्याचा मार्ग दाखवत असतो. एखाद्या पोराने शेअर मार्केटमध्ये रुपाया जरी गुंतवला तरी त्याला समोर दिसतो तो राकेश झुनझुनवाला.

राकेश झुनझुनवाला हा शेअर मार्केटचा बच्चन आहे. तोच शाहरूख आहे आणि तोच नवाझुद्दिन आहे. सबका मालिक एक या तत्वावर राकेश झुनझुनवाला या माणसांबद्दल गोष्टी शेअर मार्केटमध्ये चालतात.

अगदी पाच दहा दिवसामागची गोष्ट सांगायची झाली तर या माणसाने शेअर मार्केटमधून दोन दिवसात ६१८ कोटी कमवलेत. किती ६१८ कोटी. ते पण दोन दिवसात. म्हणजे एका दिवसात ३०९ कोटी रुपये.

आत्ता मुद्यावर राकेश झुनझुनवाला नक्की कोण आहेत.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांचे सर्वसाधारण तीन प्रकार पडतात.

पहिले असतात मटका खेळणाऱ्यांसारखे शेअर मार्केटमध्ये पैसे लावणारे. म्हणजे १०० रुपयाचे शेअर्स घेतात. ते शेअर्स पुढच्या मिनटाला १०२ रुपये झाले तरी विकून टाकतात. सेकंदा सेकंदाला पुढच्या स्क्रिनवर डोळे ठेवून खरेदी करणं आणि विकणं हे काम या कॅटेगरीतली लोकं करत असतात.

दूसरे असतात स्विंग प्रकारचे लोकं. ते काय करतात तर दोन तीन महिने वाट बघतात. अभ्यास करतात. मग विकतात. दोन ते चार महिन्यांचे पेशन्स असणाऱ्या लोकांना स्विंग म्हणतात.

आणि तिसरे लोक असतात त्यांना इन्वेस्टर म्हणतात. ते काय करतात तर एखादी कंपनी नवीन असली की त्यांचे शेअर्स घेवून ठेवतात. ठेवतात म्हणजे अक्षरश: शब्दश: ठेवतात. दहा वीस तीस वर्ष त्या शेअर्सकडे ढूंकूणही पाहत नाहीत. राकेश झुनझुनवाला हे दूसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात येतात. ते भारतातले एक बलाढ्य शेअर्स इन्वेस्टर म्हणून गणले जातात.

आत्ता त्यांची शून्यातून खतरनाक होण्याची प्रेरणा देणारी गोष्ट सांगतो.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म हैद्राबादचा. साल आहे १९६० चं. त्यांचे वडिल इन्कम टॅक्स ऑफिसर होते. राकेश झुनझुनवाला CA झाले. त्यांनी शेअर मार्केटमध्ये डाव टाकायचं १९८५ साली ठरवलं. त्यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सेंजचा निर्देशांक १५० च्या दरम्यान होता. त्यावेळी शेअर मार्केटमध्ये त्यांनी पहिली रक्कम लावली ती १७० रुपये. किती १७० रुपये. इतके पैसे लावून हा माणूस या इंडस्ट्रित आला. आत्ता आजचं सांगायचं झालं तर आज BSE चा निर्देशांक ४ हजार ९०० आहे आणि या माणसांचे शेअर मार्केटमध्ये २० हजार कोटींहून अधिक पैसे आहेत.

लक्षात घ्या १७० रुपयांचे २० हजार कोटी रुपये या माणसांने ३५ वर्षात केलेले आहेत.

राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती २१ हजार कोटी आहे अशी माहिती मिळते. ते भारतातले ४८ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. एज्युकेशन शी संबधित असणाऱ्या ऐपटेक कंपनीचे ते चेअरमन आहेत. त्यात त्यांच्या कुटूंबाचे ४९ टक्के शेअर्स आहेत. वेगवेगळ्या कंपनीत त्यांचे ठरावीक शेअर्स आहेत व त्याचा फायदा ते घेत असतात पण यात सर्वात महत्वाची कंपनी आहे ती,

टायटन

टायटन म्हणजे तीच आपली घड्याळाची कंपनी. ही कंपनी टाटांची आहे. पण राकेश झुनझुनवाला यांना सर्वाधिक पैसे मिळवून देणारी कंपनी म्हणून याचा उल्लेख केला जातो. कंपनी सुरवातीच्या काळातले इव्हेस्टर आणि ट्रेडर म्हणून राकेश झुनझुनवाला यांचा उल्लेख केला जातो.

बायको रेखा झुनझुनवाला आणि राकेश झुनझुनवाला म्हणजे आदरणीय ते स्वत: या दोघांच्या नावाने या कंपनीत ६.६९ टक्के शेअर्स आहेत. त्यांच्या व्यक्तिगत हिस्सा ५.२१ इतका आहे. म्हणजे कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी ६.६९ टक्के शेअर्स एकट्या राकेश सरांच्या ताब्यात आहेत.

आत्ता झालं अस की मागच्या आठवड्यात टायटनचे शेअर्स ६.६९ टक्यांनी वाढले. दूसऱ्या दिवशी पण ही वाढ कायम राहिली आणि या दोन दिवसात या माणसांच्या खात्यात ६१८ कोटींची वाढ झाली. त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण ६,९०० कोटींच्या शेअर्सची किंमत दोन दिवसात ७,५९३ इतकी झाली.

आत्ता टायनटमध्ये एवढं काय आहे तर आम्हाला शेअर मार्केट सोप्या पद्धतीने सांगणारे सांगतात, टायटन घड्याळवाले जे गोल्ड प्लेटेड घड्याळ वापरतात ते प्रोपर गोल्डवालेच असते. सोन्याच्या दराचा फरक इकडे पडत असतो. म्हणजे सोन्याचा दर वाढला की टायटनचे दर कमी होतात. घड्याळ्यांच्या इतर कंपन्यापेक्षा टायटनकडे चांगली गुंतवणूक म्हणून पाहिली जातं. मागच्या तिमाहीत त्यांनी १२.९ टक्के फायदा केलेला आहे. तिसऱ्या तिमाहीत ९.२ टक्यांनी विक्री वाढलेली आहे.

थोडक्यात काय तर योग्य कंपनीत गुंतवणूक करण्याचा फायदा राकेश झुनझुनवाला यांना यावेळी देखील झाला आणि त्यांनी दोन दिवसात ६१८ कोटी कमावले. कधीकाळी या माणसाने १७० रुपये गुंतवले होते. बाकी यामध्ये आपले डिमार्टचे मालक, राकेश झुनझुनवाला, हर्षद मेहता आणि ACC चे शेअर्स अशी एक स्टोरी देखील आहे. पण ते कांड खास माडंण्यात येईल इतके ते जबरी आहे.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Sachin Sudake says

    ते खास कांड काय आहे ते पण लिहा.

  2. राणे चंद्रकांत says

    जे 3 प्रकारचे लोक असतात ,त्यांना इंग्रजी मध्ये काय म्हणतात?
    जस की इन्ट्राडे ट्रेडर, तस बाकीच्यांना काय म्हणतात?

Leave A Reply

Your email address will not be published.