उन्हाळ्यात घरात अडकल्यावर आठवण येतेय लहानपणीच्या रसनाची !

एप्रिल महिना लागलाय. उन्हाळा प्रचंड तापलाय. डोक्यावरचा फॅन गरम हवा सोडतोय. उकाड्याने, तहानेने जीव व्याकुळ झालाय.

अशावेळी आठवण आली रसणाची.

टीव्हीवरच्या आय लव्ह यु रसनाने सगळ्या बच्चे कंपनीला वेड लावलं होत. लहानपणी उन्हाळेसुट्टीत कुरडया पापड सोबतच घरात रसना बनवायचा कार्यक्रम व्हायचा.

रसनाच्या बॉक्सवर लिहिलेल्या रेसिपी प्रमाणे आई मस्त केशरी रसना बनवून बाटलीमध्ये भरून ठेवायची. कोणी पाहुणे आले तर त्यांना हा थंडगार रसना सर्व्ह व्हायचा.

आपली उन्हाळी सुट्टी रसनामुळे सुसह्य झाली होती हे खरे.

तर हा आपल्या सर्वांचा लाडका रसना बनला गुजरातमध्ये. तिथे खंबाटा नावाची पारशी फॅमिली आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला सोडा वॉटर चा बिझनेस सांभाळत होती.

त्यांच्या पैकीच एकाला हा फ्लेव्हरड सोडा बनवण्याची आयडिया सुचली.

1950 च्या दशकात जाफे या नावाने हा सोडा गुजरात मध्ये फेमस झाला. पुढे याच कुटुंबातील फिरोजशा खंबाटा यांनी हा ब्रँड नव्याने लाँच करायचं ठरवलं. साल होत 1976.

त्यांनीच याला नवीन नाव दिल, रसना

याच्या मार्केटिंगमध्ये देखील नावीन्य आणले होते. त्याकाळी मुद्रा नावाच्या जाहिराती कंपनीकडे याच्या जाहिरातीचं काँट्रॅक्ट देण्यात आलं. मोठ्या माणसांसाठी मार्केटमध्ये बरेच कोल्ड्रिंक्स उपलब्ध होते. रसना साठी लहान मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.

हीच ती फेमस आय लव्ह यु रसना कॅम्पेन.

अंकिता झव्हेरी नावाची गोड छोटी मुलगी या जाहीरातीच्या केंद्रस्थानी होती. तिची स्माईल, डोकं तिरक करून आय लव्ह यु रसना म्हणणं खूप लोकांना भावलं.

अमूल गर्ल, निरमा गर्ल नंतर रसना गर्ल भारतभरात फेमस झाली.

रसनेन काहीच दिवसात अख्ख्या भारतातील मार्केट काबीज केलं. रुआफझा, किसान वगैरे स्पर्धक कधीच मागे पडले पण याच बरोबर गोल्ड स्पॉट, थम्स अप, लिम्का यासारख्या सॉफ्ट ड्रिंक वाल्याना देखील धडकी बसली.

अगदी दोन लिमकाच्या दरात 32 ग्लास रसना मिळत असल्यावर कोण नाही म्हणणार?

रामायण महाभारत सिरीयल गाजू लागल्या. त्यातल्या भीमाला रसना वल्यानी जाहिरातीत वापरलं. एकावेळी 32 ग्लास पिणाऱ्या भिमाची तहानसुद्धा रसना शांत करते अशी ही ऍड फेमस झाली.

कपिल देव, करिष्मा कपूर अशा अनेकांनी रसनाची जाहिरात केली.

रसना गर्ल देखील बदलत गेल्या. पण रसनाची चव तीच राहिली.

नव्वदच्या दशकात जागतिकीकरणानंतर कोक, पेप्सी, फ्रुटी वगैरे अनेक ब्रँड आले. रसना त्यांनाही पुरून उरली.

ऑरेंज सोबतच मँगो वगैरे आणखी फ्लेवर रसनाने आणले होते. ते देखील गाजले. रसनाने हजारो कोटींच साम्राज्य उभा केलं.

विशेष म्हणजे आजही हा बिझनेस खंबाटा कुटुंबा तर्फे चालवला जातो.

पण दोन हजारच्या नंतर हळूहळू रसनाची क्रेझ कमी होत गेली. फक्त उन्हाळ्यातल ड्रिंक किंवा लहान मुलांच फेव्हरेट ड्रिंक म्हणून केलेली जाहिरात उलटा इफेक्ट करून गेली. गेल्या काही वर्षापूर्वी रसनाने कात टाकली आणि नव्याने मार्केटमध्ये उतरली आहे. खिलाडी अक्षय कुमार त्यांचा ब्रँड अबेसिडर आहे.

बाकी काही का असेना आज उकाड्याच्या काळात घरात अडकून पडलेले जीव रसनाची खूप आठवण काढत आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Suhas P Kakde. says

    Mast information.

Leave A Reply

Your email address will not be published.