भारतीयांची विचार करण्याची क्षमता कमी आहे म्हणणाऱ्या आईन्स्टाईनने पुढे टागोरांना गुरु मानले.

जगातले दोन दिग्गज लोकं जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्यांच्यात होणारी चर्चा सुद्धा हायहोल्टेज असते. रवींद्रनाथ टागोर आणि अल्बर्ट आईन्स्टाईन या दोन दिग्गजांमध्ये सुद्धा मानव आणि विज्ञान अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली होती त्यावेळचा हा किस्सा.

रवींद्रनाथ टागोर हे पहिले असे व्यक्ती होते कि जे नॉन युरोपियन असूनदेखील त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होत. वयाच्या ५२ व्या वर्षी म्हणजे १९१२ साली साहित्यक्षेत्रातील योगदान बद्दल आणि गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहास हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. आईन्स्टाईन याना वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी १९२२ साली भौतिक विज्ञानातील योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं होतं.

या दोन महान लोकांची दोन वेळा भेट झाली होती. एकदा १९२६ मध्ये आईन्स्टाईन भारतात आले होते त्यावेळी आणि १९३० साली जेव्हा  रवींद्रनाथ टागोर युरोपात व्याख्यानासाठी गेले होते. १४ जुलै १९३० साली बर्लिनमध्ये आइन्स्टाइन यांनी रवींद्रनाथ टागोर याना स्वतःच्या घरी बोलावलं होतं.

आइन्स्टाईनने त्याच्या डायरीत भारताच्या लोकांबद्दल लिहिलं होतं कि भारतीय लोक वैचारिक दृष्ट्या कमी असतात, यांची विचार करण्याची क्षमता कमी असते, पण ज्यावेळी त्यांनी रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा केली त्यावेळी आपण जो विचार करतो तो चुकीचा आहे असं आइन्स्टाईनला वाटलं होतं.

आइन्स्टाइन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन दिग्गज लोकांमध्ये काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते त्यावेळी रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात आली होती. या चर्चेत आइन्स्टाईच्या मते

जर  सगळे एकत्र राहिले तरच आपण जगू शकतो आणि या जगातून मानव नष्ट जरी झाला तरी पृथ्वीला काहीही फरक पडणार नाही कारण हे जग स्वतंत्र आहे.

यावर रवींद्रनाथ टागोरांनी प्रत्युत्तरादाखल सांगितलं कि, हि पूर्ण पृथ्वी मनुष्याची आहे, जर कोणाला याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं असेल तर त्याला शास्रज्ञ होणं गरजेचं आहे. पण मानवाशिवाय पृथ्वीला काहीच महत्व उरणार नाही. जगाकडे बघताना आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपल्याला जग खरं आणि सुंदर वाटू शकतं.

यावर आइन्स्टाइनने टागोरांना विचारलं कि,

सत्य आणि सौंदर्य यांचं अस्तित्व मानवरहित असू शकतं का ?

यावर रवींद्रनाथ टागोर म्हणाले,

 सत्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींचा मानवाशिवाय विचारच केला जाऊ शकत नाही.  या दोन्ही गोष्टी मानवी मनाशी संबंधित आहे. जर उद्या मनुष्य नसेल तर तारे, नद्या, टेकड्या सुंदर नसणार का ?

यावर आईन्स्टाईन म्हणाले मी सौंदर्याच्या बाबतीत तुमच्याशी सहमत आहे पण सत्याबद्दल सहमत नाही.

आइन्स्टाइनने विचारलं कि या जगात कोणती वेगळी दैवी शक्ती आहे का ?  यावर टागोर म्हणाले माणसाच्या व्यक्तिमत्वात समाविष्ट करता येणार नाही कोणतीही गोष्ट या जगात नाही, माणुसकी आणि मानवीय सत्य हेच जगाचे मूळ सत्य आहे.

वैज्ञानिक सत्य मानवापासून वेगळं आहे हि गोष्ट सिद्ध होऊ शकलेली नसली तरी आईन्स्टाईन यांचा यावर अधिक विश्वास होता. दोन्ही दिग्गज आपापल्या बाजूने आपापली मते मांडत राहिले. आपल्या मतांवर ठाम राहिले. या विषयांवर दोघांमध्ये बरेच मतभेद होते. बराच काळ चाललेली हि चर्चा पुढे प्रकाशितही करण्यात आली.

माणुसकी मानवता धर्म आणि विज्ञान यावर रवींद्रनाथ टागोर आणि आईन्स्टाइनने बरीच चर्चा केली. जगभरातले अनेक वादातीत प्रश्न मांडले त्यावर आपापले विचार व्यक्त केले. आईन्स्टाईन मात्र रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झाला.

आइन्स्टाइन रवींद्रनाथांना ‘ रब्बी गुरु ‘ म्हणत असतं. हिब्रू भाषेत रब्बी म्हणजे माझे गुरु. ज्या भारतीयांबद्दल आईन्स्टाईन कमी विचारशक्ती असलेले लोक म्हणायचा त्यानेच पुढे जाऊन एका दिग्गज भारतीयाला आपला गुरु मानले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.