गरोदरपणाची हक्काची रजा मिळवून देण्यासाठी रोझा देशपांडेंनी लढा उभारला…

साधारण १९६४ चा काळ होता. मुंबईत गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी कामगार नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या बरोबरीनं एक महिला पोट तिडकीडनं बोलत होती. त्याच वेळी त्यांनी औषध कंपन्यांच्या मनमनी कारभाराविरोधात ही लढा उभारला होता. त्यांचं नाव होतं कॉ. रोझा देशपांडे.

तस त्या कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. पण ही इतकीच मर्यादित ओळख नक्कीच नव्हती. वडिलांकडून लढाऊ बाणा घेवून रोझा यांनी औषध कंपन्या आणि कापड गिरण्यांसोबतच रेल्वे, अभियांत्रिकी अशा आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांमधील महिला कामगारांच संघटन करुन उभारलेला मुंबईतील तो पहिलाच लढा होता.

गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्येच बालपण गेले :

कॉ. रोझा देशपांडे यांचा जन्म १९२८ रोजी झाला. जर्मन कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या रोझा लक्झेंम्बर यांच्या नावावरुन कॉ. आण्णा डांगेंनी आपल्या ही लेकीचं नाव रोझा ठेवले.

ज्या वर्षी त्यांचा जन्म झाला त्याच वर्षी मुंबईत गिरणी कामगारांचा अभूतपूर्व संप चालू होता. कॉ. आण्णा डांगे मीरत कटात सामिल झाल्यामुळे तुरुंगात होते. त्यामुळे संपाचं नेतृत्व आपसुकच ऊषाताईंकडे आलं. अशावेळी त्या लहानग्या रोझाला संपात गिरिणींच्या गेटवर घेऊन जातं. त्यांचं संपुर्ण बालपण संप, संघर्ष याच वातावरणात गेलं.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनकर्त्यांना न्याय

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आणि गोवा मुक्ती संग्रामात या दोन्ही आंदोलनात रोझा यांनी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. पुढे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना दर्जा मिळावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या समितीत त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी या आंदोलनात तुरुंगवास झालेल्या आंदोलकांना न्याय दिला.

गरोदरपणाची हक्काची रजा मिळवून दिली

कॉ. रोझा यांनी मुंबईतील जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये महिलांचं संघटन करुन त्यांच्या युनियन उभ्या केल्या. त्याकाळी औषध कंपन्यांमध्ये जवळपास ४० टक्के महिला काम करत होत्या.

मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट १९६१ नुसार, गरोदरपणात महिलेला कमीत कमी तीन महिन्यांची सुट्टी देणं बंधनकारक होती. बाळाच्या जन्मानंतर महिलेला सहा आठवड्यांची सुट्टी ही हक्काची होती. या काळातील पुर्ण पगार देणं ही बंधनकारक होतं.

तसंच गरोदरपणासाठी घेतलेल्या सुट्टीच्या काळात संबंधित महिलेला कामावरून काढून टाकता येत नाही.

मात्र त्यानंतरही मुंबईतील बहुतांश कंपन्यांमध्ये या कायद्यातील हक्कांचे लाभ महिलांना मिळत नव्हते. या महिला कामगारांना लग्न करायचे झाल्यास त्यांनी आधी नोकरीचा राजीनामा द्यायला हवा अशी मालकांनी अट घातली होती. तर जॉन्सन ॲन्ड जॉन्सन सारख्या अनेक फार्मासिटिकल कंपन्या महिला गरोदर राहिल्यास त्यांना कामावरून काढून टाकत असत.

या गरोदर महिला कामगारांना प्रसूती पुर्व आणि प्रसुती नंतरची रजा व इतर हक्क मिळवून देण्यासाठी औषध कंपन्यांच्या विरोधात १९६४ मध्ये रोझा यांनी संघर्ष पुकारला व मालकांची ही मनमानी बंद पाडली. त्या प्रभावी वक्त्या होत्या. कॉ. डांगे यांच्या प्रमाणचं छोटी वाक्यं पण प्रभावी राजकीय विचार यांनी त्या हजारोंच्या सभा गाजवत असत.

१९७४ च्या पोटनिवडणूकीतुन लोकसेभत :

१९७४ साली मध्य मुंबईचे खासदार प्रा. रा. धों. भंडारे यांची पंतप्रधान इंदिरा गांधींनी बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली आणि त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी तिथं पोटनिवडणूक जाहिर झाली. तेव्हाचा दत्ता सामंत पुर्व गिरणी कामगार संप कम्युनिस्ट युनियनं केला होता. कॉम्रेड डांगे त्याचं नेतृत्व करत होते आणि त्यांनी या निवडणूकीमध्ये मुलगी रोझा देशपांडे यांना उतरवलं.

तर कॉग्रेसने रामराव आदिक यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी झालेल्या आमदार कृष्णा देसाई खून खटल्याचं वकीलपत्र आदिक यांनी घेतल होतं. तर तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीपुर्ण संबंधामुळे शिवसेनेने आदिक यांना पाठिंबा दिला. मात्र तरीही या सगळ्या राजकारणानंतरही रोझा देशपांडे निवडून आल्या. विषेश म्हणजे इथे ३० पैकी १९ नगरसेवक शिवसेनेचे होते.

आणीबाणीला पाठिंबा दिल्यानं भाकपमधून बेदखल :

लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या विरोधात संपूर्ण क्रांतीचा नारा दिल्यानंतर त्याकाळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचे कॉ. डांगे आणि रोझा देशपांडे यांनी समर्थन केले व आणीबाणीला पाठिंबा दिला. यानंतर दोघांनाही भाकपमधून काढून टाकण्यात आले.

पुढे १९८० साली रोझी देशपांडे आणि पती विद्याधर उर्फ बनी देशपांडे यांनी ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली.

कॉ. आण्णा डांगे ही या पक्षात गेले व सरचिटणीस झाले. यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया कम्युनिस्ट असे तीन मार्क्सवादी विचार प्रवाह तयार झाले.

इंदिरा गांधी यांच्या विषेश दुत :

कॉंग्रेस पक्षा विरोधातच निवडणूक लढविलेल्या रोझा यांचे पुढे इंदिरा गांधींशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले. १९८० च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी इंदिरा गांधी यांनी रोझा देशपांडे यांना आपल्या विषेश दुत म्हणून मॉस्कोला पाठविलं. रशियन नेते लिओनिड ब्रेझनेव्ह यांना तत्कालिन राजकीय परिस्थिती समजावून सांगण्यासाठी ही भेट होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.