भारतापेक्षा या प्लेयरची ऑस्ट्रेलियामध्ये जास्त हवा होती…

बातम्यांमध्ये म्हणा किंवा सोशल मीडियावर कायम झळकत असणारा एखादातरी क्रिकेटर असतोच म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही अशा कॅटेगिरीमधला खेळाडू. अशा खेळाडूंना कोणतंही काम द्या ते तडीस नेणार म्हणजे नेणार. बॅटिंग द्या बॅटिंगमध्ये झटपट रन बनवणार, बॉलिंग द्या एखाद दुसरी विकेट मिळवून देणार, फिल्डिंगमध्ये एखादा कॅच आऊट करणार किंवा रनआऊट करणार.

अशा खेळाडूसाठी भारतीय संघ सुरवातीच्या काळात नशीबवान ठरला. तो खेळाडू होता रुसी सुरती. भारतीय संघातला सगळ्यात उपयोगी खेळाडू.

रुसी सुरतीला ” गरिबांचा गॅरी सोबर्स ” म्हणून ओळखलं जायचं

टेस्ट क्रिकेटमधली रुसी सुरतीची आकडेवारी काही खास नसली तरी त्याची कीर्ती हि पार विदेशात पोहचली होती. ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त फॅन्स रुसी सुरतीने कमावले होते.

ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शिल्डमध्ये खेळणारा रुसी सुरती हा एकमेव भारतीय क्रिकेटर होता. ऑस्ट्रेलियन पारशी केरसी मेहर होमजी यांनी रुसी सुरती बद्दल एक विधान केलं होतं जे पुढं भरपूर गाजलं,

रुसी सुरतीला खेळताना बघणं म्हणजे शॅम्पेनचा घोट घेताना जो आनंद मिळतो ना तसा प्रकार आहे.

चाहत्यांना तो कधीच निराश करत नाही.

रुसी खेळताना कोणाचंच ऐकत नसे त्यामुळे ऑस्ट्रेलियन लोकांसाठी तो कायम स्पेशल होता.

१९६७ साली भारत आणि ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज खेळवली गेली होती. ऑस्ट्रेलियाला रुसीचा खेळ बघून हा आपलाच खेळाडू असावा असा भास झाला कारण जास्त न बोलता फक्त चौकार षटकार लगावने एवढंच त्याच काम होतं. रुसी सुरती स्पिन आणि फास्ट अशी दोन्ही प्रकारची बॉलिंग करायचा. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगला येऊन झटपट रन बनवण्यात त्याचा हातखंडा होता. फिल्डिंगमध्ये विजेच्या वेगाइतकी चपळाई सुरतीमध्ये होती. क्लोज फिल्डिंगला थांबून ते बॅट्समनला सुद्धा धाकात ठेवत असे.

पुढे भारताकडून जास्त खेळायच्या संधी न मिळाल्याने ते ब्रिस्बेनचेच रहिवासी झाले. क्विसलँड संघासाठी तब्बल चार सीजन ते खेळत होते, हा विक्रम करणारे सुरती हे पहिले भारतीय होते. रुसीने क्विसलँड संघाकडून पहिली हॅट्रिकसुद्धा घेतली होती. १९६९-७० न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघाकडून त्यांना संधीच मिळाली नाही. विजय मर्चंट यांच्या युथ पॉलिसीमुळे ते लवकर संघाबाहेर फेकले गेले.

करिअर लवकर संपलं म्हणून काय विशेष फरक त्याच्या वागणुकीत पडला नाही असं सुरतीबद्दल बोलताना फारुख इंजिनिअर सांगतात कि एंटरटेनमेंट मध्ये काहीच कमी रुसी सुरती ठेवायचा नाही. त्याचं विरोधी खेळाडूसाठी एक फेव्हरेट वाक्य होतं ते म्हणजे

उसके बाप का क्या गया..

१९५९ साली इंग्लंडच्या लँकेशायर संघाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. तिथे रुसी सुरती ३ वर्ष खेळला.

चंदू बोर्डे रुसी सुरतीबद्दल बोलताना सांगतात कि, रुसी हा भारताचा एक महान ऑलराऊंडर खेळाडू होता जर तो वनडे क्रिकेट खेळला असता तर जगातला सगळ्यात जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला गेला असता. पण दुर्दैवाने तस घडलं नाही, जिगरबाज खेळाडू म्हणून तो कायम लक्षात राहील.

१९६७ साली मुंबई मध्ये सुरु असलेल्या एका टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिन लॉरीकडून एक फुलटॉस चेंडू मिस झाला. त्यावर सिली मिड ऑनला उभ्या असलेल्या रुसी सुरतीला हसू आवरलं नाही म्हणून तो लॉरीकडे पाठ करून हसू लागला. त्यामुळे बिन लॉरी गडबडून गेला आणि रुसीला शिव्या घालू लागला तेव्हा रुसी सुरतीने त्याची फेव्हरेट ओळ म्हणून टाकली, उसके बाप का क्या गया…..फारुख इंजिनिअर त्याला गप बस म्हणून सांगत होता मात्र रुसी हा प्रॉपर एंटरटेनमेंट पॅकेज होता.

विदेशात शिल्ड स्पर्धा खेळून ऑस्ट्रेलियन लोकांच्या मनावर त्याने राज्य केले होते. आजही रुसी सुरती इतके ऑस्ट्रेलियन फॅन्स कुठल्याही भारतीय क्रिकेटरने कमावले नसतील.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.