सचिन -सिमा, बार्बरा -शादाब विदेशातल्या महिलांशी कायद्यानं लग्न कसं करता येतं?

प्रेमाला कुठलीही सीमा, कुठलेही नियम, कुठलेही बंधन मान्य नसतात, जेंव्हा माणसाला खर प्रेम होतं, तेंव्हा तो आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी किंवा भेटण्यासाठी काहीही करू शकतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळा हिंदी सिनेमात एक डायलॉग ऐकलाही असेल की “प्यारी की कोई सिमा नई होती” अगदी तसचं काहीस सध्या भारतात घडतंय.  काही दिवसापुर्वीच पब्जी सारख्या गेमच्या माध्यमातू पाकिस्तानातून प्रेम शोधण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रकरणाची चर्चा ताजीच आसताना. त्यांच्याप्रमाणेच आणखी एक ‘लव्हस्टोरी’ समोर आली आहे.

पोलंडमधील एक बार्बरा पोलक नावाची महिला झारखंडमधील एका  शादाब मलिक नाव आसलेल्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि भारतात आली. 

४९ वर्षीय बार्बरा पोलक आणि ३५ वर्षीय शादाब २०२१ मध्ये इन्साटाग्रामवर मित्र झाले होते. मैत्री ऐवढी झाली की त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. आणि याचं प्रेमाची ओढ तिला सातासमुद्र पार करूण भारतात घेऊन आली. बार्बरा शादाबच्या प्रेमात इतकी पडली की ती २०२७  पर्यंतचा व्हिसा घेऊन भारतात आली. आपल्या नवऱ्याला तलाख देऊन आपल्या मुलीसह ती इकडे आली आहे. शादाबचेही बार्बरावर खूप प्रेम आहे. आणि आता दोघांनी हजारीबाग एसडीएम कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती महिला त्या तरूणाशी लग्न करू शकते का? कायदा नेमकं काय सांगतो. आणि जरी लग्न करायचं असेल तर त्यांनां काय करावं लागेल ते आपण पाहूयात. नमस्करा मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू..

भारतीय परंपरेत, लग्न हे अंत्यतं महत्वाचं मानलं जातं. 

घटनेच्या कलम २१ मध्ये प्रत्येक व्यक्तीला लग्न करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारांतर्गत कोणताही भारतीय नागरिक परदेशी व्यक्तीशी लग्न करू शकतो. परंतु, परदेशी व्यक्तीशी लग्न करताना काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर विदेशी विवाह कायदा १९७९ लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार, जेंव्हा एखाद्या भारतीय व्यक्तीला भारतात राहून परदेशी व्यक्तीशी लग्न करायच असेल, किंवा एखादा भारतीय, भारताबाहेरील परदेशी व्यक्तीशी लग्न करतो आणि त्याच्या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी. असं जर वाटत असले तर. 

अशा परिस्थितीत, हा कायदा परदेशी व्यक्तीशी विवाह करण्याच्या प्रक्रियेचा भाग बनतो आणि लग्न करण्याची या कायद्या अंतर्गत मुभा मिळते. पण भारताच्या बाहेरील व्यक्ती सोबत लग्न करायला मान्यता जरी मिळत असली तरी लग्न करणं हे काय सोप्प काम नाही. या कायद्यांतर्गत लग्नाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी. अशा जोडप्याला अनेक कायदेशीर अटींचं आणि नियमांचे पालन करावं लागतं. ते कसं तर सांगतो.

लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाकडे भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आणि ते आवश्यकचं आहे.

 त्यानंतर भारतीय कायद्यानुसार, लग्न करण्यासाठी पुरुषाचं वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि स्त्रीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं. आणि ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात लग्नाची नोंदणी करणार आहेत, तेथे दोघांपैकी एकाने किमान 30 दिवस वास्तव्य करण आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तिथले रहीवासी असणं गरेजचं आहे. फॉरेन मॅरेज अॅक्ट, १९६९ नुसार,  भारतात लग्नासाठी केलेली नोदंणी. हि प्रदेशातील नियमात बसत नसेल कींवा नियमाच्या विरोधात असेल तर आशा वेळी ही मान्यता रद्द होऊ शकते. तसेच  जर लग्न कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तरतुदीच्या विरुद्ध असेल. आणि लग्न करणाऱ्यापैकी कोणतीही एक व्यक्ती जरी आगोदर विवाहीत असेल तर मान्यता रद्द होऊ शकते. डिओर्स जर झाले असतील तर मान्यता मिळू शकते. 

पण हे सारं जरी असलं तरी लग्न म्हणलं की वेळ लागतोचं, आणि लग्नाची एक प्रक्रिया असते. आणि ती कायदेशीर प्रक्रिया देखील खुप मोठी आहे.

परदेशी व्यक्तीसोबत लग्नाची कायदेशीर आवश्यकता पूर्ण करणाऱ्या जोडप्याला. या कायद्यांतर्गत नोंदणीसाठी जिल्हा विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. म्हणजेच लग्नाची नोटीस द्यावी लागते. लग्न जर बळजबरीने कींवा एका बाजुने म्हणजे पुरूषाची तयारी असेल आणि महिलेची तयारी नसेल तर लग्नाला मान्यता मिळत नाही. 

लग्नासाठी अर्ज करणाऱ्या दोघांमध्ये संमती आसणं आवश्यक आहे. या कायद्यांतर्गत अर्ज केल्यानंतर  लग्नाची नोंदणी करणारे अधिकारी ३० दिवसांचा अवधी देत असतात, दिलेल्या कालावधीत एखाद्या व्यक्तीने लग्नाविरोधी आक्षेप नोंदविल्यास. नोंदणी अधिकारी अर्जदार जोडप्याकडून माहिती मागू शकतात. आणि त्यावर पुन्हा फेर विचार केला जातो. ३० दिवसांच्या आत लग्नाबाबत आक्षेप नसल्यास. ३० दिवस पूर्ण झाल्यानंतर लग्न सोहळा होऊ शकतो. पण लग्नासाठी दोन्ही पक्षांकडून किमान तीन साक्षीदार असण बंधनकारक आहे. मान्यता मिळाल्यानंतर लग्नासाठी काही महिन्यांचां कालावधी दिला जातो.

लग्नासाठी दिल्या गेलेल्या सर्व नियम अटी पुर्ण केल्या नंतर आणि एकदा लग्नासाठी अर्ज केल्यानंतर दोघांना ६ महिन्यांच्या आत लग्न करावं लागतं. आणि हे लग्न दिलेल्या कालावधीत नाही केलं तर, 6 महिन्यांच्या कालावधीनंतर,  लग्नासाठी नवीन नोटीस किंवा अर्ज करावा लागतो. आणि पुन्हा एकदा मान्यता घ्यावी लागते.

आपण पाहिलं की एखाद्या विदेशी व्यक्तीबरोबर लग्न करण्यासाठी कोणत्या नियम, अटी, शर्ती लागु केल्या जातात. ज्याच्या आधारे विदेशी व्यक्ती बरोबर भारतीय नागरीक लग्न करू शकतो आणि संसार थाटू शकतो. तुम्हाला या बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

हे ही वाच भिडू:

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.