सदाभाऊंना शेतात लावायची आहे, ती हर्बल तंबाखू म्हणजे काय रे भाऊ ?

भावांनो तुम्ही हेडिंग वाचून आत आलाय नव्हे. माहित हाय मला. तुम्हाला पण पायजेल का हर्बल तंबाखू ? मला पण ही हर्बल तंबाखू पायजे झालीय. सकाळच्या पारी परसाकडं जाताना रोजच्या जर्द्याची इतकी सवय झालीय की, पोटात कळच येईना. म्हणून म्हणलं नवाब मालिकांच्या जावयाकडं घावली तशी हर्बल तंबाखू मिळतीय का बघू ? तर राव सोशल मीडियावर तर सर्वचजण म्हणायलेत की,

ही हर्बल तंबाखू आमास्नी पण पायजेल..  

अर्ध्या सोशल गड्यांनी तर कहरच केलाय,

Image

पण चेष्टेचा विषय सोडला तर तुम्हाला माहिताय का, तुमच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हर्बल तंबाखू लागवडीची मागणी व्हायला लागलीय. ती मागणी केलीय आमदार सदाभाऊ खोत यांनी. 

तर त्याच झालंय असं की,

माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये सदाभाऊंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या, अशी मागणी केलीय. आता नुसतं पत्रच लिहायला नाही भाऊंनी. तर बियाणं पुरवण्याची मागणी पण केलीय,

ते पत्रात म्हणतात,

पवार साहेबांना जाणते राजे म्हटलं जातं. राज्यात मागील काही काळामध्ये महापूर, अतीवृष्टीमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारकडे अशी विनंती केलीय की आमच्या शेतात गांजा लावायला परवानगी द्या, कारण शेती परवडत नाही, नवाब मलिकांच्या जावयाप्रमाणे शेतकरीही श्रीमंत होऊ द्या…

पुढं ही ते म्हणतात,

अलीकडच्या काळात ड्रग्सच्या प्रकरणामध्ये राज्यातील ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे काहीतरी गांजा सापडला. त्यावर मलिक साहेब म्हटले की पवार साहेब म्हणाले की ती हर्बल वनस्पतीयुक्त तंबाखू होती. तो काही गांजा नव्हता.

मग ती हर्बलयुक्त वनस्पतीपासून बनणारी तंबाखू आहे तिचं बियाणं कुठं मिळतं ?

त्याचं बियाणं आम्हाला तुम्ही उपलब्ध करुन द्या कारण तुम्ही आता त्याला मान्यता दिलीय. म्हणजे या राज्यातील शेतकरी आता त्याची पेरणी करेल. जसा यातून नवाब मलिक यांचा जावई श्रीमंत झाला तशी श्रीमंती राज्यातील शेतकऱ्याला येईल. त्यामुळे या राज्यातील शेतकरी चिंतामुक्त होईल.

म्हणूनच आता ज्या हर्बल तंबाखूची इतकी चर्चा आहे ती तंबाखू काय आहे ते बघूया,

तर गांजा हा साधारण हिरवट दिसतो, त्यामुळेच त्यालाच हर्बल तंबाखू म्हणतात का, असा प्रश्न आम्हाला पडला. पण जेव्हा आम्ही इंटरनेट वर सर्च केलं तेव्हा एक फोटो सापडला.

Family mistakes Marijuana for Methi , hospitalized after eating 'Ganja Subzee' - Times of India

आता अर्धी शहाणी जाणती लोक म्हणतील, ह्यो तर गांजा आहे गड्या…

पण हर्बल तंबाखू म्हणजे नेमक काय याचा गुगलवर शोध घेतल्यावर हर्बल तंबाखू विषयी माहिती काय  सापडत नाही, पण हे शब्द टाईप केल्यावर हर्बल सिगारेटविषयी माहिती आणि चित्र येतात. तरी पण लै शोधून जी माहिती सापडली त्याप्रमाणं,

हर्बल सिगारेटमध्ये अन्य सिगारेटमध्ये तंबाखू असते ना तशी तंबाखू नसते. त्यात अन्य वनस्पती असतात. थोडक्यात, ही तंबाखू विरहित सिगारेट असते, या सिगारेटमध्ये तंबाखू नसल्यामुळे ती आरोग्याला घातक नाही, असा दावा केला जातो. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही हर्बल सिगारेट ही आरोग्याला घातकच आहे.

पण नवाब मलिक यांनी ज्या हर्बल तंबाखूचा उल्लेख केला, त्याचा मात्र गुगलवर शोध लागत नाही.

तुम्हाला म्हणून सांगतो गडयांनो, आजवर म्या इतकी तंबाखू पाहिलीय की, इचारू नगासा. खरं म्या सुदिक हर्बल तंबाखू ऐकायला काय बघायला नाही. कशी असत्या, कशी दिसत्या, कशी चरका मारत्या, यातलं कायसुदिक नाही.

लेकांनो जर या हर्बल तंबाखूच उत्पादन घेऊन शेतकरी श्रीमंतच व्हनार असेल तर, आमास्नी पण आमच्या शेतात, हर्बल तंबाखू लावचीय. मग त्याच बियाणं आम्हाला सदाभाऊंनी दिऊ द्या, नायतर मग नवाब मलिक नायतर त्यांच्या जावयानं दिऊ दया. दया एवढं मात्र खरं..

आणि होय जाता जाता तेवढं आमची एक मागणी हाय, ती म्हंजी आमास्नी त्या हर्बल तंबाखूला हमीभाव पण पायजेल. 

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.