९९ वर खेळणाऱ्या सेहवागने सिक्स ठोकला तरी त्याचं शतक पूर्ण झालं नाही !!

साल होतं २०१०. श्रीलंकेच्या डम्बुलामध्ये वनडे ट्राय सिरीज सुरु होती. भारत न्युझीलंड आणि श्रीलंका या तीन टीममध्ये लढाई होणार होती. तिन्ही टीम फॉर्म मध्ये होत्या. भारताची आणि श्रीलंकेची पहिलीच मॅच होती.

भारताचा धोनी तर लंकेचा संगकारा असे दोन्ही टीमचे विकेटकीपर कप्तान होते. दोघांच्यातही दोन्ही लेव्हलवर स्पर्धा होती. आपण विश्वविजेते आहोत हे दोघानाही ही सिद्ध करून दाखवायचं होतं. म्हणूनच भारत आणि लंकेचे सामने विशेष करून अटीतटीचे होत होते.

त्यादिवशी टॉस संगकाराने जिंकला आणि पहिली बॅटिंग निवडली.

भारताची सुरवात भन्नाट झाली. उपुल थरंगा पहिल्याच ओव्हर मध्ये प्रवीणकुमारच्या बॉलिंगवर शून्य रन काढून बोल्ड झाला. तिथून लंकेची अखंड गळती सुरु झाली. सर्वात भरवश्याचा बॅट्समन संगकरा १२ बॉलमध्ये २ रन काढून नेहराची शिकार बनला. पत्त्याचा डाव कोसळावा त्याप्रमाणे लंकेची इनिंग अवघ्या १७० धावांमध्ये आटोपली. प्रवीण कुमार, इशांत शर्मा, ओझा यांच्या पुढे दिलशान वगळता इतर सर्व बॅट्समन फेल गेले होते.

पहिल्या डावात तरी धोनीच भारी ठरला होता.

भारताची बॅटिंग सुरु झाली. ओपनिंगला आलेले सेहवाग आणि दिनेश कार्तिक समोर मोठ टार्गेट नसल्यामुळे निवांत खेळत होते. तरी सेहवाग मोह न आवरून एखाद दुसरा मोठा शॉट मारत होता. पण इतक्यात नवव्या ओव्हरला दिनेश कार्तिक आउट झाला. त्याच्या नंतर आलेले कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही तरुणतुर्क खेळाडू अक्षरशः डक वर आउट झाले.

भारताची अवस्था ३ आउट ३२ अशी झाली. याचाच अर्थ मॅच श्रीलंकेच्या दिशेने झुकत होती.

मग आलेला रैनासुद्धा खूप काही कमाल करू शकला नाही. 25 रन्स काढून तो देखील आउट झाला. अखेर कप्तान धोनीला जबाबदारी उचलायला लागली. एका साईडन सेहवागचा पट्टा सुरूच होता. त्याच्याबरोबर इनिंगला थोडस स्थैर्य दिल तरी चालणार होतं. धोनीने तसच केलं. कोणतीही रिस्क न घेता नॉन स्ट्राईकर एंडला नांगर गाडून तो उभा राहिला.

विरू मॅच संपवणार याची त्याला खात्री होती.

झालंही तसचं. ३४ वी ओव्हर आली आणि भारताला जिंकायला फक्त ५ धावांची गरज उरली. सेहवाग सुद्धा ९९ वर जाऊन पोहचला होता. आदल्या ओव्हरच्या शेवट बॉलला धोनीने विरूच स्ट्राईकवर राहिलं याची व्यवस्था केलेली. विरूच शतक व्हावं ही धोनीची सुद्धा इच्छा होती आणि ते होऊ नये यासाठी संगकारा खूप डोकं खाजवत होता.

बॉलिंगला सुरज रणदिव आला. या नवोदित ऑफ स्पिनरला लंकेत पुढचा मुरलीधरन समजत होते. त्याचा पहिलाच बॉल खेळताना विरू हुकला. आणि गंमत म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट समजला जाणारा विकेटकीपर संगकारादेखील हुकला. बॉल थेट बाउन्ड्रीला गेला. ४ धावा बाईज म्हणून मिळाल्या. भारताचा आणि लंकेचा स्कोर इक्वल झाला.

आता जिंकायला फक्त एकच रन होती तरी भारतीय फॅन्सनां टेन्शन आलेलं. विरूच अजून शतक राहिलेलं. त्याला सुद्धा एकच रन हवी होती. 

आणि सुरज रनदिवने माती खाल्लीच. ओव्हरचा तिसरा बॉल टाकताना त्याचा पाय क्रीजपासून बराच बाहेर पडला. तो क्रीज बाहेर गेलाय हे पाहताच अम्पायर ओरडला,

“नो बॉल”

विरूने तत्काळ निर्णय घेतला की आता मोठा शॉट मारायचा. त्याने बॉल उचलला, ते थेट सिक्स. भारताने मॅच जिंकली, सेहवागच सुद्धा त्याच्या स्टाईलमध्ये शतक पूर्ण झालं. सगळे खुश झाले. लंकेने स्कीम करायला बघितली पण ती काही यशस्वी ठरली नव्हती. भारतीय फॅन्सनी ग्राउंडवर येऊन नाचायला सुरवात देखील केली.

पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.

कॉमेंट्रीवाल्यांची वेगळीच गडबड सुरु होती. नियमावलीची जुनी पुस्तक माळावरून काढण्यात आली. नियम चेक केला. दुर्दैवाने रेफ्रींनी डिक्लेअर केलं की सेहवागचा सिक्सर ग्राह्य धरला जाणार नाही कारण नो बॉलमुळे भारत जिंकला आणि तिथेच मॅच संपली. त्यानंतर त्याने सिक्स मारला तरी काही फरक पडला नाही.

>बिचाऱ्या सेहवागच शतक संगकाराच्या टीमने केलेल्या स्कीममुळे गंडलं. पण शतक हुकल असल तरी सेहवागला मन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तो काय मिळणारच होता.

पोस्ट मॅच प्रेजेंटेशन सेरेमनी मध्ये संगकाराला वीरूच्या शतकाचा प्रश्न विचारण्यात आला. त्याने सुद्धा साळसूदपणे शतक व्हायला पाहिजे होत, आमच्या बोलरने मुद्दामहून केलं नाही वगैरे उत्तर दिल. पण जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा मात्र विरूने श्रीलंकन टीमला उभे आडवे सोलले. तो म्हणाला,

“सुरज रणदिवने तो नोबॉल मुद्दामहून केला होता. यापूर्वी त्याने वनडे सोडा कसोटीतही कधी एकही नो बॉल टाकला नाही आणि नेमक माझ शतक होत असताना फुटभर पाय बाहेर टाकून नोबॉल पडला. हे मला तरी खोट वाटत.”

बीसीसीआयने हा प्रश्न आयसीसीकडे नेला. लंकेने जे केलं ते म्हणजे खिलाडूवृत्तीला धरून नव्हते. त्याची चौकशी बसवण्यात आली. कप्तान संगकारा निर्दोष सुटला पण बॉलर सुरज रणदिवने मुद्दामहून नो बॉल टाकला होता हे सिद्ध झालं. त्याला तस करायला दिलशानने सांगितलं होतं हे सुद्धा कळाल.

फक्त भारतातच नाही तर जगभरातून संगकाराच्या टीमवर टीका झाली. दिलशान आणि रणदिवने जे काही केलं ते क्रिकेटला काळिमा फासणारे आहे अस मानण्यात आल. श्रीलंकेचे फॅन्सदेखील त्यांच्यावर खुश नव्हते.

अखेर सुरज रणदिवला एका सामन्याची बंदी आणि दिलशानचा एका सामन्याच मानधन कापून विषयावर पडदा टाकण्यात आला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.