आयुष्यात काहीच पर्मनंट नसलं तरी चालेल पण सेट मॅक्सवर सूर्यवंशम पर्मनंट आहे.

हा भिडू,  हा तोच पिच्चर आहे जो तुला आधी भयंकर आवडायचा पण आता त्यावरचे मीम बघून तुला तो ओव्हररेटेड वाटायला लागलाय. म्हणजे भारतात दोन लोकांचे ग्रुप आहेत एक म्हणजे ज्यांनी सूर्यवंशम बघितला आहे आणि दुसरे ते ज्यांनी सूर्यवंशम बघितलाय पण आता ट्रोलिंगमुळे ते पण गप पडून आहेत. मागच्या महिन्यातच सूर्यवंशम येऊन २२ वर्ष पूर्ण केले.

आयुष्यात काहीच पर्मनंट नसलं तरी चालेल पण सेट मॅक्सवर सूर्यवंशम पर्मनंट आहे.

आता या पिच्चरची स्टोरी लोकांना अक्षरशः तोंडपाठ आहे. पण हा पिच्चर बॉक्स ऑफिसवर पडला होता होता. अमिताभ बच्चन त्यावेळी फ्लॉप ठरू लागला होता. खुदा गवाह चित्रपटानंतर तो जो पिच्चर करेल तो पडत होता म्हणून त्याला सुर्व्यावंशम चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या.

बाप आणि मुलाच्या नात्यात आलेले दुरावे दाखवण्यासाठी यात बापही बच्चन होता आणि मुलगाही बच्चन होता. ठाकूर भानुप्रताप सिंग आणि हिरा अशा डबल रोलमध्ये अमिताभ बच्चन दिसला होता. विषाने भरलेली खीर हिरा ठाकूरचा पोरगा भानुप्रतापला खाऊ घालतो आणि मग हाणामारी होऊन पुन्हा कुटुंब एकत्र येतं.

चित्रपट त्यावेळी फ्लॉप ठरला पण नंतर तो अचानक आणि अनपेक्षितपणे इतका लोकप्रिय झाला कि दर दोन तीन दिवसांनी टीव्हीवर सूर्यवंशम लागू लागला. आता नवीन नवीन आपण बघतो पण सतत तेच तेच पाहत बसल्यावर कुणीही बोर होईलच. तसंच या चित्रपटाबाबत घडलं. हप्त्यातून एक दोनदा तरी सुर्यंवंशम टीव्हीला झळकतोच.

पण हा पिच्चर इतर चॅनलवर अगदीच विरळ दिसतो पण सेट मॅक्स वर मात्र कायम लागत असतो. आता सेट मॅक्सने त्यावेळी अगदी आयपीएल मॅचचा सिझन सुरु असतानाही सूर्यवंशम लोकांना पाहायला लावला होता. सेट मॅक्स आणि सूर्यवंशम या चित्रपटाबद्दल बऱ्याच अफवाही उठल्या होत्या.

सतत सेट मॅक्सवर सूर्यवंशम का लागतो ?

१९९१ च्या अगोदर भारतात फक्त दूरदर्शन हे एकच चॅनल होतं. दूरदर्शन हे पब्लिक चॅनल होतं. ९० च्या दशकानंतर नरसिम्हा राव सरकारने खाजगीकरणाचे दरवाजे उघडले. खाजगीकरणामुळे अनेक नवीन चॅनलची एन्ट्री टीव्हीवर व्हायला सुरवात झाली. २० जुलै १९९९ ला एका नवीन चॅनलची ब्रॉडकास्टिंग झाली. त्याचं नाव होतं सेट मॅक्स. आता ते सेट मॅक्स सोनी मॅक्स म्हणून चालू आहे.

याच दरम्यान सूर्यवंशमसुद्धा रिलीज झाला होता. आता हा सुर्यवंशम चित्रपट पुढे जाऊन मॅक्स चॅनलला पर्यायवाची शब्द म्हणून ओळखला जाईल असं कोणाच्या ध्यानातही आलं नसेल. चॅनल आणि पिक्चरचं इतकं प्रेम आहे कि लोक म्हणतात सोनी मॅक्सने सूर्यवंशम पिच्चर दत्तक घेतलाय.

अशा अफवाही त्यावेळी उठल्या होत्या कि सेट मॅक्स आणि सूर्यवंशम चित्रपटामध्ये करार झाला आहे. हा करार थोडा थिडका नसून तब्बल १०० वर्षांचा करार आहे. म्हणजे शंभर वर्ष सूर्यवंशम बिनधास्त टीव्हीवर दिसणार. पण सेट मॅक्स चॅनल म्हणतंय कि असा कुठलाही करार सूर्यवंशम सोबत झालेला नव्हता. ती त्यावेळी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणून वापरला गेलेला प्लॅन होता.

प्रेक्षकांची त्यावेळी या चित्रपटासाठी प्रचंड मागणी व्हायची. यातली गाणी ग्रामीण भागात लोकांना चांगलीच आवडली होती. अमिताभ बच्चन हा शहरांपेक्षा खेडेगावात जास्त फेमस आहे याचं उदाहरण म्हणून हा पिच्चर सेट मॅक्सवर कायम लागत राहतो.

कोरे कोरे सपने मेरे….

हे गाणं त्यावेळी लग्नाच्या प्रत्येक कॅसेट मध्ये इंट्रो सॉंग म्हणून वाजवलं जायचं.

आता आज कितीही ट्रोलिंग केलं, हजार मीम बनवले तरी सूर्यवंशम पिच्चर टीव्हीवर लागल्यावर खरा बच्चन फॅन क्लब निदान पाच मिनिटं तरी थांबून हा पिच्चर बघतोच. सेट मॅक्सने चॅनलच्या प्रमोशनसाठी  सूर्यवंशम पिच्चरमुळे आपली लोकप्रियता भारतभरात पोहचवली. आता ठाकूर भानुप्रताप खीर खाण्याच्या सीनवर इतके मिम्स लोकांनी तयार केले होते कि सांगता येणार नाही.

आयुष्य सेट मॅक्सने सेट केलं टीव्हीवर ते हि बच्चनचं करियर सेट करून….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.