बायकोची छेड काढली म्हणून शाकीबने स्टेडियममध्येच एकाला धुतलं होत

बांग्लादेशाचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ढाका प्रीमियर लीगमध्ये त्यानं घातलेल्या राड्यामुळे तो चांगलाच गोत्यात सापडलाय.  शाकिबन एकाच मॅचमध्ये दोन वेळा  स्टंपवरच राग काढला आणि अंपायरशी हुज्जत घातली. ज्यामुळे बोर्डानं त्याला ढाका प्रीमियर लीगच्या  पुढच्या  ४ मॅचसाठी बॅन केलंय.

त्यानं स्टंपच उखडून  काढलं..

तर झालं असं होत कि, शेर-ए-बंगाल स्टेडियममध्ये मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब आणि अबहानी लिमिटेड यांच्यात सामना सुरु होता. यावेळी दोन ओव्हर्समध्ये शाकिब ने दोन वेळा मैदानावर राग काढला. पहिल्यांदा मुशफिकुर रहीमच्या विरोधात LBW ची अपील मान्य नसल्यानं त्यानं स्टंपलाच लाथ मारली.

ते होत नाही तर दुसऱ्यांदा पावसामुळे अंपायरने मैदान झाकण्यासाठी  कव्हर्स  मागवले, तेव्हा शाकिबनं पळत येऊन अंपायरसोबत वाद घालायला सुरुवात केली आणि स्टंप  उखडून मैदानावर आपटले.

या घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. ज्यानंतर  लोक शाकिबला त्याच्या वागणुकीमुळं  टार्गेट करायला लागतलीत. ज्यानंतर शाकिबने माफी देखील मागितली.

बायकोने पण दिलं स्टेटमेंट …

आता या प्रकरणात शाकिबची पत्नी उम्मे अल हसनने सुद्धा उडी घेतलीये.  तिने अंपायरच्या निर्णयावर डाउट घेत दावा केला की, तिच्या  नवऱ्याला खलनायक बनवण्याचा कट रचला जातोय. तिने एका पोस्टमध्ये म्हंटल –

मीडियासारखं मी सुद्धा या घटनेचा आनंद घेतेय, शेवटी टीव्हीवर काहीतरी बातमी आली. आज ही घटना स्पष्टपणे पाहणाऱ्या  लोकांचा पाठिंबा पाहणे फार चांगले आहे, कमीतकमी कोणीतरी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभे राहण्याचा दम दाखवला. मात्र, हि दुर्दैवाची बाब आहे की मीडिया मेन मुद्दा बाजूला ठेवत फक्त   शाकिबचा राग दाखवतेय. इथं मेन मुद्दा अंपायरच्या निर्णयाचा आहे. हेडलाईन खरंच वाईट वाटणाऱ्या  आहेत. माझ्यामते हे सगळं त्याच्याविरोधात रचला जाणारा कट आहे, ज्याच्या मदतीनं लोक त्याला व्हिलन बनवत आहेत, जर आपण एक क्रिकेट लव्हर असाल तर आपल्या वागणुकीकडे लक्ष ठेवा. 

बऱ्याच वेळा केलंय बॅन  

२०१७ मध्ये शाकिबवर ऑन  फिल्ड अंपायरला शिव्या घातल्याबद्दल एका वर्षासाठी बॅन केलं होत. इतकच नाही २०१९ मध्ये बांगलादेशच्या या ऑलराउंडर खेळाडूला आयसीसीने तीन प्रकरणांत २ वर्षासाठी बॅन केलं होत. त्यानं चाहत्यांसोबत सुद्धा भांडण  केलीत. 

फेसबुकवर मागितली माफी

ढाका प्रीमियर लीगमध्ये झालेल्या प्रकारानंतर शाकिबने आपल्या चाहत्यांची माफी मागितलीये. त्याने एका पोस्टमध्ये म्हणतील कि,

‘प्रिय चाहते आणि हितचिंतक, आजच्या सामन्यात माझ्या वागण्यामुळे जे दुखावले गेले आहेत त्यांच्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यासारख्या अनुभवी क्रिकेटपटूकडून असली अपेक्षा अजिबात केली जाऊ शकत नाही, परंतु कधीकधी सामन्याच्या तणावपूर्ण वातावरणात हे घडून जात. अशा चुकांबद्दल मी सर्व संघ, स्पर्धेत सहभागी सर्व अधिकारी आणि आयोजन समितीची माफी मागतो . मी आशा करतो की, भविष्यात मी अशा प्रकारचे काम करणार नाही. सर्वांना प्रेम.’

हे सगळं असली तरी शाकिब दिग्गज  ऑलराउंडरपैकी एक मानला जातो.  शाकिब अल हसनने बांगलादेशकडून ५७ कसोटी, २१२ एकदिवसीय आणि ७६ टी -२० सामने खेळलेत. शकीब इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) खेळलाय. त्याने प्रोफेशनल क्रिकेटमध्ये  १००० विकेटसुद्धा पूर्ण केल्यात. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.