हे शरियत कायदे काय आहेत ?

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने १७ ऑगस्ट रोजी पहिली पत्रकार परिषद घेतली. यांमध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेत तालिबान्यांना एका महिला पत्रकाराने प्रश्न केला, “महिलांच्या अधिकारांचं काय होणार”?

या प्रश्नावर तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद म्हणाले की, ‘महिलांना अधिकार मिळतील मात्र  शरिया कायद्याच्या चौकटीतूनच’ 

अफगाणिस्तानात आता तालिबान शरिया कायदा लागू करत आहे, तालिबानने महिलांना स्पष्ट सांगितले  आहे की, त्यांना घरातून बाहेर पडू दिले जाणार नाही, तर तालिबानने पुरुषांवरही अनेक कडक निर्बंध लादले आहेत. थोडक्यात तालिबानने हे शरीया कायदे लागू करून अफगाणिस्तानला ९० च्या दशकात पुन्हा आणून ठेवले आहे,

आज अफगाणिस्तानच्या महिलांचे आयुष्य नरक बनवले ते शरिया कायदे आहेत तरी काय आहेत ? 

शरिया कायदे इस्लामी समाजात राहण्याचे मार्ग, नियम आणि नियमांच्या स्वरूपात कायद्याची भूमिका बजावते. संपूर्ण इस्लामिक समाज या शरिया कायदा किंवा शरिया कायद्यानुसार चालतो. शरीयाचा  कुराण आणि इस्लामशी किती जुना संबंध आहे? हे हि पाहणे महत्वाचे आहे.

प्रत्येक समाजात आणि धर्मामध्ये, लोकांना जगण्यासाठी नियम आणि कायदे आहेत. शरियत हा इस्लामी समाजात राहण्याच्या समान नियमांचा एक संच आहे ज्याद्वारे इस्लामी समाज जगभर चालतो.

शरियत कायदे म्हणजे नेमके कोणते कायदे?   

सातव्या शतकात मदीना, सौदी अरेबिया मध्ये इस्लामची स्थापना झाल्यावर इस्लाम आसपासच्या भागात झपाट्याने पसरू लागला. पूर्वी अरबस्तानात एक आदिवासी समाज होता, ज्यात तिथे राहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या प्रथा होत्या, पण इस्लामच्या प्रसारामुळे कुराणचे नियम या आदिवासी समाजांवर राज्य करू लागले. कुराणमध्ये अलिखित असलेल्या विधींना शरीयत म्हणायला सुरुवात झाली.

शरियत कायदा म्हणजे, रूढी, प्रथा, परंपेने चालत आलेले धर्मांध नियम आहेत. हद्द म्हणजे या असल्या जाचक नियमांना कायद्याची उपमा दिली आहे. भारतातलं पहायचं झाला तर, हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट प्रथा कालांतराने बंद करण्यात आल्या. पण शरियतमधील जाचक रूढी, परंपरा अजूनही रद्द करण्याला न्यायव्यवस्थेला यश आलं नाही.

मुस्लिम पर्सनल लॉ हा शरियतवर आधारित आहे. व्यापकपणे सांगायचे तर, शरियाला कुराणातील तरतुदी तसेच प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणी आणि पद्धती समजल्या जाऊ शकतात.

तालिबानने  शरियत कायदा लागू केला, पण नेमकी कोणते नियम या कायद्यांतर्गत येतात ?

पुरुष आणि स्त्रिया दोन्हींवर हे शरियत नियम लागू होतात.  जसे की पुरुषांना दाढी वाढवण्यासाठी सक्ती करणे, तेथील सलून मध्येच दाढी करण्यास मनाई केली आहे. नागरिकांनी केस कापताना देखील तालिबान्यांनी सांगितल्याप्रमाणेच कापले जावे लागणार आहेत. तर महिलांनी पूर्ण बुरख्यात वावरावे. महिलांनी शिक्षण घेऊ नये, नोकरी करू नये, घराबाहेर पडू नये.  तसंच महिलांना घराबाहेर पडायचं असेल तर त्यांच्या सोबत कायम एखादा पुरुष असायलाच हवा.

मागच्या राजवटीत त्यांनी आठ वर्षावरील मुलींना शाळा शिकण्याची परवानगी नाकारली होती.

टीव्ही, संगीत, खेळ इत्यादी कोण काय खेळतोय, कोण काय पाहतंय यावरती तालिबानी नजर ठेवायचे. तसंच ऑनलाइन शिकवणी देणाऱ्यांना देखील देशाबाहेर हाकलण्याचा कायदा आणला होता.

काबूल विद्यापीठात शिकणाऱ्या युवतींचे शिक्षण थांबवले होते.  थोडक्यात काय तर महिलांना घरात खितपत पडून राहावे असा उद्देश त्यामागे होता. हद्द म्हणजे या तालिबान्यांनी नागरिकांना सांगितले की, घराची रचनाच अशा पद्धतीने करा की, खिडकीतून देखील महिला बाहेरच्या दुनियेला दिसणार नाही. तालिबान्यांच्या राजवटीत महिलांवर अशा प्रकारचे पाशवी बंधनं टाकली होती.

यावेळेस मात्र या शरीय कायद्यात काही स्तरावर ढील दिली असल्याचे तालिबान्यांनी स्पष्ट केले आहे.  शरियत कायद्यानुसार महिलांना वागावे लागेल. तरच त्यांना नोकरी अथवा शिक्षण घेता येणार आहे. मात्र त्यांना बुरखा सक्तीचा केला जाणार असल्याचंहि तालिबान्यांनी स्पष्ट केले आहे.

तालिबानने स्पष्ट केले आहे की, ते त्यांच्या पूर्वीच्या राजवटीप्रमाणे या वेळी ते महिलांना पूर्ण बुरखा अनिवार्य करणार नाहीत. १९९६-२००१ या काळात तालिबान राजवटीत, या शरीया कायद्यांतर्गत  मुलींसाठी शाळा बंद होत्या, स्त्रियांना घर सोडून काम करण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी पूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालावा लागला होता.

थोडक्यात हे  शरीयत कायदे इस्लाममध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जगण्याचे नियम स्पष्ट करते. तसेच शरियत मुसलमानाने कसे जीवन जगावे हे सांगते. आणि म्हणूनच हा शरिया कायदा स्त्रियांच्या जीवनावर खोल प्रभाव टाकतो.

कुराणमध्ये लिहिलेले कायदे कालांतराने ते सोयीनुसार बदलत राहिले. किंबहुना, अनेक धार्मिक संस्थांमध्ये आणि तेथील न्यायव्यवस्थेत, त्यानुसार शरिया लागू करण्यात आली. जसे कि आता तालिबानने अफगाणिस्तान मध्ये हे कायदे लागू केले.

त्यामुळे आता या देशातील कला, संस्कृती आणि सिनेमाचे काय होईल, कारण तालिबानची सत्ता येताच त्यांनी सिनेमा आणि कलेवर बंदी घातली आहे. यावेळेस तर हिंसाचारात  तालिबान्यांनी अनेक शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत आणि आता २० लाख मुलींना शाळा सोडावी लागत आहे.

याच शरियत कायद्याने अफगाणिस्तान मधील महिलांचे आयुष्य नरक बनवले आहे.

गेली दोन दशके आपले आयुष्य आरामात जगणाऱ्या महिलांना आता कठोर निर्बंधाखाली जगणे भाग पाडले जाणार आहे.  तालिबानने महिलांना घर सोडू नका असे आदेश दिले आहेत आणि जर त्यांना बाहेर जायचे असेल तर त्यांना पुरुषांसोबत बाहेर जावे लागेल. तालिबानच्या आदेशानंतर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

कारण हे शरियत चे नियम पाळले नाही तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.