अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या विरोधात, एक महिला राज्यपाल आर्मी उभी करतेय.

अफगाणिस्तानमधून मागच्या मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपलं सैन्य माघारी बोलवलं आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवायला सुरुवात केली. ताबा मिळवून हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा त्यांचा डाव चालूये. पण त्याला उत्तर देण्यासाठी तालिबानच्या अत्याचाराविरोधात आता पुरुषांच्या बरोबरीने महिलाही उघडपणे मैदानात उतरल्या आहेत.

पण तालिबानच्या विरोधात उतरण्याचे नागरिकांनी हे धाडस केले ते तेथील एका महिला राज्यपालामुळे !

होय, एक महिला राज्यपाल तालिबानला रोखण्यासाठी आपल्या भागात आर्मी उभी करतेय. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या विरोधात लोकांमध्ये राग इतका वाढला आहे की लोकं त्यांची जमीन आणि गुरे विकून शस्त्रे खरेदी करत आहेत आणि महिला राज्यपालांच्या या आर्मीत सामील होत आहेत.

कोण आहेत या महिला राज्यपाल ?

सलीमा माजरी असे या महिला राज्यपालाचे नाव आहे. पुरुषप्रधान असलेल्या उत्तर अफगाणिस्तानातील असलेल्या भागाच्या या महिला राज्यपाल तालिबानशी लढण्यासाठी महिला आणि पुरुषांची फौज उभी करत आहे. या राज्यपाल सतत लोकांमध्ये जात असतात आणि त्यांना तालिबानच्या विरोधात शस्त्र उचलण्यासाठी प्रेरित करीत असतात, वेळ आली तर देशासाठी जीव द्यायला तयार राहा असं सांगतेय आणि लोकं देखील त्या महिला राज्यापालांच ऐकत आहेत.

मे महिन्यापासून तालिबानने अफगाणिस्तानमधील ग्रामीण भाग झपाट्याने आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. या दरम्यान हजारो नागरिकांचा बळीही गेला आहे.

आता हा वाद चर्चा करून सुटणार नाही हे माजरी यांनी जाणलं आहे.

तालिबान ज्याप्रकारे तीव्र हल्ले करत आहे  ते पाहता हे स्पष्ट झाले आहे की ते देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर सत्ता हस्तगत करण्यासाठी उत्सुक आहेत, जेणेकरून ते पुन्हा एकदा देशात त्यांचे क्रूर शासन लादू शकतील.

मे महिन्यातच तालिबान्यांनी एका शाळेवर हल्ला केला आणि त्या हल्यात ८० शाळकरी मुलींची हत्या केली गेली. आणि या घटनेपासूनच त्या ठाम झाल्या कि या तालिबान्यांना उत्तर देणे महत्वाचे आहे.

तालिबान्यांनी माजरी यांचा निम्मा जिल्हा काबीज केला आहे. तरी देखील तितक्याच हिमतीने त्या  तालिबानचा सामना करण्यासाठी सर्वांना प्रेरणा देत आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या या आर्मीमध्ये, काय प्रशिक्षित सैनिक नाहीत तर तेथील स्थानिक शेतकरी तसचं मजुरांपासून मेंढपाळांपर्यंत महिला आणि पुरुष आहेत.  त्यांच्याकडे कधी बंदुका नव्हत्या. लोकांनी त्यांची जनावरे विकून बंदुका आणि इतर शस्त्रे खरेदी केलीत.

या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सय्यद नजीर यांनी माध्यमांना सांगितले की, “स्थानिक लोकांनी तालिबानला कडाडून विरोध केला आहे. यामुळे त्यांना हा संपूर्ण जिल्हा आतापर्यंत काबीज करताच आलेला नाही, आणि संपूर्ण श्रेय स्थानिक लोकांना जाते. कारण या लढ्यात फक्त स्थानिक लोकांनीच योगदान दिले आहे”

माजरी या केवळ या स्थानिक लोकांना तालिबान विरूद्धच्या लढाईत उभे करत नाही तर त्या जखमी झाल्यास त्यांच्यावर उपचार देखील करत आहेत.

त्यांच्या सैन्यात ५३ वर्षीय सय्यद मुनावर यांचाही समावेश आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहेत पण ते तालिबानच्या विरोधात जाण्यासाठी ते माजरी यांच्या आर्मी मध्ये सामील झाले आहेत.ते म्हणतात की, तालिबान्यांनी त्यांच्या जिल्ह्यावर हल्ला करण्यापर्यंत ते  शेतकरी होते, पण आता त्यांना हातात शस्त्रे घेण्यास भाग पाडले गेले आहे. तसेच इतर काही तरुण मुल-मुली ज्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले त्याला तालिबान कारणीभूत आहे त्यामुळे त्यांनीही हातात पेन घेण्याच्या वयात शस्त्र घेतले असे ते सांगतात.

माजरी केवळ लोकांना तालिबान विरूद्धच्या लढाईत उभे करत नाही तर ते जखमी झाल्या त्यांच्यावर उपचार देखील करतात. माजरी यांची हि आर्मी न थकता आपल्या जिल्ह्याला, आपल्या कुटुंबाला रात्रंदिवस पहारा देत आहे..कसल्याही वेतनाशिवाय..

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.