मूठभर जोधपूर जिंकण्याच्या नादात शेरशहाने दिल्लीचं सुलतानपद गमावलं असतं..

१५४० ते १५४५ या काळात दिल्ली सल्तनतमधील अफगाण शेरशाह सूरी हा काही चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्याचे वडील हरियाणातील नारनौल या छोट्या गावाचे जहागीरदार होते. लहानपणी त्याचे फरीद खान हे नाव होते. एका शिकारीदरम्यान बिहारचे मोगल राज्यपाल बहार खान यांच्यावर वाघाने हल्ला केला. नौजवान अफगाण फरीद याने सिंहाला ठार मारले आणि त्या गवर्नर ला वाचवले. आणि तेंव्हापासून त्याला ‘शेर शाह’ असे नवीन नाव पडले.

शेर शाहने स्वत:च्या हिंमतीवर दिल्लीची तख्त मिळवले होते. दिल्लीची सत्ता ताब्यात पकडल्यानंतर चार वर्षांतच तो त्याची बादशाही एकदा जाता-जाता वाचली.

१५४४ चे वर्ष होते. मारवाडमधील गिरी-सुमेल हे छोटेसे गाव होते. हे गाव सध्या राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जैतरण तालुक्यात येते. आधी बंगाल आणि नंतर मालवा जिंकल्यानंतर शेरशाह मारवाडकडे वळला. त्याची बादशाही टिकवून ठेवण्यासाठी मारवाडवर कब्जा करणे आवश्यक होते. १५४३ साली त्यांनी मारवाडच्या दिशेने कूच केले.

१४६० मध्ये मारवाडचे शासक राव जोधा यांनी ‘चिडिया टुंक’ या मोठ्या टेकडीवर महारानगडाचा किल्ला बांधला आणि किल्ल्याच्या शेजारी एक नवीन शहर स्थापन केले – जोधपूर. पूर्वी मंडोर ही मारवाडची राजधानी असायची. मंडोरची समस्या ही होती की, येथील किल्ला सपाट जमिनीवर होता. सुरक्षेच्या दृष्टीने उंच टेकडीवरचा किल्ला लढाईसाठी अधिक चांगला असतो. जर तुम्ही टेकडीच्या वर असाल, तर तुम्ही खालून येणाऱ्या शत्रूंच्या दहापट मोठ्या सैन्याशी दोन हात करू शकता. शेर शाह ही बाब जाणून होता. जोधपूर जिंकण्यासाठी त्यांनी एक नवीन रणनीती स्वीकारली.

जोधपूरपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरी-सुमेल येथे त्यांनी ८०,००० घोडेस्वार आणि ४० तोफा घेऊन तळ ठोकला होता.

शेरशहाच्या आगमनाची बातमी मिळताच मारवाडचे शासक राव मालदेव राठौर हेदेखील आपल्या ५० हजार घोडदळासह गिरी-सुमेल येथे पोहोचले. एक महिना दोन्ही सैन्याने तळ ठोकला. एक महिन्यानंतर शेर शहा यांना परेशानी चालू झाली कि, इतक्या मोठ्या सैन्याला पोसण्यासाठी राशन कमी पडत होते. आणि ते उभारणे खूप कठीण झाले. आणि ही जागाही दिल्लीपासून खूप दूर होती. राशनची सप्लाय लाईन योग्य प्रकारे उभी करता येत नव्हती. मग शेर शाहने शेवटची चाल केली.

शेर शाह यांनी त्यांच्या नावाने एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी मालदेवच्या काही सरदारांना वफादारी बदलल्याबद्दल आभार मानले.  शेरशाहने हे पत्र मालदेवच्या तंबूजवळ फेकले जेणेकरून ते कुणाच्यातरी हाताला लागू शकेल. शेर शाह यांची ही खेळी यशस्वी ठरली. भ्याडपणाच्या अफवेने मालदेव नाराज झाले. आता त्याला जोधपूर गमावण्याची भीती वाटत होती आणि त्याने जोधपूरच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला.

माघार घेणारच कि, एका स्त्रीमुळे लढाईचे स्वरूपच बदलले

असे म्हटले जाते कि, युद्धातून माघार घेण्याच्या निर्णयानंतर मालदेवचे दोन सेनापती जेता आणि कुम्पा हे दोन जवळच्या विहिरीकडे पाणी पिण्यासाठी गेले, यावेळी तिथे दोन महिलाही पाणी भरण्यासाठी तेथे आल्या होत्या. एका स्त्रीने दुसरीजवळ काळजी व्यक्त करत सांगितले की, अफगाण सैनिक खूप क्रूर आणि दुष्ट आहेत. ते आले तर आपले काय होईल? त्याला दुसऱ्या महिलेने उत्तर दिले कि,

“जोपर्यंत जेता आणि कुम्पा आहेत तोपर्यंत आपल्याला घाबरण्यासारखे काही कारण नाही”.

जेता आणि कुप्पा हे मारवाडच्या असोप ठिकाणाचे सरदार होते. कुम्पा हा नात्याने जेताचा काका लागत होता. दोघेही मालदेवच्या सैन्यात सेनापती होते. त्यांनी अजमेरचे शासक विरमदेव यांचा पराभव करून अजमेर, मेडता आणि डिडवाना या भागांवर मारवाडचा पंचरंगी झेंडा फडकवला होता. त्या बाईचं बोलणं ऐकून जेता आणि कुम्पा मालदेवच्या तंबूत गेले.

त्याने मालदेवला सांगितले की, त्याला गिरी-सुमेल सोडायचे नाही. यावर चर्चा केल्यानंतर मालदेव जेटा आणि कुम्पाच्या नेतृत्वाखाली दहा हजार घोडेस्वारांची फौज मागे ठेवून जोधपूरला वापस गेला.

४ जानेवारी १५४४ रोजी मालदेव जोधपूरला गेल्यानंतर कुप्पा आणि जेता यांनी शेर शाहच्या सैन्यावर हल्ला केला. शेर शाहला अपेक्षा होती की त्याचे ८०,००० घोडदळ काही तासांतच १०,००० राजपूतांना संपवेल. पण शेर शाहच्या अपेक्षेप्रमाणे काहीही घडलं नाही. कुप्पा आणि जेता यांच्या नेतृत्वाखालील राजपूतांनी लढाईचा चेहरामोहराच बदलला. काही तासांतच सम्राटाचे अर्धे सैन्य संपले.

लढाईमध्ये परिस्थिती  इतकी वाईट झाली कि, शेरशहाने मैदान सोडण्याची तयारी केली.

दिल्लीला परतण्यासाठी आपल्या घोड्यास्वारांना तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, त्यांचे जनरल खवास खान आले आणि त्यांनी कुम्पा आणि जेता यांना ठार मारल्याची माहिती दिली आणि अखेर त्यांच्या सैन्याने गंभीर नुकसानीसह लढाई जिंकली आहे. तेव्हाच शेरशहाने सुटकेचा नि:श्वास टाकला. जेता आणि कुंपा यांच्या शौर्याबद्दल ऐकल्यावर शेरशाह खवासला म्हणाला,

“मूठभर जोधपूरसाठी मी दिल्लीच्या सुलतानीला गमावले असते.”

या युद्धात कुम्पा आणि जेता यांच्या मृत्यूनंतर शेरशाहला मारवाडचा मोठा भाग काबीज करता आला. अजमेरपासून आबूपर्यंत हा भाग दिल्ली सल्तनतचा भाग बनला. जेता, कुम्पा यांच्या शौर्याच्या कथा राजस्थानी लोकपरंपरेचाच भाग बनल्या आणि खालीलप्रमाणे नोंदवल्या गेल्या. 

बोल्यो सूरी बैन यूँ, गिरी घाट घमसाण,
मुठी खातर बाजरी, खो देतो हिंदवाण.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.