मुक्ताईनगरवर दावा कोणाचा यावरून शिवसेना अन राष्ट्रवादी आमनेसामने आलेत

जसं महाविकास आघाडी स्थापन झाली तसं या तीन पक्षांमध्ये काहींना काही कारणास्तव बिघाडी चालूच राहतेय. आत्ताची बिघाडी म्हणजे जळगावातली. जळगावात सद्य मुक्ताईनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाजलं आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटल आणि एकनाथ खडसे, रोहिणी खडसेंमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. हे भांडण थोडं-थोडकं नसून अगदी टोकाला गेलं म्हणायला हरकत नाही. 

एकनाथ खडसे आणि रोहणी खडसेंकडून माझ्या जीवाला धोका आहे असा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात या वादाच्याच चर्चां रंगल्या आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व वाढतंय हे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आपल्या विरोधात कट-कारस्थाने रचले जातायेत. तसेच त्याचाच भाग म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे, मला काही बरं वाईट झालं तर त्याला खडसे कुटुंब जबाबदार असणार असल्याचे गंभीर आरोप मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याआधी देखील एका ऑडिओ क्लिपवरून जळगावात राजकारण तापले होते. 

नक्की हे प्रकरण काय आहे ?

त्यात मुक्ताईनगर हा खडसेंचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे चंद्रकांत पाटील हे रोहिणी खडसे यांचा पराभव करुन आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.  तेंव्हा चंद्रकांत पाटील हे शिवसेनेत होते, परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यामुळे मतदारसंघ भाजपकडे गेला. 

याचमुळे नाराज झालेल्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला रामराम ठोकत मुक्ताईनगरमधून भाजपविरोधात अपक्ष शड्डू ठोकला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना पाठबळ दिलं होतं. तेंव्हा तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः मुक्ताईनगरात भाषण द्यायला आले होते. मग काय चंद्रकांत पाटील निवडून तर आलेच पण त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा शिवसेनेलाच साथ दिली तर असं सगळं राजकीय चक्र चालूच होतं कि, खडसे कुटुंबाची योजना अशी होती कि,  एकनाथ खडसे विधानपरिषदेवर गेल्यास म्हणजेच जर राज्यपाल नियुक्त जागेसाठी मंजुरी मिळाल्यानंतर रोहिणी खडसे मुक्ताईनगरातून वारसा चालवतील. 

म्हणजेच एकीकडे खडसे कुटुंब मुक्ताईनगरावरचा दावा सोडणारे नाहीत, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचे राजकीय वर्चस्व वाढत असल्यामुळे दोन्ही गटांत राजकीय संघर्ष चालूच असल्याचे दिसून येते.

त्यामुळे पुढच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

कारण अलीकडेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना अप्रत्यक्षपणे शब्द दिला होता कि, “राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”ढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला. यातून स्पष्ट होतंय कि,  जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला. मात्र यामुळे झालं असं चंद्रकांत पाटील यांना शिवसेना समोर करतेय आणि त्याच मतदार संघातून राष्ट्रवादी रोहिणी खडसे यांना समोर आणतेय.  

आत्ताच झालेला वाद असाय कि…

बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान या राजकीय वादाची सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाद झाला असा आरोप राष्ट्रवादीने केलाय. तसेच मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत ते सगळे शिवसेनेवाल्यांचेच आहेत असा आरोप देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.   थांबले नाहीत तर त्यांनी तसं निवेदन पोलिसांना दिलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील या आरोपांना पलटवार करत आमचे नाही तर राष्ट्रवादीच्या लोकांचेच अवैध धंदे आहेत असा आरोप केलाय.

हा वाद कुठंतरी शांत झाला होता तितक्यात मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसेंचे कट्टर समर्थक आणि मुक्ताईनगर येथील शिवसेना आमदारांच्या समर्थकांमध्ये वाद चालू झाला. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हींच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

यात रोहिणी खडसे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षांचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. तसेच त्यांनी,  महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराबाबत आमदारांना चोप देण्याची भाषा वापरली होती. 

त्यानंतर “माता भगिनींबाबत असा प्रकार कुणी करत असेल, तर आम्ही कुणीही ते सहन करणार नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते, चंद्रकांत पाटलांचे पदाधिकारी आहे, त्यांना जर आमदारांनी आवर घातला नाही, समजूत घातली नाही, तर आम्ही शेवटी सगळ्यांना चोप देऊ,” असं देखील त्या म्हणाल्या.

तर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना बोलताना अशी मागणी केली आहे कि, “चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरनेच ‘त्या’ महिलेशी अश्‍लील भाषेत संभाषण केले असून त्या ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे आहेत. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा’ अशी मागणी केली. आता यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खडसेंनाच उलट आव्हान दिले आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे खडसे कुटुंबियांकडून माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली.

त्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला. असो राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रआले असले, तरीही जळगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये चालू असलेला संघर्ष थांबणार कि नाही, तसेच हा वाद वाढतच राहिला तर पक्ष श्रेष्ठी यात दखल घेतील हे पाहणे महत्वाचे आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

Webtitle : Muktainagar : Dispute between shivsena MLA Chandrakant Patil and eknath khadse and Rohini khadse on muktainagar

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.