आणि एका टेक्स्टाईल कंपनीमधून भारतातल्या सर्वात फेमस सिंटेक्स टाकीचा जन्म झाला..

सिंटेक्स टाकी.. नाव तर ऐकलंच असेल ? लहानपणापासून आपण आपल्या घरात ,गच्चीवर, अंगणात या नावाची अगदी जाडजूड , मजबूत टाकी पाहत आलोय. तेंव्हा डोक्यात प्रश्न यायचा कि, २४ तास पाणीसाठा असलेली हि टाकी इतके वर्ष कशीकाय टिकून आहे ?

या दणकट टाकीच्या मागे एक मजबूत कहाणी देखील आहे, ती अशी कि…

या सिंटेक्स वाटर टॅंक चे सर्वेसर्वा मा. सत्यनारायण डांगायच !

ते कंपनीचे मालक नाहीत परंतु कंपनीच्या यशामागचा खरा चेहरा आहेत. कंपनी उभारण्यासाठीचे त्यांचे योगदान इतके बहुमोल आहे कि, त्यांनी घेतलेले निर्णय म्हणजे कंपनीचे अंतिम निर्णय असतात.

ते या कंपनीत आले आणि या कंपनीलाच एका दत्तक घेतलेल्या बाळासारखे लहानाचे मोठे केले. कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये एकाच प्रोडक्शनला कोण इतके दिवस निस्वार्थपणे टिकून राहतं?  पण सत्यनारायण यांनी ते योगदान ३४ वर्षांपेक्षा जास्त दिलं ..

सत्यनारायण डांगायच हे मुळचे गुजरातचे , मुंबईमध्ये गर्जुएशन पूर्ण करून आयआयएम अहमदाबाद येथे शिक्षणासाठी दाखल झाले तेंव्हा ते १८ वर्षाचे पण नव्हते. तेथील शिक्षण पूर्ण करून ते एशीयन पेंट्स मध्ये जॉईन झाले, वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी.

त्याकाळी एशीयन पेंट्स एक नामांकित कंपनी होती तिथे काम करणे म्हणजे मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जायची.

परंतु सत्यनारायण तिथे फार जास्त काळ रमले नाहीत, दोन वर्ष होत आले आणि त्यांनी ती कंपनी सोडली नवीन काहीतरी करून बघावे या उद्देशाने !

आयआयएम अहमदाबाद च्या नोटीस बोर्डवरची एक जाहिरात त्यांना दिसली, द भारत विजय मिल्स प्राइवेट लिमिटेड टेक्स्टाईल कंपनी जे प्लास्टिकच्या मार्केट मध्ये उतरू पाहत होती, आणि सत्यनारायण यांनी मनाशी विचार पक्का केला कि, आपली जागा तिथेच आहे, जिथे आपले ज्ञान आणि कष्ट वापरण्याची मोकळीक असेल.

सुरुवातीला भारत विजय मिल्स वस्त्रोउद्योगात होती परंतु भविष्याचा वेध घेता त्यांनी प्लास्टिक आणि केमिकल्स क्षेत्रात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवात ३० लाखांच्या भांडवलापासून झाली.

कंपनीचे मालक पटेल ग्रुप ने या व्यवसायाच्या पुढील रणनीती आखण्यासाठी सत्यनारायण यांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा शब्द दिला आणि सत्यनारायण हि वेळोवेळी स्वतःला सिद्ध करत पुढे जात राहिले.

काहीच महिन्यातच डांगायच आणि पटेल हे एक जणू कंपनीच्या यशाचे समीकरण बनले.  

सत्यनारायण डांगायच १९७४ मधील सप्टेंबर मध्ये कंपनीला जॉईन झाले तोच डिसेंबरपर्यंत त्यांना कंपनीचा manager बनविण्यात आले तेंव्हा त्यांचे वय होते अवघे २२.  इतक्या कमी वयात कंपनीच्या एका प्लास्टिक विभागाचे सर्व निर्णय,उत्पादन कोणत्या वस्तूचे घ्यायचे, कोणती स्त्रातागी वापरायची, प्रोडक्शन टीम कोणती ठरवायची इत्यादी सर्व निर्णय सत्यनारायण ठरवत होते.

याच छोट्याशा प्लास्टिक डीपार्टमेंटचा चार्ज सत्यनारायण यांनी सांभाळला पुढे जाऊन त्याचा इतका मोठा ब्रंड बनला आहे कि भारत विजय मिल्स या प्लास्टिक ब्रान्ड मुळे ओळखली जाऊ लागली. पुढे जाऊन याचेच नाव ‘सिंटेक्स’ होणार होते.

सिंटेक्स नाव ‘सिंटरिंग’ पासून पडलं जी एक प्लास्टिक बनविण्यामधील प्रक्रिया आहे. आणि हे नाव ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारत विजय मिल्सच्या दोन्ही उप्त्पादनांना सिंटरिंग आणि टेक्स्टाईल्सला जोडत होतं, तसच म्हणायलाही सिंटेक्स सोप्पं नाव होतं.

आता हाच सिंटेक्स ब्रॅण्ड पाण्याच्या टाकीला पर्याय बनला आहे.

सिंटेक्स टाकीची विक्री  जसजशी वाढतच जात होती मग कंपनीने औद्योगिक कंटेनर बनवायला सुरुवात केली. ओईल,लिक्विड, सॉलिड स्वरुपातील ने-आण करण्यासाठी याचाही खप वाढायला लागला.  आता हा उद्योग ठीकठाक रुळावर आला होता. १९७५ मध्ये सिंटेक्सने ३ लाख चा टर्नओवर, त्याच्या पुढच्या वर्षी वीस लाख, त्याच्या पुढे साठ लाख असा वाढतच गेला ..थांबला नाही !

त्यानंतर ब्रॅण्डने दर ३ वर्षाला वेगवेगळी वस्तू बाजारात आणणे सुरु केले, ज्याची कल्पना १० वर्ष आधी कुणी केलीही नसेल. असे करत करत १९८४ -८५ मध्ये कंपनीने प्लास्टिक सबंधित वस्तू , खिडक्या, दारे, पार्टिशन बनविणे सुरु केले. प्लास्टिकची दारं, पार्टिशन बनविण्यात कंपनी यशस्वी झाली परंतु खिडक्या बनविण्यात कंपनी आजतागायत यशस्वी नाही झाली.  तरीही १९९८ – ९९ मध्ये  सिंटेक्सचा टर्नओवर १७० करोड इतका होता.

काही वर्षांपूर्वीच कंपनीने आपल्या प्रसिद्ध ब्रॅण्डचा फायदा घेत भारत विजय मिल्स हे नाव बदलून सिंटेक्स हे नामकरण करण्यात आले आणि त्याचदरम्यान कंपनीचा टर्नओवर १००० करोडचा हि टप्पा पार केला होता.

हे सर्व शक्य झाले एका धडपड्या तरुणामुळे ज्याने स्वतःची कंपनी समजून वेगवेगळे प्रयोग करीत राहिला, परंतु कधीही त्यावर स्वामित्व (मालकी)गाजवली नाही, कितीतरी जोखीम उचलल्या आणि शेवटी एक असा मास्टरपीस बनवला जो गरीबांपासून श्रीमंताच्या घरात देखील उपयोगी येतो !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.