म्हणून आपल्या लोकसभेत ४२० क्रमांकाचे आसन नाही

गाडीला, मोटारसायकला लकी नंबर मिळावा म्हणून भारतात लाखो रुपये खर्च करणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येकाच्या मनात एक लकी नंबर असतोच. त्याच नंबरचे टी-शर्ट घातले, गाडीचा नंबर मिळाला तर आपण चांगली कामगिरी करू असे वाटतं. त्यामुळे तो मिळविण्यासाठी धडपड केली जाते.

अशाच प्रकारे भारतात ४२० नंबर चांगला समजण्यात येत नाही.

त्याचा संबंध फसवणूक, धोकेबाजेशी लावण्यात येतो. यामुळे ४२० नंबरबद्दल अनेकांचे चांगले मत नाही. व्यक्तिगत जीवनात एखादा व्यक्ती ४२० नंबर टाळत असेल तर ती गोष्ट मान्य करण्यासारखी आहे पण थेट लोकसभेत ४२० क्रमांकाच आसन नको म्हणणारे खासदार देखील आपल्याकडे आहेत.

विशेष म्हणजे ती मागणी मान्य करणारी सिस्टीम देखील आपल्याकडे आहे.

लोकसभा/ राज्यसभेतील सदस्यांना एक नंबर देण्यात येतो. संसदेतील मतदानावेळी तो नंबर ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे तो नंबर महत्वाचा समजण्यात येतो.

४२० नंबर बाबत काय वाटत

भारतीय दंड संहिता (आयपीसी) ४२० हे कलम आहे. लोकांची फसवणूक, धोकेबजे केल्या प्रकरणी  हे कलम लावण्यात येते. भारतात जर कोणाला उद्देशून ‘४२०’ म्हणाले म्हणजे तो फसवणूक करणारा आहे असे समजण्यात येते.

जर आपल्या नावासोबत हा नंबर लागला तर त्याचा गैरफायदा विरोधक घेतील अशी भावना खासदारांना वाटते. त्यामुळे लोकसभेत मिळणारा ४२० आसन नंबर खासदार स्वीकारण्यास तयार नसतात.

१५ व्या लोकसभेत ४२० नंबरचे आसन कोणाला मिळाले होते

आसाम मधील धुबरी लोकसभा मतदारसंघातून मौलाना बदरुद्दीन अजमल निवडून आले होते. त्यांना १५ व्या लोकसभेत त्यांना ४२० नंबरचे आसन मिळाले होते. इतर सदस्याप्रमाणे त्यांनी ४२० नंबरचे आसन नाकारले.

बदरुद्दीन अजमल यांनी लोकसभा सचिवालयाशी संपर्क साधून आपला आसन क्रमाक बदलून मिळावा अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यांना ४२० ऐवजी ४१९-अ नंबरचे आसन दिले गेले. बदरुद्दीन अजमल हे देशातील पहिले लोकसभा सदस्य आहे ज्यांना ४१९-अ नंबरचे आसन देण्यात आले होते. 

कोण आहेत मौलाना बदरुद्दीन अजमल

मौलाना बदरुद्दीन अजमल हे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख आहेत. ७२ वर्षीय बदरुद्दीन अजमल हे आसाम मधील धुबरी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा ते निवडून आले आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली ५०० मुस्लिमांमध्ये त्यांची नियमित नोंद करण्यात येते.

आसाम मधील बंगाली भाषा बोलणारे गरीब आणि मागास मुस्लीम धर्मियांचे नेतृत्व बदरुद्दीन अजमल करतात.

अशा प्रकारे आसन क्रमांक नाकारणारे पहिले आहेत का?

४२० नंबरचे  नाकारणारे बदरुद्दीन अजमल हे पहिले नाहीत. १४ व्या लोकसभेत सुद्धा ४२० नंबरचे आसन नाकारण्यात आले होते. तत्कालीन लोकसभा अध्यक्षांकडे ४२० आसन क्रमांकाबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यांना तो बदलून देण्यात आले होते.

१५ व्या लोकसभेत मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी आसन क्रमांक बदलून मागितल्याने त्यांना ४१९-अ देण्यात आला आहे.

आताच्या लोकसभेत ५५२ खासदार बसतील एवढी आसन क्षमता आह. त्यात ५३० राज्याचे प्रतिनिधी करणारे, केंद्रीय शासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे २० सदस्य आणि राष्ट्रपती नियुक्त अँग्लो इंडियन समाजाचे दोन सदस्य.

मात्र यात ४२० क्रमांकाचे आसन नाही. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.