स्टॅलिन, केसीआर ते चंद्राबाबू यांनी त्यांची पुढच्या पिढीची राजकारणात अशी सोय केली आहे

साऊथच्या आणि नॉर्थकय राजकारणात आपल्याला अनेक फरक दिसतील मात्र भारताच्या संपूर्ण राजकारणात पळायला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे घराणेशाही. एक केरळचा थोडा अपवाद सोडलं  तर साऊथची प्रत्येक पार्टी एका घराण्यानेच चालवली आहे.

आता हा मुद्दा चर्चचेत येण्याचं कारण म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपला मुलगा उदयनिधी स्टॅलिन याला मंत्रिमंडळात समावेश करून घेतलं आहे आणि अशाप्रकारे करुणानिधी यांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे.

मात्र याआधीही चंद्राबाबू नायडू, केसीआर यांनी आपल्या मुलांना थेट मंत्रिमंडळात घेऊन त्यांची सोय करून ठेवली आहे. त्यामुळे जाणून घेऊया या राजकुमार राजकारणात सेटल कसे झाले.

सुरवात करूया करुणानिधी यांच्या घराण्यापासून 

2009 मध्येव एम. करुणानिधी यांनी स्टॅलिनला त्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील करून घेतले होते. पण मंत्रिमंडळात समावेश होण्याआधीच स्टालिन राजकारणात आले होते. त्यापैकी चेन्नईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली होती.

स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात घेण्यामागे करुणानिधी यांनी त्यांची प्रकृती ठीक नाहीये त्यामुळे स्टॅलिनला मदतनीस म्हणून घेत असल्याचं कारण दिलं होतं.

मात्र प्रत्यक्ष मंत्रिपद स्वीकारणाच्या आधी स्टालिन यांनी एका मास लीडरची छबी बनवली होती.

त्यामुळे त्यांचं ते ट्रांझ्याकशन तितकं अवघड गेलं नाही. मात्र त्यांच्या उदयानिधि यांचं तसं नाहीये. ते राजकारणात नवखे आहेत तरी त्यांना केवळ घराणेशाही असल्याने मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

यामुळे करुणानिधी यांच्या नात्यातील जण आता राजकारणात आले आहेत. मात्र उदयनीधी यांचा थेट मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने तेच स्टॅलिन यांचा वारसा चालवणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

उदयानिधि आणि स्टालिन यांच्यासारखाच अजून बाप पोराची जोडी मंत्रिमंडळात आहे ती तेलंगणात

केसीआर आणि केटीआर 

त्यांचे वडील केसीआर  म्हणजेच के चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळातील माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग आणि वाणिज्य ते पंचायत राजपर्यंतचे मंत्री अशी महत्वाची खाती केसीआर यांचा मुलगा केटीआर म्हणजेच के टी रामाराव यांच्याकडे आहेत.

केटीआर यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत केसीआरच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष म्हणून केटीआर यांची निवडणुकीसाठी तिकीट वाटप आणि पक्षातील मतभेद हाताळण्यात महत्वाची भूमिका असते. त्यामुळे मास लीडर जरी नसले तरी केटीआर यांची पक्षावर पकड आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून जेव्हा भारत राष्ट्र समिती म्हणून करण्यात आलं आहे आणि पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येणाची तयारी करत आहे त्यामध्ये केटीआर यांचा मोठा रोल असल्याचं सांगण्यात येतं.

तेलंगणानंतर अशीच एक जोडी आंध्र प्रदेशात देखील होती.

चंद्राबाबू आणि नरा लोकेश 

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश 2017 मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि पंचायत राज मंत्री म्हणून आपल्या वडिलांच्या मंत्रिमंडळात सामील झाला होता. त्यावेळी राज्यात कॅपिटल आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे.

राज्याला टेक्नॉलॉजि क्षेत्रात पुढे जायचं आहे त्यामुळे नरा लोकेश यांचं उच्चशिक्षित नेतृत्व गरजेचं असल्याचं कारण चंद्राबाबू नायडू यांनी नारा लोकेश याचा मंत्रिमंडळात समावेश करताना दिलं होतं.

लोकेश स्वतःला सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला.

विशेषत: तो 2019 मध्ये वायएसआर काँग्रेसच्या रामकृष्ण रेड्डी यांच्याकडून मंगळगिरी येथून पहिलीच निवडणूक नारा लोकेश हरला. नारा लोकेश यांचा जनसंपर्कही नव्हता. त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं.

त्यामुळे  केटीआरच्या विपरीत लोकेश अजूनही त्याच्या वडिलांच्या सावलीत आहे आणि अजूनही “नायडूचा मुलगा” म्हणून ओळखला जातो. आजही जेव्हा चंद्राबाबूं नायडू यांच्या तेलगू देसम वर अस्तित्वाचाच प्रश्न आहे तरीही नारा लोकेश कुठेही दिसत नाहीत.

राजकारणात आलेली ह्ये तिघंही सध्या वडिलांच्या करिष्म्यावर तग धरून आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे तिघं स्वतःला कसं सिद्ध करतात यावर त्यांचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.