ठाकरेचं स्पेलिंग Thakre ऐवजी Thackeray, यामागे आहे विल्यम मेकपिस ठाकरे कनेक्शन

आमचा एक मित्र उद्धव ठाकरेंबद्दलची माहिती गुगलवर सर्च करत होता. त्यानं आपलं सहज नाव गुगल केलं. Udhav Thakre पण गुगलने नावाची दुरुस्ती केली. डिड यू मिन Udhav Thackeray अस आलं. मित्राला विशेष वाटलं.

गडी आला आमच्याकडं आणि विचारलं हे अस कसं काय thakre हेच स्पेलिंग बरोबर आहे हे Thackeray इतकं अवघड कस काय…? 

तसा प्रश्न पण बरोबर आहे जो उच्चार तेच स्पेलिंग. ठाकरे यांच स्पेलिंग Thakre इतकं सोप्प असायला हवं पण ते Thackeray अस कस काय? बर हे फक्त उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच आहे का तर तस पण नाही.

राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे सर्वांचे स्पेलिंग Thackeray अशीच. पण या स्पेलिंगनुसार उच्चार करायचा तर ते नाव पण ठाच्करे वगैरे टाईप येत.. 

पण सुरू केली शोधाशोध? अस का? अस का? तेव्हा एक भन्नाट स्टोरी हाताला लागली.. 

मुळात ठाकरे यांच्या आडवाचं स्पेलिंग हे Takre असचं होतं पण ते बदललं ते प्रबोधनकार ठाकरेंनी आणि त्याला कारणीभूत होते विल्यम मेकपिस ठाकरे.. 

William Makepeace Thackeray by Jesse Harrison Whitehurst crop

विल्मय मेकपिस ठाकरे हे एक साहित्यिक होते. कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते. वडिलांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १८१७ साली ते पुन्हा आपल्या देशात गेले. केंब्रिज स्कूलमध्ये शिक्षण झाल्यानंतर युरोप भ्रमंतीस त्यांनी सुरवात केली. त्यानंतर पत्रकारिता आणि चित्रकला हा विषय त्यांनी निवडला. पुढे फ्रेजर्स मॅगझिनमध्ये त्यांनी लिखाणास सुरवात केली.

पुढे त्यांनी कथा, कादंबऱ्या लिहण्यास सुरवात केली.

त्यांच्याबाबतची अधिक माहिती तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता

दूसरीकडे ठाकरे कुटूंबाची सुरवातीची आडनावे वेगळी होती.

नाशिकजवळच्या धोपड किल्ल्याचे ते किल्लेदार असल्याने त्यांच पहिलं ज्ञात आडनाव हे धोपडकर होतं. त्यानंतर ठाकरे कुटूंब पनवेल येथे आलं. तेव्हा ठाकरे कुटूंबाची ओळख पनवेलकर अशी झाली.

बाळासाहेबांचे वडील अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांच सुरवातीचं आडनाव देखील पनवेलकर असल्याचं सांगितलं जातं. पण प्रबोधनकार ठाकरेंवर या विल्यम्स ठाकरेचा प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी ठाकरे आडनाव लावण्यास सुरवात केली.

विल्यम ठाकरेंच्या आडनावाचं स्पेलिंग हे Thackeray अस असल्यानं प्रबोधनकारांनी देखील आपल्या आडनावाचं स्पेलिंग  Thakre पासून Thackeray अस केलं. पुढे बाळासाहेब ठाकरेंनी देखील सुटसुटीतपणे Thakre अस स्पेलिंग न करता Thackeray याच स्पेलिंगला प्राधान्य दिलं. आणि मग हेच स्पेलिंग पुढे कंटिन्यू होत गेलं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.