मुघलांप्रमाणे हुक्का पिणारे, दरबार भरवणारे ब्रिटिश अधिकारी भारतात होऊन गेलेत

ब्रिटिश भारतात आले आणि पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर लादली असा आरोप अनेकवेळा करण्यात येतो. मात्र असेही ब्रिटिश अधिकारी होऊन गेले ज्यांना इथली संस्कृती आवडली आणि त्याप्रमाणेच वागू, राहू लागले.

साधारण २०० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. 

जेव्हा जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात येऊन स्थिरावत होती. इथली आपली पकड मजबूत करत होती. तर दुसरीकडे मुघल साम्राज्य अस्ताला जात होते. प्लासीच्या लढाईत विजय मिळाल्याने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल आणि बिहारमधील महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला होता. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची भरभराट होऊ लागली.

याच वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा संबंध मुघलांशी येऊ लागला होता. मुघलांच्या राहिमानाने प्रभावित झाले होते. त्यांचे कपडे, त्यांचा लवाजमा, भरविण्यात येणार दरबार यामुळे ब्रिटिश प्रभावित झाले. 

त्यावेळी भारतात राहणाऱ्या अनेक ब्रिटीशांनी आपले इंग्रजीपण सोडले होते. ते भारतीय लोकांप्रमाणे कपडे घालू लागले. उर्दू शेरो-शायरी कार्यक्रम घेऊ लागले.  मुघलांप्रमाणेच  ब्रिटिशांनी भारतीय महिलांशी विवाह केला तर काहींना दासी म्हणून ठेवले. यातलं एक उदाहरणं म्हणजे ब्रिटिश अधिकारी सर डेव्हिड ऑक्टरलोनी. 

डेव्हिड ऑक्टरलोनी तर दिल्लीत पांढरा मुघल म्हणूनच ओळखू लागले होते.

डेव्हिड ऑक्टरलोनी हे १८ व्या वर्षी कॅडेड म्हणून भारतात आले होते. त्याच प्रमोशन करून १८०० मध्ये लेफ्टनंट जनरल करण्यात आले. त्या काळात दिल्लीवर मुघल सम्राट शाह आलम याचे राज्य होते. १८०४ मध्ये मराठा सरदार यशवंतराव होळकर यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते.  

डेव्हिड ऑक्टरलोनीने मुघलांना साथ देत हे आक्रमण परतवून लावले होते. यावर खूश होऊन शाहआलमने डेव्हिडला ‘नासिर उद-दौला’ म्हणजेच राज्याचा संरक्षक ही मुघल पदवी देऊन गौरव केला. त्यांची मुघल दरबारात ब्रिटिश रहिवासी म्हणून नियुक्ती झाली.

दिवसा तो शिस्तप्रिय अधिकाऱ्याप्रमाणे सगळी कामे करायचा. सगळीकडे लक्ष ठेऊन असायचा. मात्र संध्याकाळी तो पूर्णपणे बदलून जायचा. तिथले लोक म्हणायचे की  डेविड ऑक्टरलोनी खरं रूप जे संध्याकाळ नंतरच पाहायला मिळते. एकदा संध्याकाळ काय झाली त्याचे रूपांतर हे मुघलांमध्ये झालेले असायचे.

रोज संध्याकाळी डेविड ऑक्टरलोनी आपल्या १३ बायकांसह हत्तीवर स्वार होऊन यमुना नदी काठी  आणि लाल किल्ल्यावर फिरायला जात असे. त्याच्या १३ बायका १३ वेगवेगळ्या हत्तींवर स्वार व्हायच्या. तर तो स्वतः सगळ्यात वेगळ्या हत्तीवर असायचा. तो फक्त जास्त गोरा असल्याने मुघलांपेक्षा वेगळा दिसत असे. डेविड ऑक्टरलोने मुघलांची सगळी जीवनशैलीचे अंगिकारली होती. त्यांच्या सारखे कपडे घालणे, हुक्का पिणे आणि गाण्यांचा दरबार भरविणे. हा सगळ्या गोष्टी त्याच्या दिनक्रमाचा भाग झाला होता. 

एकदा डेव्हिड ऑक्टरलोनीला भेटण्यासाठी कलकत्त्याचे बिशप हेबर आले होते. 

डेव्हिड हे मुघलांप्रमाणे राहू लागल्याने ते हैराण झाले. मुघलांप्रमाणे दिवाणावर बसलेल्या ऑक्टरलोनीने हेबरचे स्वागत केले. अंगावर हिंदुस्थानी जामा आणि डोक्यावर फेटा होता असा त्यांचा पेहराव होता. तर आजूबाजूला त्यांचे सेवक हवा घालतं होते. 

यानंतर हेबर लिहतात की, ऑक्टरलोनीच्या तंबूच्या दुसऱ्या बाजूला लाल रेशमी कापडाचा आणखी एक तंबू होता. तिथे त्याच्या १३ बायका होत्या. हेबर एकदा दिल्लीतील राजपुताना भागातून जात होता. त्यावेळी त्यांना वाटले की, एखादा मुघल राजा तिथून जात आहे. मात्र थोडं पुढे गेल्यावर तो ताफा डेव्हिडचा होता. हे पाहून हेबरला  मुघलांची आठवण झाली. मुघलांप्रमाणेच या ताफ्यात मोठ्या प्रमाणात हत्ती, घोडे होते. 

ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स अकिलीस कर्कपॅट्रिक हे देखील मुघलांप्रमाणे राहू लागले होते.

जेम्स अकिलीस १७९८ ते १८०५ दरम्यान हैद्रराबाद येथे राहत होते. ते प्रेसिडेन्सी आर्मीमध्ये कर्नल होते. मात्र ते घरी एकदम मुघलांसारखे राहत होते. जेम्स हे मुघलांप्रमाणे कपडे घालत, सतत हुक्का पीत, तोंडात खात तर रात्री नाच गाण्याच्या कार्यक्रम घेत.  तो भारतीय असल्या प्रमाणे हिंदी आणि फारसी भाषा बोलायचा. यामुळे जेम्स  हैदराबादच्या उच्चभ्रू लोकांचे मिसळून गेला होता. 

फक्त गोरा असल्याने तो वेगळा असल्याचे जाणवायचे. जेम्सला हैदराबादच्या निजामाने मुतामिन-उल-मुल्क, हुश्मत जंग अशा अनेक पदव्या देऊन गौरविले होते. १८०० साली जेम्स खैर-उन-निसा नावाच्या एका मुस्लिम स्त्रीच्या प्रेमात पडला. त्याने धर्मांतर केले आणि तिच्याशी लग्न केले. 

अशा प्रकारे ब्रिटिश अधिकारी भारतीय आणि मुघलांप्रमाणे राहू लागले होते. ते हरम तयार करून राहू लागले होते. हरम म्हणजे एकच राजाच्या अनेक बायकांना राहण्यासाची जागा. त्यामुळे कंपनीला  काळजी वाटू लागली होती. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने भारतात येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना भारतीय मुलींच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देत. तसेच कंपनीने भारतीय मुलींशी वैवाहिक संबंध देखील ठेवू नयेत असा इशाराही दिला होता. मात्र इथं आल्यावर अनेक ब्रिटिश अधिकारी भारतीय संस्कृतीच्या, मुलींच्या प्रेमात पडले आणि लग्न केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. 

अनेक ब्रिटिश अधिकारी मुघलांच्या प्रेमात तर होतेच. त्यांचे कपडे, जीवनपद्धती सुद्धा स्वीकारल्याचे पाहायला मिळते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.