तालिबान्यांना सत्तेत हिस्सा मागणारे हक्कानी नेटवर्क नेमकं काय आहे?

अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे हक्कानी नेटवर्क ची ! हक्कानी नेटवर्क काय आहे ?

हक्कानी नेटवर्क चे तीन पॉवरफुल लोकं कोण ?

अमेरिका आणि पाकिस्तान मदतीने मुजाहिद्दीन रशियान सैनिकाला अफगाणिस्तान मधून बाहेर काढत होते. त्यावेळी या मुजाहिद्दीना सोबत पकतीया प्रांतातून एक जण आला होता. त्याचे नाव होते जलाल्लुदिन हक्कानी.

यावेळी अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएच्या नजरेत पहिल्यांदा जलाल्लुदिन हक्कानी आला. अफगणिस्तान मध्ये रशिया असतांना जलाल्लुदिन हा अमेरिकेच्या गळ्यातील ताईत बनला होता. महत्वाचे म्हणजे एकदा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी भेट सुद्धा त्यांनी घेतली होती.

यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी जलाल्लुदिन हक्कानी आणि इतर मुजाहिद्दीनांचा ‘फ्रीडम फायटर’ असा गौरवोद्गार काढले होते.

मुजाहिद्दीनामुळे रशिया हरविणे सोपे झाले होते. युद्ध संपले आणि मुजाहिद्दीन नजीबुल्लाह सरकार पाडण्याचा योजना करू लागले होते. यात हक्कानी नेटवर्कचा सुद्धा सहभाग होता. नजीबुल्लाह यांनी राजीनामा नंतर इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणीस्तानची स्थापना झाली. या सरकार मध्ये जलाल्लुदिन हक्कानीला कायदा मंत्री बनविण्यात आले होते.

दरम्यान १९९४ मध्ये तालिबानची स्थापना झाली. हक्कानीला वाटले के पुढे जाऊन तालिबानी यांची सत्ता येऊ शकते. त्याने तालिबानकडे मोर्चा वळविला. १९९६ च्या डिसेंबर महिन्यात तालिबानांनी काबुल मिळविले त्यावेळी हक्कानी नेटवर्क तरुण सुद्धा सोबत होते. तालिबान सरकार मध्ये जलाल्लुदिन हक्कानीला एक मंत्रालय देण्यात आले त्याच बरोबर पकतीया प्रांताचे राज्यपाल पद सुद्धा देण्यात आले.

९/ ११ च्या हल्ल्यानंतर अमेरिका ओसामा बिन लादेन शोध घेत होती.

रशिया विरोधातील युद्धात ओसामा हा जलाल्लुदिनच्या देखरेखे खाली काम करत होता. त्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती. त्यामुळे अमेरिकेने जलाल्लुदिन सोबत डील करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने साफ नकार देत तालिबान सोबत जाने पसंद केल होते. स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरवोद्गार काढलेले जलाल्लुदिन आता मोस्ट वान्टेड आतंकवादी म्हणून घोषणा केली होती.

९/११ हल्ल्या नंतर अमेरिका अफगाणिस्तान मध्ये घुसली. डिसेंबर २००१ मध्ये तालिबानला सत्ता सोडावी लागली. हक्कानी नेटवर्कला पण अफगाणिस्तान सोडावे लागले. त्यांना शरण दिली ती पाकिस्तान मधील उत्तरी वजीरीस्थान प्रांतात.

दुसरे नाव सिराजुद्दीन हक्कानी…जलालुद्दीनच्या मृत्यूनंतर ते हक्कानी नेटवर्कचा तो प्रमुख आहेत. सिराजुद्दीन गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानात अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड आहे. एफबीआयच्या वेबसाइटवरील ‘ग्लोबल टेररिस्ट’च्या यादीत त्याचे नाव अजूनही आहे.

मध्यंतरी जलाल्लुदिन हक्कानीची तब्बेत बिघडली. त्यामुळे नेटवर्कचा सगळे काम त्याचा मुलगा सिराजुद्दिन हक्कानी करू लागला होता. सिराजुद्दिन हा बापा पेक्षा अधिक कट्टर आणि हिंसक होता.  याच दरम्यान हक्कानी नेटवर्कला आयएसआयचा फुल सपोर्ट मिळाला. मात्र पाकिस्तान ने नेहमी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याच सिराजुद्दीनवर अमेरिकेने ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. भारतीय दूतावासावरील हल्ल्यातही त्याचा सहभाग आहे.

याच सिराजुद्दीन हक्कानीला अफगाणिस्तानचा नवा तालिबान सरकारने गृहमंत्री बनवण्यात आलं आहे .

तिसरे नाव अनस हक्कानी आहे. गेल्या काही दिवसांपासून, अनास हक्कानी यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई, काबूलचे कसाई गुलबदीन हेक्मेतयार आणि अश्रफ घनी सरकारमधील सहाय्यक अब्दुल्ला अब्दुल्ला यांची भेट घेतली. सत्ता हस्तांतरणाचे नाटक घडवण्यासाठी या बैठका घेतल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

हक्कानी नेटवर्क काय काम करत?

हक्कानी नेटवर्कचे किमान ६,००० जत्थे काबूलमध्ये ऍक्टिव्ह आहेत.  अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये हक्कानी नेटवर्कचा सहभाग आहे. यामध्ये शेकडो अफगाण नागरिक, अमेरिका आणि इतर देशांच्या सैन्याचे सैनिक आणि सरकारी अधिकारी मरण पावलेत. हक्कानी नेटवर्कच्या तीन सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक २७ एप्रिल २००८ रोजी झाला, जेव्हा तालिबानसह हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी तत्कालीन अफगाण अध्यक्ष हमीद करझाई यांच्यावर हल्ला केला.

हा हल्ला एका हाय प्रोफाईल लष्करी परेड दरम्यान झाला होता, ज्यात अमेरिकेचे राजदूतही उपस्थित होते. ही घटना बंदूकधाऱ्यांनी आत्मघातकी हल्लेखोरांसह केली होती. या हल्ल्यात एका अफगाणिस्तानच्या खासदारासह तीन जण ठार झाले.

असे म्हटले जाते की, अफगाणिस्तानच्या राजधानीवर हा पहिला मोठा हल्ला होता.

अफगाण- रशिया युद्ध थांबल्यानंतर अमेरिकेने मुजाहिद्दीनाला देण्यात येणारी मदत देणे बंद केले होते. पण युद्ध संपूर्ण संपले नव्हते. याच वेळी जलाल्लुदिन हक्कानी अरब देशांच्या यात्रेवर गेला होता. सोव्हिएत युद्धात, त्याला स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले गेले. तसेच, त्याला एक अरब पत्नी होती. त्याने या कनेक्शनचा फायदा घेतला. अरब देशांनी हक्कानी नेटवर्कला प्रत्येक प्रकारे मदत केली. मशीद किंवा मदरसा बांधण्याच्या नावावर पैसे पाठवले गेले. नंतर ते शस्त्रांच्या खरेदीसाठी वापरले गेले.

याशिवाय, खंडणी, संरक्षणाचे पैसे आणि इतर अनेक प्रकारच्या अवैध धंद्यातूनही पैसा येतो. जलालुद्दीनचा एक मुलगा बदरुद्दीन हक्कानी अपहरणाचा व्यवसाय सांभाळत होता. २०१२ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात तो ठार झाला. तालिबान सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

 कधीकधी तर असं वाटतं कि,  हक्कानी नेटवर्क तालिबानचाच एक भाग असून. हे नेटवर्क तालिबानपेक्षा कट्टरपंथी आणि हिंसक आहे.

त्याची स्वतःची काम करण्याची वेगळी पद्धत आहे. त्याचे अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी घनिष्ठ संबंध आहेत. हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांना सर्व प्रकारची मदत पुरवते. आता तो अफगाणिस्तानात सरकार चालवत आहे. म्हणजेच त्याच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी त्याच्याकडे संपूर्ण देश ताब्यात आहे. जिथे त्याला आव्हान द्यायला कोणी नाही. साहजिकच ही भारत आणि उर्वरित जगासाठी धोक्याची घंटा असणार आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.