अठरा पगड जाती धर्माचे सभासद असणारी आगळी वेगळी बँक शाहू महाराजांनी सुरु केली होती.

भारतातले समाजसुधारक म्हणले एक नाव नेहेमीच आदरास्थानी राहते …ते म्हणजे  छत्रपती शाहू महाराज !!!!!

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात ते उगीच नाही म्हणत….

सर्वांचे लाडके शाहू भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू असे अनेक नावाने प्रसिद्ध एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेचं आधार म्हणजे शाहू राजे. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवणारे म्हणजे शाहू राजे.

तर मग आज आपण बोलणार आहोत कोल्हापूरच्या अर्बन बँकेबद्दल..जी शाहू महाराजांनी सुरु केली आहे. 

आपल्या प्रजेवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणान्या छ. शाहू महाराजांनी सर्वसामान्य स्तरावर जगणाऱ्या कारागीर, छोटे व्यापारी, मजूर, शेतकरी यांसारख्या नागरिकांच्या उन्नतीच्या दृष्टीने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयापैकी एक निर्णय म्हणजे ‘दि कोल्हापूर को-ऑप. बँकेची’ स्थापना होय. जी कोल्हापुरातील पहिली वहिली बँक होती.  

खाजगी सावकारी पाशामुळे भरडल्या गेलेल्या रयतेची व्यथा मा. भास्करराव जाधव यांनी छत्रपतींच्या नजरेस आणून दिली आणि २४ सप्टेंबर १९९३ साली ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया जन्मदिवसाचे औचित्य साधून म्युनिसिपल ऑफिस कोल्हापूर येथील एक छोट्या खोलीत या संस्थेचा श्रीगणेशा झाला.

धर्म, जात, आर्थिक अगर सामाजिक उच्च नीचभाव असा कोणताही भेदभाव न बाळगता संस्थेच्या संस्थापकांनी समाजाच्या सर्वच थरांतील लोकांना सभासदत्व दिले. अठरा पगड जाती धर्माचे सभासद असणारी ही आगळी वेगळी बँक खूपच कमी काळात एक विश्वासपात्र संस्था बनली होती. 

व्याप वाढत गेला, कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे संस्थेची नगरपालिकेच्या इमारतीमधील जागा अपुरी पडू लागली, म्हणून छ. शाहूंनी गंगावेस येथे २० बाय ६० फूट मोक्याची जागा संस्थेला दिली. नव्या जागेत संस्थेचे दिमाखदार पदार्पण ३ जून १९२३ रोजी छ. राजाराम महाराजांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय पश्चिमेकडील सुमारे २०० फूट जागासुद्धापतींनी संस्थेला दिली.

 संचालकांना कर्ज द्यायचे नाही, दारुधंद्यासाठी कर्ज द्यायचे नाही, असे सचोटीचे निर्णय घेऊन संस्थेने आपली प्रगतीची घोडदौड चालू ठेवली.

सभासदांची वाढती संख्या शहराचा जलद गतीने होणारा विस्तार, यांमुळे १९६४ ते २०११ या कालावधीत राजारामपुरी, उचगाव, गोकुळ शिरगाव आदी ठिकाणी तब्बल ११ नवीन शाखा उघडण्यात आल्या.

आण्णाप्पा पाडळकर व द. न. कणेरकर यांसारख्या कुशल संघटकांच्या नेतृत्वकाळात संस्थेची भरभराट झाली. श्री. श्रीपतरावजी बोंद्रे व श्री. ए. ए. बोरगांवकर यांच्या प्रसंगी कठोर वाटणाच्या, पण न्यायपूर्ण शैलीमुळे बँकेची उत्तरोतर प्रगती होत राहिली. मान्यवर शिक्षण संस्था, औद्योगिक संस्था, हौसिंग सोसायट्या, दुग्धव्यवसाय यांसारख्या मातम्बर ग्राहकांबरोबरच मातंग, डवरी, जोशी यांसारख्या दुर्बल घटकांनासुद्धा कर्जरूपाने मदतीचा हात पुढे करत या संस्थेने आपल्या यशस्वी कारकिदाँचा शतकमहोत्सव यावर्षी दिमाखात साजरा केला.

केवळ १८१ सभासदांची ही संस्था १०० वर्षात २०,८५३ सभासदांची जिव्हाळ्याची बँक होऊन कोल्हापूरच्या सहकारी बैंकिंग क्षेत्रात अजूनही नाव कमवत आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.