शेतकऱ्यांची डोकी फोडा म्हणणाऱ्या IAS अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून बढती मिळालीय.

मागच्या जवळपास १० महिन्यांपासून उत्तर भारतात चालू असलेलं शेतकरी आंदोलन मागच्या अनेक दिवसांपासुन चर्चेत तसं दुर्मिळच होते. बातम्यांमध्ये देखील क्वचित. त्यामुळेच शेतकरी आंदोलन आता संपले कि काय असं वातावरण तयार झाले होते.

पण हरियाणाच्या एका घटनेने सिद्ध केलं कि ज्या उत्साहात नोव्हेंबर २०२० मध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती त्याच उत्साहात आज देखील शेतकरी आंदोलन सुरु आहे.

आंदोलनातील शेतकरी संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली जोडले गेले आहेत आणि आवाहन करण्यात आले ते आंदोलनस्थळी एकत्र येतात. अशातच हरियाणामधील स्थानिक निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीने करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. पण पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे, यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. याच कारण सिन्हा यांनी पोलिसांना सुरक्षेबाबतचे आदेश देताना स्पष्ट म्हंटले कि,

ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा. मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे. लिखित देतो. सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा.

त्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. आणि मग या असे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. पण आता शेतकऱ्यांना म्हणतायत ही बदली म्हणजे त्या अधिकाऱ्याची बढती आहे असच वाटतंय. तर नक्की कोणत्या पोस्टवर या अधिकाऱ्याची बदली झाली हे बघायला पाहिजे.

हे अधिकारी २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. या घटनेनंतर १ सप्टेंबर रोजी उशिरा जारी करण्यात आलेल्या रुटीन बदलीच्या आदेशात २० आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत सिन्हा यांचे नाव आले. सिन्हा यांची कर्नालमधून बदली करण्यात आली. आणि नागरिक संसाधन माहिती विभागात (CRID) हरियाणा सरकारचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

हरियाणातील २०१८ च्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बॅचचे जानेवारी २०२२ मध्ये सेवा कालावधी चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरच प्रमोशन होऊ शकते. पण हरियाणामध्ये असे चार अधिकारी आहेत ज्यांचा सेवेचा कालावधी पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना बढती मिळाली आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,

सिन्हा यांना कर्नाल प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी, राज्य सरकारने त्यांना अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त केले. केवळ त्यांना फक्त एकट्यालाच अपग्रेड केले जाऊ शकत नसल्याने हरियाणा सरकारने २०१८ बॅचच्या इतर तीन अधिकाऱ्यांना पण बढती दिली.

बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये

१. अखिल पिलानी यांना अतिरिक्त उपायुक्त कम जिल्हा नागरिक संसाधन माहिती अधिकारी, कुरुक्षेत्र

२. अपराजिता यांना अतिरिक्त आयुक्त, फरीदाबाद महानगरपालिका

३. सचिन गुप्ता यांना अतिरिक्त उपायुक्त कम जिल्हा नागरिक संसाधन माहिती अधिकारी महेंद्रगढ, एडीसी कम जिल्हा नागरिक संसाधन माहिती अधिकारी, रेवाडी

२०१८ बॅचचे हे अधिकारी वेळेआधीच वरिष्ठ झाले आहेत. खरं तर त्यांना या पदासाठी जानेवारी २०२२ पर्यंतचा चार वर्षांचा अनिवार्य कार्यकाळ पूर्ण करणे गरजेचे होते. 

पण हरियाणा सरकार तर या बदलीला शिक्षा म्हणत आहे. का? 

सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिन्हा यांच्या बदलीला “शिक्षाच” म्हटलय. ते अधिकारी पुढे म्हणतात,

पदांची श्रेणीसुधारित करण्यात कोणतीही अडचण नसते. जर एखाद्या आयएएस अधिकाऱ्याने चार वर्षे सेवा पूर्ण केली नसेल तरीही त्याची बदली करता येते. त्या अधिकाऱ्याच्या तीन बॅचमेट्सना अतिरिक्त उपायुक्तांचे पद मिळाले आहे. जर ते स्कॅनरखाली नसते तर त्यांनाही तोच रँक मिळाला असता. परंतु त्यांना अतिरिक्त सचिव पदावर मुख्यालयात आणण्यात आले आहे.

आता सरकार जरी या बदलीला शिक्षा म्हणत असेल तरी, ती शिक्षा वाटत नाही. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदाचा क्रम पाहून तरी नक्कीच तस वाटत नाही.   

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.