या १० वेब सिरीजनं २०२२ मध्ये मार्केट खाल्लंय

नेटफ्लिक्स, अमेझॉन, सोनी, झी ५ सारख्या OTT प्लॅटफॉर्मचा बोलबाला आहे. यावरील वेब सिरीज लोक आवडीने बघतात. या सगळ्या OTT प्लॅटफॉर्म कंपन्यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी सब्सक्रिप्शन फी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे.

उदाहरण म्हणून नेटफ्लिक्सवरील सर्क्रेड गेम्सचं देता येईल. याचा पहिला सीजन तुफान गाजला होता. त्यातील प्रत्येक कॅरेक्टरची चर्चा झाली होती. मात्र सर्क्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजन ने प्रेक्षकांना आवडली नव्हती. याविषयावर सोशल मीडियावर तर लिहलं गेलेचं, कट्ट्यावर सुद्धा चर्चा रंगल्या होता.

हे सगळं ऐकून आमचा मित्र म्हणाला होता. आज काल लोकांना सरकारकडून कमी आणि वेब सिरीजकडून जास्त अपेक्षा आहेत.

२०२२ मध्ये पिक्चर पेक्षा काही वेब सिरीज भारी ठरल्या होता. यानंतर IMDB ने यावर्षीच्या भारी वेब सिरीजची लिस्ट दिली आहे.

१) पंचायत 

वेब सिरीज म्हणजे बोल्डनेस, मारामारी असं समीकरण असतांना पंचायत मध्ये यातील काहीच नाही. पंचायत आवडण्याचे कारण म्हणजे लय काय दंगा नाही.कोणी मोठा चेहरा नाही. तामझाम सुद्धा नाही.

उत्तर प्रदेशातील फुलेरा नावाच्या एका खेडेगावातील लोकांच्या जीवन, स्थानिक राजकारण, शहरात वाढलेल्या परंतु नोकरीसाठी नाईलाजाने खेड्यात आलेल्या अभिषेक त्रिपाठी या पंचायत सचिवची कहाणी सिरीज मधून दाखवली आहे. सीरिजचे २ पार्ट आले आहेत.

यातील माणसं, त्यांचे प्रश्न, त्यांचं वागणं-बोलणं आजच्या खेडेगावातील लोकांच्या जगण्यासारखेच आहेत. म्हणून या सिरीजचे आठही एपिसोड आवडतात. पाहतांना कुठेही ओढून ताणून केलं असं वाटत नाही.

पंचायतला IMDB ८.९ रेटिंग दिलं आहे

२)  दिल्ली क्राईमचा 2

दिल्ली क्राईमचा दुसरा सीजन यावर्षी रिलीज झाला. पहिले सीजन निर्भया प्रकरणावर होते. या सीजन मध्ये चड्डी बनियान गॅंगच्या जाऊबाजूला फिरते. ९० च्या दशकात या गॅंगने चांगलाच गोंधळ घातला होता. ज्यात काही चड्डी बनियान घातलेले लोक अंगाला तेल लावून खून, चोरी सारख्या घटना करत होते.

या सिरीज मध्ये ही गॅंग पुन्हा एकदा सक्रिय झाली असून ती ज्येष्ठ नागरिकांची हत्या घडवून आणत आहेत. दिल्ली क्राईम २ मध्ये शेफाली शहा यांची टिम गॅंग शोधून काढते.

दिल्ली क्राईमला IMDB ने ८.५ रेटिंग दिल आहे.

३) रॉकेट बॉईज

रॉकेट बॉईज मध्ये होमी बाबा आणि विक्रम साराभाई या दोन महान वैज्ञानिकांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या दोन्ही वैज्ञानिकांच इस्रो आणि वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खासगी घडामोडी या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

सोनी लिव्ह या OTT वर ही वेब सिरीज आहे. अणुपोखरण चाचणीवर आधारित ही वेब सिरीज आहे.

रॉकेट बॉईजला  IMDB ने ८.९ रेटिंग दिल आहे.

४) ह्यूमन

‘अजीब दास्तान्स’, ‘दिल्ली क्राईम’ अशा वेबमालिकेतील अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या  शेफाली शहाने ‘ह्यूमन’ या वेब सिरीज मधूनही प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

ह्यूमन ही वेब सिरीज एक मेडिकल ड्रामा सिरीज आहे. याची कहाणी औषध निर्माती कंपन्यांकडून जे ड्रग्स ट्रायल घेण्यात येते त्यावर आधारित आहे. यातून वैद्यकीय उद्योगात कसा प्रकारे भ्रष्टाचार होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्युमनला IMDB ने ७.९ रेटिंग दिल आहे.

५) अपहरण

alt बालाजी वर अपहरण सिरीज २ मार्च २०२२ मध्ये रिलीज झाला. या वेब सिरीजचा पहिला सीजन २०१८ मध्ये आला होता. सासू सुनाच्या सिरीयल करणाऱ्या एकता कपूरने या वेब सीरिजच्या दिग्दर्शक होत्या.

स्पेशल मिशनसाठी रॉ उत्तराखंड मधील रुद्र नावाच्या इन्पेक्टरची निवड करते. युरोप मध्ये बसलेल्या आरोपी भारतासाठी डोकेदुखी ठरत असतो. रुद्र त्या आरोपीला सर्बिया मध्ये जाऊन पकडून आणतो. कशा प्रकारे तो आरोपीना पकडतो ते या सिरीज मध्ये  दाखवण्यात आलं आहे.

 अपहरणला  IMDB ने ८.३ रेटिंग दिल आहे.

६) गुल्लक

ही वेब सिरीज मध्यमवर्गीय परिवारच्या जीवनातील  दाखवते.  लहान मुलं आणि कुटुंबियांमधील संघर्ष दाखवते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील खराब होत जाणारे नाते आणि त्यातून होणारा त्रास हा आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो.

गुल्लकला IMDB ने ९.१ रेटिंग दिल आहे.

७) NCR डेज

ही सिरीज लहान शहरातून येणाऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हा मुलगा शिकण्यासाठी गावातून दिल्लीला येतो. दिल्लीतील NCR भागात राहून एमबीए करतो. सगळं चांगलं सुरु असतांना त्याच्या जीवनात एक ट्विस्ट येतो. त्यांच्या गर्लफ्रेंडच लग्न दुसऱ्या कोण्यासोबत होत. ती सगळी कहाणी या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आली आहे.

NCR डेज IMDB ने ९.१ रेटिंग दिल आहे.

८) अभय

टास्क फोर्स मध्ये असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्या भोवती ही वेब सिरीज फिरते. त्याचे नाव अभय सिंह प्रताप (कुणाल खेमू) आहे. ३ या सिरीजच्या तिसऱ्या भागात अभयचा सामना हा आत्मा पासून मुक्ती मिळवून देत असल्याचे सांगून खून करणाऱ्यांशी होतो. अभय त्यांना रोखतो का ? माहित झाल्यानंतरही ते हत्या घडवून आणतात का हे सगळं माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला ही वेब सिरीज पाहावी लागणार आहे.

अभयला IMDB ने ८.१ रेटिंग दिल आहे.

९) कॅम्पस डायरीज

तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन ही वेब सिरीज तयार करण्यात आली आहे. ही वेब सिरीज कॉलेज जीवनावर आधारित आहे. सिरीज मध्ये कॉलेजच्या दिवसातील घडणाऱ्या घटना पाहून तुम्ही फ्लशबॅक मध्ये जाऊ शकता. यावर्षी या सिरीजचा दुसरा भाग रिलीज झाला.

कॅम्पस डायरीजला IMDB ने ८.९ रेटिंग दिल आहे.

१० ) कॉलेज रोमांस सीजन ३

या लिस्ट मधलं हे शेवटचं नाव आहे. कॉलेज रोमांस फ्रेंड सर्कल मधल्या मजेदार आणि रोमँटिक गोष्ट दाखवत. कॉलेजच्या दिवस जीवनात कशा प्रकारे प्रभावित करतात हे दाखवलं आहे.

कॉलेज रोमांस IMDB ने ६.८ रेटिंग दिल आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.