पालक पोरांना लस द्यायला अमेरिकेला चाललेले पण मोदींनी लहान मुलांसाठी भारतातंच लस चालू केली

पैसे असल्यावर माणूस त्याचा कसा वापर करेल याचा नेम नाही. बातमी आलेय गुजरातमधील आई-वडील त्यांच्या पोरांना घेऊन अमेरिकेच्या वाऱ्या करतायत. कशाला तर त्यांच्या लहान पोरांना लसीचा डोस  द्यायला. होय! अमेरिकेत लहान मुलांना लस द्यायला परवानगी दिल्यामुळं हे माय-बाप त्यांच्या सोन्या -मोण्याला घेऊन थेट अमेरिका गाठत होते. घरातले जवळचे लोकं गमवल्यामुळं आता कोणतीच रिस्क आम्हाला  नकोय असं त्यांचं म्हणणं होतं.पण तुम्हाला आता एवढं सगळं करावं नाही लागणारंय.

भारत सरकारनं पण आता लहान मुलांसाठी लसीकरण चालू करण्याचा निर्णय घेतलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना तशी माहिती दिलेय. ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुला-मुलींना लास देण्यात येणार आहे. यामुळं मुलांना शाळेत बिनघोर पाठवत येइल असं मोदींनी म्हटलं आहे.

मुलांसाठी लसीकरण करण्याची मागणी बऱ्याच देवीसांपासून करण्यात येत होती. करोन आणि त्यामुळं आलेल्या निर्बंधांमुळे मुलांवर विपरीत परिणाम होत आहेत. ना त्यांना शाळेत नेट शिकता येतंय ना मित्रमैत्रणीत मिसळता येतंय. यामुळं लहान मुलांवर दूरगामी परिणाम होत असल्याचं संशोधनही पुढं आलं होतं. अमेरिका आणि यूरोपातील देशांनी लहान मुलांसाठी लसीकरण चालूही केलं होतं. भारत सरकारनं मात्र सगळी सायंटिफिक स्टडी झाल्यावरच निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय.

 

भारतात सध्या कोणत्या लसींना लहान मुलांवरील वापरसाठी परवानगी देण्यात आली आहे?

भारतात DGCI म्हणजेच औषध नियंत्रण महासंचालयानं सध्या दोन लसींना अशी परवानगी दिली आहे. झायडस कॅडिलॅक च्या ZyCoV-D या लसीला सर्व प्रथम १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील वापरासाठी मंजुरी देण्यात अली होती.त्यांनतर आता भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ला पण आता लहान मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

आता इथं एक लक्षात घ्या जरी १२-१८ वर्षे पर्यंत या लसी चालत असल्या तरी सरकारनं फक्त १५ ते १८ वयोगटासाठीच लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.   

पण त्याबरोबर मोदीने अजून एक घोषणा केली आहे ती म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना सरंक्षक डोस देण्याची.

आता सरंक्षक दोषे म्हणजे काय तर तो बुस्टर डोस असणार आहे  फक्त सरसकट न देता डॉक्टरांच्या सल्ल्याने तो डोस साठ वर्षांवरील नागरिकांना घेता येइल. 

सरंक्षक डोस देण्यास १० जानेवारीपासून सुरवात होईल असं मोदींनी सांगितलंय.

त्यामुळं जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या लसीकरणाची पुढची फेज चालू झाल्याचं सांगण्यात येतंय. याच बरोबर बुस्टर डोसची होणारी मागणी भारत सरकार टप्याटप्याने मान्य करेल असं ही सांगण्यात येतंय.देशात ओमायक्रॉनचे संकट गडद झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण असल्याचं सांगण्यात येतंय. बाकी आता घरातल्या लहान पोरांना सुई टोचवून घ्यायला कसं तयार करायचं याची तयारी करायला तुम्ही सुरवात करा .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.