मुलांनी आपल्या ‘डॅडी’ला युट्युबचा हिरो बनवून दाखवलं.

गँग ऑफ वासेपूरमधील हा डायलॉग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावरचा सिनेमाचा प्रभाव दाखवून देतो.

“सबके दिमाग मे अपनी अपनी फिल्म चल रही होती है सब साले अपने फिल्म के हिरो बनना चाहते है “

लहानपणापासूनच आपण कोणत्या ना कोणत्या हिरोचे डाय हार्ट फॅन असतो. यातूनच हिरो बनायची स्वप्न आपल्याला पडू लागतात. ७० एम एम च्या पडदयावर दणकून एन्ट्री मारावी, पोरींचा घोळका सही घेण्यासाठी मागे लागावा असली स्वप्न मनात घर करू लागतात . जगण्याच्या रेट्यासमोर स्वप्न क्षणभंगूर असतात हे कळायला वेळ लागत नाही. आईबापानां अधुरी स्वप्न त्यांना आपल्या पोरांच्यामध्ये दिसायला लागतात. बापाची स्वप्न पोरानं पूर्ण केलेली उदाहरण काही कमी नाहीयेत . यातलेच एक उदाहरण आहे तामिळनाडू च्या कोईमतोर मधील छोट्या गावात वाढलेला गोपिनाथन याच.

तमिळ चित्रपटात ४ वर्षे संघर्ष करून नशीब आजमावून गोपिनाथन वापस घरी आला. वडिलांच्या अभिनेता बनण्याच्या आठवणींना उजाळा मिळाला गोपिनाथनने बापालाचं हिरो बनवायच ठरवल.

आणि इथे सुरू झाला “व्हीलेज फूड फॅक्टरी” या यूट्यूब चॅनेलचा प्रवास..

६५ वर्षीय त्याचे डॅडी ( व्हीलेज फूड फॅक्टरी मधील त्यांचं लाडच नाव) म्हणजेच अरुमुगम सुद्धा कामाला लागले. अगदी स्वस्त दरात सेट उभा केला. या सेटवरचा हिरो होता तो मळकट शर्ट अर्धवट वाढलेली पांढरी दाढी आणि लुंगी घातलेले डॅडी. हा हिरो डायरेक्ट नदी काठी जाऊन साध्या पद्धतीने माश्याची करी तयार करणे मासे धरून आण्यापासून ते त्याची साफसफाई अशी सगळी काम एकटे करतानाचा डॅडी हिरोचा व्हीडिओ शूट झाला.

top image 11 866x487

या व्हिडिओ ची खासियत म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये प्रेक्षकांना अतिशय कमी सूचना आहेत ,फक्त पाहूनच कळत यात काय टाकल आहे. हा व्हिडिओ यूट्यूब वर शेअर झाला अल्पावधीतच याला मिलियन  सबस्क्रयबर मिळाले. पैसे सुद्धा मिळू लागले.

गोपिनाथन सांगतात,

” सरासरी माझ्या विडिओ ला दररोज अडीच लाख व्हिव्ज मिळतात. संपूर्ण बकरी तयार करण्याच्या व्हीडिओला तर पन्नास लाख व्हिव्ज मिळाले. याचे यूट्यूबने तब्बल दीड लाख रुपये दिले. मग व्हिडिओ मागून व्हीडिओ बनायचा सिलसिला सुरु झाला. हजारो लोक खाली कमेंट्स लिहू लागले. आश्चर्य म्हणजे यातील अर्ध्याच्यावर कमेंट्स परदेशी दर्शकांच्या होत्या.”

फूड फॅक्टरीला आता अनेक आंतरराष्ट्रीय प्रेक्षक मिळाले. यातले काही काहीजण डॅडीनां कमेंटबॉक्समध्ये प्रेमाने थोड कमी खा, तब्येतीची काळजी घ्या असे सांगत असतात. 

शिक्षणाने गोपीनाथन हा डिप्लोमा इंजिनियर आहे. चेन्नईमध्ये फिल्मइंडस्ट्रीमध्ये हातपाय मारताना त्याला एडीट व शूटिंगचं स्कील शिकायला मिळालं होतं. तेच त्याने युट्युबवर वापरायच ठरवलं आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीतच  करियरचा नवीन पर्याय शोधला आणि बापाच हिरो बनायच स्वप्न ही पूर्ण केल. आज त्याची अख्खी फॅमिली हे व्हिडीओ बनवण्याच्या कामात त्यांना मदत करते.  गुगल आणि युट्युबकडून त्यांना दर महिन्याला लाखोनी पैसे मिळतात.

त्यांच्या काही गाजलेल्या व्हिडीओची लिंक.

असाच आणखी एक करिष्मा करून दाखवलाय तब्बल १०८ वर्षाच्या कॅमेरा कडे हसत पाहणाऱ्या मस्ताणाम्मा आजीने जगातल्या सर्वात वयोवृद्ध यूट्यूबर चा मान ही त्यांनाच जातो

आंध्रप्रदेश मध्ये गुडीवाडा गावात भाताच्या शेतात नवनवीन रेसिपी बनवत मस्ताणाम्माच्या  किचन मध्ये एमुच्या अंड्याचा फ्राय तयार करतानाचा एक व्हिडिओ यूट्यूब वर पडला आणि बघता बघता याला २.६ मिलियन दर्शक मिळाले. त्यांचा सर्वात पॉप्युलर व्हिडीओ ठरला तो कलिंगडाच्या सालात बनवलेल चिकन ११ मिलियन दर्शकापर्यंत पोहचलेल्या या विडिओने ग्रँडपा किचन ला जगभरात ओळख निर्माण करून दिली.

maxresdefault

या पद्धतीच्या व्हिडिओ ची वाढणारी लोकप्रियता भारतात प्रसार माध्यमे कशी बदलत जात आहेत हे दाखवते याठिकाणी के पी जी एम चा यूट्यूब भाषांचा रिपोर्ट फारच इंटरेस्टिंग आहे यांच्या मते ४५० मिलियन भारतातील इंटरनेट वापर कर्त्यांपैकी २३० मिलियन वापरकर्ते भारतीय भाषा वापरत आहेत यातले ९५ टक्के ग्रामीण भाषा वापरणारे आहेत

अशा अनेक यूट्यूबरने मागील काही वर्षात लाखो लोकांपर्यंत आपल्या रेसिपी पोहचवल्या, यात काहींच्या आयुष्याच्या प्रेरणादायी घटना होत्या तर कुठे भारताच्या संस्कृती दर्शनाच्या !!

यामुळे मात्र एक झालं  पुरातन काळापासून चालत आलेल्या लॉस्ट रेसिपी जगासमोर आल्या आणि भारताची खाद्य संस्कृती जगभरात चर्चेचा विषय ठरली.आता असे काही व्हिडिओ महाराष्ट्रातून पाहायला मिळाले तर नवल नको भिडू

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.