राहुल गांधींच्या भाषणातले शब्दच रेकॉर्डवरून काढलेत असंसदीय शब्द काय असतात?

अधिवेशन सुरू असलं की एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ठरलेले आसतात. लोकसभा, राज्यसभा असो किंवा मग राज्यातील विधानसभा, विधान परिषद असो. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाला धारेवर धरत असतात. सध्या सुरू आसेलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा चांगलाच गाजला. राहूल गांधी यांनां त्यांची खासदारकी परत मिळाल्यानंतर त्यांनी आपलं पहिलं भाषण केलं. अविश्वास ठरावावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

राहूल गांधी यांनी केलेल्या भाषणात त्यांनी मणिपूरवर बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले.

“तुम्हाला मणिपूर हिंसेचं काही पडलेलं नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत. तुम्ही सत्ताधारी देशद्रोही आहात, देशप्रेमी नाही. तुम्ही भारतमातेचे खुनी आहात म्हणूनच तुम्ही मणिपूरला जात नाही.”

असा घणाघाती हल्लाच राहुल गांधी यांनी भाजपवर चढवला. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहूल गांधींच्या भाषणातील काही शब्द असंसदीय म्हणून वगळण्यात आले आहेत.

दरम्यान, आता काँग्रेसकडून हा मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासमोर मांडला होता. राहुल गांधी यांच्या भाषणात आक्षेपार्ह असं काहीच नाही. त्यामुळे असे शब्द हटवणं योग्य नाही, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

संसदेतील हे शब्द हटवण्याचे नियम काय सांगतात? असंसदीय शब्द काय असतात? भारताच्या संसदेत याची सुरवात कधी पासुन झाली हे सर्व आपण समजून घेणार आहोत.

सुरवातीला आपण असंसदीय शब्द काय असतात ते जाणून घेऊयात. जगभरातील सभागृहात सदनाचे काही नियम आणि अटी असतात. ज्यात असंसदीय शब्दांचाही समावेश करण्यात येतो, जे शब्द संसदेत वापरले जाऊ शकत नाहीत त्याला असंसदीय शब्द म्हणतात. ब्रिटीश संसदेनुसार, जेव्हा सभापतींना असं वाटतं की, एखाद्या  शब्दाने संसदेची सभ्यता संपुष्टात येत आहे,  तेव्हा ती असंसदीय भाषा किंवा शब्द मानले जातात. असे शब्द वापरल्यास सभापती खासदाराला ते मागे घेण्यास सांगू शकतात. भारतीय संसदेशी संबंधित अनेक नियम ब्रिटनमधून घेण्यात आले आहेत, त्यामुळे भारतीय संसदेत असंसदीय शब्दाची संकल्पनाही तिथूनच आलेली आहे.

आता एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हे शब्द कोणत्या नियमाच्या आधारे असंसदीय ठरवले जातात आणि हटवले जातात…

घटनेच्या कलम १०५ (२) नुसार, कोणत्याही  संसदेतील सदस्याला भारतीय संसदेत बोलल्या गेलेल्या भाषणाबद्दल न्यायलयात उत्तर देण्याची गरज नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, संसदेत बोलल्या गेलेल्या कोणत्याही भाषणासंदर्भात न्यायलयात जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा होत नाही की खासदारांना संसदेत काहीही बोलू दिलं जातं. खासदारांचे भाषण हे संसदेच्या नियमांच्या शिस्तीत आणि स्पीकरच्या नियंत्रणाखाली असतं. खासदारांनी सभागृहात अपमानास्पद किंवा असंसदीय भाषा वापरणार नाही याची जबाबदारी ही स्पीकरवर असते.

लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम ३८० नुसार जर सभापतींना असं वाटत असेल की, कोणताही खासदार आपल्या भाषणात असे शब्द वापरत आहे जे बदनामीकारक किंवा असंसदीय आहेत. ते सार्वजनिक करणं चुकीचं आहे, तर सभापती आपले आधिकार वापरून भाषणातील तो भाग रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश देऊ शकतात. आदेशानंतर, असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातात. ज्याचा काहीही अर्थ उरत नाही.

आता  मुद्दा येतो ते भारतीय संसदेत याची सुरवात कधी पासुन झाली त्याचा.

असंसदीय शब्द काढण्याची संकल्पना ही ब्रिटनने सुरू केली आणि तीच संकल्पना भारताने घेतली. इंग्रजी, हिंदी आणि इतर काही भारतातील भाषांमध्ये हजारो शब्द असे आहेत जे असंसदीय आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या म्हणण्यानुसार, असंसदीय शब्दांचां शब्दकोश पहिल्यांदा १९५४  मध्ये तयार करण्यात आला होता. यानंतर १९८६, १९९२, १९९९, २००४, २००९, २०१० मध्ये तयार करण्यात आला आणि २०१० पासून तो दरवर्षी प्रसिद्ध होत असतो. यावेळी प्रसिद्ध झालेल्या शब्दकोशात ११०० पानांचा समावेश आहे. लोकसभा-राज्यसभा तसेच विधानसभेच्या कामकाजादरम्यान असंसदीय घोषित केलेले शब्द एकत्र करून ही यादी तयार केली जाते. असंसदीय शब्दांची नवीन लिस्ट दरवर्षी अपडेट केली जाते.

असंसदीय शब्दांच्या या शब्दकोशाला १९९९ मध्ये पहिल्यांदा पुस्तकाचं स्वरूप देण्यात आलं होतं.

लोकसभेचे माजी सचिव जी.सी. मल्होत्रा यांनी २०१२ मध्ये हे निदर्शनास आणून दिले होते की,या पुस्तकाची निर्मिती करताना स्वात्रंत्र्याच्या मध्यवर्ती विधानसभा, भारताची संविधान सभा, तात्पुरती संसद, पहिली ते दहावी लोकसभा आणि युनायटेड किंगडम यासारख्या राष्ट्रकुल संसदेत जे शब्द आणि वाक्ये असंसदीय घोषित करण्यात आले होते त्या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.

१८ जुलैला संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू झालं. तेव्हा २०२१ ची असंसदीय पुस्तकाची यादी जाहीर करण्यात आली होती.

ज्यामध्ये लज्जित, विश्वासघात,  नाटक, ढोंगी, जुमलाजीवी, बालबुद्धी, कोविड स्प्रेडर, स्नूपगेट, अराजकतावादी, शकुनी, हुकूमशाही, तानाशाह, तानाशाही, जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, खून से खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, रक्तपात, रक्तरंजित, लज्जास्पद, अपमानित, फसवणूक, चमचा, चमचागिरी, चेला, बालिशपणा, भित्रा, गुन्हेगार, गाढव, नाटक, लबाडी, गुंडागर्दी, ढोंगी, अकार्यक्षमता, दिशाभूल, खोटे,  गद्दार, अपमान, असत्य, अहंकार, भ्रष्ट, खरीद फारोख्त, दलाल, दादागिरी, विश्वासघात, मूर्ख, लैंगिक छळ अशा काही शब्दांचा समावेश होता. या यादीत अजूनही असे काही शब्दांचां समावेश आहे जो दररोजच्या बोलण्यात येत असतात.

काँग्रेसने म्हटलं आहे की राहूल गांधीच्या भाषणात असंसदीय कुठलाही शब्द नव्हता. पण, काँग्रेसने म्हण्टलं जरी असलं तरीही त्यांचे शब्द हटवण्यात आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.