कामसुत्रमध्ये “हनीमुन” बद्दल काय लिहलय माहितय का ?

काय म्हणता, हा काय प्रश्न झाला काय. कामसुत्र हे अख्ख पुस्तक हनीमुनवरच आहे की. जरा तरी अक्कल आहे का? तर हे बघा अतिशहाणपणा करणाऱ्या भिडू लोकांनो. हनीमुन हा एक चॅप्टर झाला. कामसुत्र हे वयाच्या अठराव्या वर्षानंतर कायदेशीर होतं. त्यानंतर तुम्ही शंभर वर्ष जगला तरी हे सुत्र वापरु शकता. 

पण हनीमुन हा चार दिवसाचा खेळ असतोय. आत्ता हि हनीमुनची भानगड आत्ता आत्ता आली आहे हे आम्हालापण माहिताय. म्हणजे अगोदर कस पूजा झाली, खंडोबा, जोतिबा केले की माणूस सुखी संसाराला लागला. पण आत्ता तस नसत. आत्ता हनीमून करावा लागतो. तूम्ही BCA, BBA केल असेल तर तुमच्यासाठी महाबळेश्वर आणि लयत लय सावंतवाडीपर्यन्तचं गोव्याचं पॅकेज असतं.

बऱ्यापैकी इंजिनियरिंग केलं असेल तर मग कुलू मनाली नायतर केरळच पॅकेज ठिक असत. आणि पैसे खर्चच करायचे असले तर मॉरिशस, बाली, सिंगापूर वगैरे ऑप्शन असतात. आत्ता याच्यापुढे युरोप नाहीतर युएसचा दौरा मारणारा वर्ग पण आहे पण तो काय मराठी आर्टिकल वाचायला येत नसतो त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही. 

असो, तर मुद्दा असा की तुम्ही हनीमुन महाबळेश्वरमध्ये करा नाहीतर मॉरिशसमध्ये करा. जगाच्या इतिहासात हनीमूनच्या पॅकेजमध्ये एकच गोष्ट कॉन्संन्ट राहिलेली आहे. ती म्हणजे नवरा-बायको. नवरा बायको सोडून हनीमुनला गेलेली आजवर तरी पाहण्यात आलेली नाही. 

तर हनीमुन कुठेही असो त्याबद्दल डिटेल माहिती तुम्ही कोळून पिलेलीच असते, पण कामसुत्र काय म्हणतं? हे आज आम्ही सांगणार आहोत. त्याच काय आहे, अध्येमध्ये राजकारण सोडून समाजाला खरी गरज काय आहे याची जाणिव आम्हाला होते आणि त्यातूनच आम्ही असले लेख लिहायला घेतो. 

जास्त टाईमपास न करता थेट मुद्यावर येतो, हनीमुन बद्दल कामसुत्रमध्ये काय लिहण्यात आलं आहे. 

1) लग्नाचे पहिले तीन दिवस नवरा बायकोने कोणत्याही परस्थितीत पलंगावर झोपू नये. त्यांनी पहिले तीन दिवस जमीनीवर झोपावं. (आत्ता असं का सांगितल आहे ते आम्हालापण माहित नाही, इथे ते म्हणतात सेक्सचा विचार दोघांनी देखील पहिले तीन दिवस करु नये. आत्ता वात्सायनाला कोण सांगणार इथं पूजा होईपर्यन्त काहीच चान्स नसतो ते) 

2) पहिला संपुर्ण आठवडा नवदांपत्याने मीठाचा त्याग करावा. (का करावा, कशासाठी करावा याबद्दल काहीच माहिती दिली नाही. बहुतेक मी तुमचं मीठ खाल्लय टाईप इमोशनल ब्लॅकमेल होवू नये म्हणून वात्सायन अस म्हणलेला असावा.)

3) लग्नानंतरचे पहिले सात दिवस नवदांपत्याने संगीत ऐकावं त्यातून एकमेकांना एकमेकांच्या आवडीनिवडी समजण्यास मदत होते. नात्यांमध्ये बळकटी आणण्यासाठी हि गोष्ट अत्यावश्यक आहे. 

4) लग्नानंतरच्या दहाव्या दिवशी नवरा आपल्या बायकोच्या दिशेने पहिलं पाऊल टाकू शकतो. तिच्याशी बोलून तिला समजावून घेवून त्याने पुढे जावं. अस आम्ही नाही वात्सायन सांगतो. 

5) आत्ता हा मुद्दा त्या काळातला पक्का वाटतो, यामध्ये वात्सायन सांगतो की बायकोला पान खायला द्यावं. पहिला नवऱ्याने पान खावं व नंतर बायकोला पान खायला द्यावं. बायकोने पान खालं तरच ती पुढच्या गोष्टींसाठी तयार आहे अस सांगितलं आहे. बायकोने पान खावं म्हणून अर्ज,विनंत्या द्यावी लागली तरी द्यावी पण जबरदस्ती करु नये. अस वात्सायन सांगतो. 

6) सर्वात लास्टचा मुद्दा म्हणजे वात्सायन म्हणतो शरिरसंबधांना कितीही वेळ लागला तरी चालेल पण बळजबरी करु नये. बळजबरी केली तर नात्यांमध्ये घृणा निर्माण होते व तिथून सगळे बिघडण्यास सुरवात होते. 

आत्ता हे खरच वात्सायनाने सांगितलं आहे. आम्ही संस्कृतमध्ये सांगितलेलं ज्याने हिंदीत केलं त्याचं मराठीत केलं आहे. त्यामुळे खूप गोष्टी मधल्यामध्ये जमा झाल्या असण्याची शक्यता आहे. तसही कामसुत्र म्हणल्यानंतर आपण ऐकूनच घेतलच की. फॉलो करायचं की नाही ते तुमच्या मतावर आहे. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.