चौकात पुतळा बसवायचा आहे ? नेमकी प्रक्रिया काय आहे ते बघा

सांगलीतल्या आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन झालेला वाद आपण बातम्यांमधून पाहतोय. 

आष्टा शहरात शिवप्रेमींना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता, पण प्रशासनाच्या परवानगी अडसर ठरत होती श्वेता शिवप्रेमींनी गनिमी काव्याने रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण प्रशासनाने त्या परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित करून पोलीस बंदोबस्तात रात्रीच्या वेळेत शिवरायांचा पुतळा हटवला होता. 

त्याचा परिणाम म्हणजे प्रशासनाच्या निषेधार्थ काल बुधवारी आष्टा शहरासह वाळवा तालुका बंदची हाक शिवप्रेमींकडून देण्यात आली होती. पोलिसांनी ३० जणांना ताब्यात घेतलं होतं. अखेर पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या संघर्षांत शिवप्रेमी जिंकले आणि प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेच्या हस्तांतरणाला परवानगी देण्यात आल्याने यावर तोडगा निघाला आहे.

हेच नाही तर मागे जानेवारी महिन्यात आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यानंतर हा पुतळा शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने तेथून काढला. तर दर्यापूर येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात उभा करण्यात आला होता तेंव्ह अशीच परिस्थिती निर्माण झालेली. 

पण हे सगळं कशावरून घडलं तर परवानगी न घेता बसविलेल्या पुतळ्यावरून. 

परवानगी न घेता पुतळा बसविल्याने वाद निर्माण झाला आहे. अशा प्रकारे वाद निर्माण होऊ नये म्हणून पुतळा बसविण्या बाबत धोरण आखण्यात आले आहे. मात्र याकडे अनेकवेळा दुर्लक्ष करण्यात येते.

मात्र कुठलाही पुतळा बसविण्यापूर्वी कुठल्या परवानग्या घेण्यात याव्यात याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शन तत्त्वे ठरविण्यात आले आहे.

पुतळे उभारण्यावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हि मार्गदर्शक तत्वे २०१७ मध्ये काढले होते. एकदा पुतळा उभा केला की, त्यानंतर तो काढणे सोपे काम नसते त्यामुळे तत्कालीन सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्वे ठरविली होती. त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालायने सुद्धा काही काही आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची

राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे नि‌श्चित केली असून, राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मान्यता घ्यावी लागेल. यात महापलिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांचा समावेश असतो. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश असतो.

जागे बाबत कुठालाही वाद नकोय…

राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारायचा असलेल्या जागेच्या मालकीहक्काबाबत वाद असता कामा नये, सदर जागा अनधिकृत नसावी, पुतळा उभा करताना त्याबाबतचा आराखडा, पुतळ्याच्या रेखाचित्राबाबतची माहिती परवानगीसाठी अर्ज करताना जिल्हा‌धिकाऱ्यांकडे सादर करावी लागते. पुतळा उभारल्यामुळे संबंधित शहर किंवा गावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही.

महत्वचं म्हणजे…

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही याची खबरदारी घ्यावी पुतळा उभा करणाऱ्यांची असेल असे मार्गदर्शक तत्वात नमूद केले आहे.  तसेच पुतळा उभारण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. पुतळ्याची देखभाल, पावित्र्य राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची राहील.

पुतळा उभारताना संबंधित राष्ट्रपुरुषांचा पुतळा हा आजूबाजूच्या दोन किलोमीटर परिसरात नसावा.

सरकारी कार्यालयाच्या परिसरात पुतळा उभा करायचा असेल तर संबंधित कार्यालयाची ना हरकत प्रमाणपत्रही सादर करावा लागतो. पुतळा उभारल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते.

रस्ते रुंदीकरणासाठी पुतळा हलविण्याबाबतची कार्यवाही करावी लागली तर त्याचा खर्च पुतळा उभारणाऱ्या संस्थेला करावा लागेल. पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी आणि पावित्र्य राखण्याच‌ी जबाबदारी संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. पूर्व परवानगीशिवाय पुतळा उभारण्यात आला तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे.

परवानगी मिळविण्यात अनेक अडचणी येत असल्यामुळे अनेकवेळा महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी उभे करण्यात येतात. मात्र यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढते.

सर्वोच्च नायालयाने राज्य सरकारला दिलेला आदेश 

तसेच २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर पुतळे उभे करायला परवानगी देऊ नये असे आदेश गुजरात सरकारला दिले होते. तसेच हा आदेश देशभरातील सर्व राज्यांना लागू असेल असेही आपल्या निर्णयात नमूद केले होते. त्यामुळे गावात, चौकात पुतळा बसवायचा असेल तर त्याबाबतची नेमकी प्रक्रिया काय आहे ते लक्षात असू द्या.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.