बलात्कार झाला का नाही हे ठरवणारी टू फिंगर टेस्ट काय असते ?

सर्वोच्च न्यायालयाने टू फिंगर टेस्टबाबत टिप्पणी केली. ही टिप्पणी अधिक महत्वपूर्ण होती. न्यायमुर्ती डी वाय चंद्रचुड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर असणाऱ्या एका प्रकरणात कोर्टाने टू फिंगर टेस्टला कोणताही शास्त्रीय आधार नाही अन् अशी टेस्ट करणं हे पुन्हा बलात्कार करण्यासारखा प्रकार असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. 

टू फिंगर टेस्टचा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे झारखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकार विरुद्ध शैलंद्र कुमार राय या खटल्यात टू फिंगर टेस्टच्या आधारावर आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय बदलला आणि आरोपींना दोषी ठरवलं. सोबत टू फिंगर टेस्टवर जोरदार आक्षेप नोंदवले.

सुनावणी करताना कोर्टाने सांगितलं की, टू फिंगर टेस्टमधून एखादी महिला शरीरसंबध ठेवत आहे हे स्पष्ट करून बलात्कार होतो की नाही हे ठरवणं अमानवीय आहे. सोबतच आरोग्य मंत्रालयाला देखील टू फिंगर टेस्ट घेतली जावू नये असे निर्देश दिले. 

टू फिंगर टेस्ट काय असते ? 

संबंधित डॉक्टर महिलांच्या योनीमध्ये बोट टाकून संबंधित महिला ही शारिरिक संबंध ठेवते की नाही याची चाचणी करतो. नियमित सेक्स करणारी महिला आहे की नाही हे पाहण्यासाठी टू फिंगर टेस्ट केली जाते. यामध्ये डॉक्टरने टेस्ट पॉझिटिव्ह दिली तर शरीरसंबंध ठेवण्यात आले होते व निगेटिव्ह दिली तर शरीरसंबंध ठेवण्यात आले नव्हते असा निर्णय घेतला जातो.

या गोष्टीचा बलात्कार झाला किंवा नाही हे ठरवण्यात कोणताही निष्कर्ष ठरवता येत नाही. मात्र अशा टेस्टचा आधार घेवून टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास संबंधित महिलेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित झाले होते असा निष्कर्ष मांडला जातो.

मात्र प्रकरण इतक्यावरच न थांबता विरोधी पक्ष कोर्टामध्ये या टेस्टचा दाखला देत पिडीतेच्याच चारित्र्यावर शिंतोडें उडवताना अनेकवेळा दिसून आलेले आहेत. दूसरा प्रतिवाद असाही केला जातो की एखादी महिला शारिरीक पातळीवर सक्रिय आहे किंवा नाही या गोष्टीचा व बलात्कार झाला की नाही या गोष्टीचा एकमेकांशी संबध जोडणे अयोग्य आहे.. 

यापूर्वी देखील टू फिंगर टेस्ट चर्चेत आली होती तेव्हा देखील टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक असल्याचं सांगितलं होतं. २०१४ साली केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने अशा प्रकारच्या टेस्टवर बंधी घातली होती. तरीही टू फिंगर टेस्ट होत असल्याचे प्रकार समोर येत होते. यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा टू फिंगर टेस्टवर आक्षेप नोंदवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.