नवाब मलिकांच्या आरोपामुळे NCB प्रकरणात नवा ट्वीस्ट, हे फ्लेचर पटेल कोण आहेत ?

गेल्या काही दिवस झालं आपण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेची मालिका पाहत आलो आहोत. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेत नवीन प्रश्नावलीच माध्यमांसमोर मांडली आहे.

आजच्याही पत्रकार परिषदेत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा एनसीबीवर (NCB) गंभीर आरोप केले आहेत. यावेळेस नवाब मलिक यांनी या प्रकरणावरून नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत.  नबाव मलिक म्हणाले की, मी आर्यन खानला अटक केल्यानंतर दोन आरोपी कसे हँडल करताय प्रश्न विचारले होते? एससीबी कार्यालयात जातात कसे याबाबत प्रश्न विचारल्यानंतर एनसीबीने त्याबाबत खुलासा केला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत? त्यांच्यासोबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबियासोबत माय लेडी डॉन सिस्टर अशा कॅप्शन फोटो ते टाकतात?

नवाब मलिक यांनी ट्वीटरला फ्लेचर पटेल यांचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

हा फ्लेचर पटेल एनसीबीच्या तिन्ही तीन केसेसमध्ये पंच आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपकडून राज्याला बदनाम करण्याचं कट कारस्थान सुरु आहे, केंद्रीय यंत्रणा राज्यातील यंत्रणेवर दबाव आणून अशा केसेस मधून राज्यावर शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न चालला असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

तर नेमका विषय काय आहे ?

या वर्षभरातील एनसीबीच्या जितक्या कारवाया झाल्यात त्याची माहिती मलिक यांनी माध्यमांना दिली.   त्यातल्या तीन महत्वाच्या केसेसची माहिती थोडी संशयास्पद वाटली. त्यांच्या म्हणण्यानुसार,  सीआर नंबर ३८/२० सर्च ऑपरेशन करण्यात आलं. २५  नोव्हेंबर २०२० साली सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं.  त्यात फ्लेचर पटेल पंच आहेत. ९ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आलेल्या छापेमारीतही फ्लेचर पटेल पंच आहेत. तसंच २ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्येही फ्लेचर पटेल पंच आहे. हे योगायोग नसून ठरवून करण्यात आलेल्या कृती आहेत असंही ते म्हणाले.

तुमचे फॅमिली फ्रेन्ड पंच आहेत. मग हे ठरवून केलं का? एक व्यक्ती तीन केसमध्ये एकच पंच कसा याचं उत्तर एनसीबीवर द्यावच लागेल?  समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलचा काय संबंध आहे? आणि हि  लेडी डॉन कोण आहे? हे सर्व मिळून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करत आहेत का? असे गंभीर प्रश्न नवाब मलिक यांनी केले आहेत.

कोण आहेत हे फ्लेचर पटेल ?

नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल यांचे फोटो माध्यमांना आणि ट्वीत वर टाकत सांगितले आहेत कि,  फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. आणि तसच ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले त्याचे तसे फोटो देखील ट्वीटरवर आहेत.

साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. या ठरलेल्या ३ केस मध्ये फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असं एनसीबी सांगत आहे तर मग हे फ्लेचर पटेल तुमचे फॅमिल फ्रेंड कसे काय? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेत आहेत का. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केली आहे का? असा सवाल त्यांनी केला.

सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे.

आणखी मुख्य मुद्दा म्हणजे,  प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे ? मलिक यांच्या म्हणण्यानुसार, ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. पेशाने ती वकील आहे. विशेष म्हणजे, हि लेडी डॉन देखील समीर वानखेडेंची नातेवाईक आहे. आणि फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन म्हणत फोटो टाकत असतो. असंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी काही रॅकेट चालवतेय का? मुंबईत काही ‘गेम’ सुरू आहे का? असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.