स्थापनेच्या दोनच वर्षात शिवसेनेचं हिंदुत्व समोर आलं ते दुर्गाडी किल्ल्यावरच्या वादामुळे

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट की उद्धव ठाकरे यावरून बराच वाद सुरु आहे. हा वाद कमी होत नाही तो पर्यंत आता कल्याण मधील किल्ले दुर्गाडी येथे गेली ५४ वर्ष साजरा होणाऱ्या नवरात्री उत्सवासाठी देखील या दोन्ही गटात रस्सीखेच सुरु झाली हे.

शिवसेनेकडून ५४ वर्षापासून किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी शिवसेना शहर प्रमुख या उत्सवाचे प्रमुख असतात. यंदा मात्र या उत्सवावर देखील शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट वादाचं सावट आहे. 

शिवसेनेसाठी दुर्गाडी किल्ला फार महत्वाचा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व कशा प्रकारचं असणार आहे याची चुणूक बाळासाहेबांनी या किल्ल्यावरूनच दाखवून दिली होती.

हिंदूचे रक्षणकर्ते’ अशीबाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा अगदी सुरवाती पासून तयार झाली होती.

पण त्याच मूळ होतं शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात ठाकरे आणि त्यांचे सहकारी मनोहर जोशी व दत्ताजी साळवी यांनी कल्याण जवळच्या दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात जाऊन गाजवलेल्या पराक्रमात !

नेमकं काय झालं होतं त्या ‘दुर्गाडी’ किल्ल्यावर?

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि कल्याण ही दोन्ही गावं हिंदू-मुस्लिम संमिश्र वस्तीची. त्यापैकी भिवंडीवरचे मुस्लिमांचे वर्चस्व आहे वादाचं मूळ कारण होतं. पण दोन्ही गावं कमालीची बकाल आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेली होती, हे गावात प्रवेश करताक्षणीच ध्यानात येत असे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन पाच दशकं उलटली होती. तरीही मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या दोन्ही शहरांची लोकसंख्या आणि त्याचबरोबर गावातील बकाली वाढण्या पलीकडे परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

कमालीचा अस्ताव्यस्त आणि नियोजनशून्य पद्धतीने वाढलेल्या या गावांमध्ये हिंदू-मुस्लिम तंटे अधून मधून उद्भवत असायचे. मुंबई-ठाणे परिसरात जम बसल्यानंतर, तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी- कल्याण मध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न शिवसेना करीत होते. त्याच वेळी कल्याण जवळच्या एकक किल्ल्यावर असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिरावरून हिंदू मुस्लिमांमध्ये धुसफूस सुरू झाली. आणि ठाकरे यांनी तो हा विषय हातात घेण्याचे ठरवले.

हा किल्ला दुर्गाडी याच नावाने इतिहास काळापासून ओळखला जात होता आणि त्यामुळे तिथे मंदिर हे दुर्गादेवीचे मंदिर होतं अशी परिसरातल्या हिंदूंची श्रद्धा होती. दरम्यान या मंदिराजवळच्या एका भागात मुस्लिमांनी दर्ग्याचे स्वरूप देऊन तिथं नमाज पढण्यास सुरुवात केली आणि याचमुळे दोन जमातीमधला तणाव वाढू लागला.

अखेर 1968 च्या सप्टेंबर महिन्यात ठाकरे मनोहर जोशी आणि साळवी या सेनेच्या त्रिकुटानं दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन भगवा फडकवण्याचा निर्णय घेतला.

बाळासाहेब ठाकरे येणार आणि दुर्गा मातेच्या मंदिरासमोर नारळ फोडून गुलाल वगैरे उधळणार म्हटल्यावर तणावात भर पडली. बाळासाहेबांनी जमावबंदीचे आदेश म्हणून दुर्गा देवीचे दर्शन घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि वातावरण तापलं.

बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी हे 8 सप्टेंबर 1968 रोजी कल्याण मध्ये आले तेव्हा त्यांच्या समवेत असलेले शिवसैनिक आणि कल्याण मधली उत्सुक भाविक जनता यांनी सारा परिसर फुलून गेला होता.

जमावबंदीचा आदेश मोडून या गर्दीने दर्शनाचा साग्रसंगीत सोहळा उत्साहाने पार पाडला. पोलिसांचे सारे आदेश फक्त सरकार दरबारच्या पिवळ्या कागदांवर शिल्लक राहिले होते आणि नंतर कल्याण मधील सुभाष मैदानावर झालेल्या सभेस लोकांनी खूपच गर्दी केली होती ,

यावेळी बोलताना शांत व सौम्य स्वभावाचे समजले जाणारे दत्ताजी साळवी म्हणाले,

“दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचा जर कोणी अपमान केला तर, तो महाराष्ट्राचा अपमान आहे असं समजलं जाईल आणि तसं करणाऱ्यास धडा शिकवला जाईल”,

तर मनोहर जोशी यांच पाऊल आश्चर्यकारकरीत्या साळवी यांच्यादेखील पुढे होतं,

“पोलीस आम्हाला अडवतील असं सांगण्यात आल्यावरही आम्ही किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतलं,  कारण देवाच्या दर्शनाला जाताना कायदे आडवे येण्याची शक्यताच नाही जगातील सर्व दुष्ट शक्तींचा निर्मूलन करण्यासाठी शिवसेनेने जन्म घेतला आहे कल्याणमधील जनतेने आता घाबरण्याचे कारण नाही दाक्षिणात्य आणि अल्पसंख्यांक यांनी आमच्यात मिळून-मिसळून राहिले पाहिजे, पाकधार्जिन्या मुस्लिमांना आता देशाबाहेर हाकलून देण्याचा आम्ही ठरवलं आहे”,

हे मनोहर जोशी यांचे शब्द होते.

ठाकरे यांच्या भाषेचा बाज आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय प्रवासात कसा कायम राहिला होता याची साक्ष त्यांच्या त्या दिवशीच्या भाषणावरून मिळते. मुस्लिमांनी त्याच वेळी स्थानिक आमदार कृष्णराव धुळप यांना एक निवेदन दिलं होतं त्याचा उल्लेख करून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. 

समोर जमलेल्या युवकांच्या झुंडी या झुंडीच्या बाळासाहेबांच्या भाषणांनी पेटून उठायच्या.

बाळासाहेबांनी सप्टेंबर 1968 मध्येच कल्याण मध्ये आणखी एक सभा घेतली. दुर्गाडी किल्ल्यावरच झालेल्या त्या सभेत आठ हजार लोक उपस्थित असल्याची नोंद त्या दिवशीच्या पोलिस अहवालात आहे. पुढे 12 सप्टेंबर 1968 रोजी पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश म्हणून त्या परिसरात शिवसेनाप्रमुखांनी सभा घेतली. त्यावेळेचा ठाकरे त्यांचा रोख हा अधिक आक्रमक होता,

“तुम्ही या देशाशी एकनिष्ठ राहिला तर तुमच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची शामत नाही. पण तुम्ही लोक जर येथे राहून भलताच गर्भ मिरवत राहिलात आणि इस्लामचा प्रचार करत राहिलात तर मात्र तुमचे हात तोडून टाकण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.

अशा स्पष्ट शब्दात बाळासाहेबांनी कट्टरपंथीय मुसलमानांना इशारा दिला होता.

जे दुर्गाडी किल्ल्यावर झालं तेच पुन्हा कोकणात घडलं…

जिंतूर गाडीच्या किल्ल्यावर घडलं तेच पुढे दोन वर्षांनी झालेल्या ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या कोकण दौऱ्याच्या वेळी घडलं. दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरावरून दोन समाजात ज्या प्रकारचा वाद निर्माण झाला होता तसाच वाद महाड जवळच्या ‘महिकावतीच्या’ मंदिरावरून उद्भवला होता.

महाड येथे तोपर्यंत शिवसेनेची साधी शाखा ही नव्हती. कुलाबा जिल्ह्यातील शिवसेनेची एक नवीन शाखा पनवेलमध्ये 1967 साली स्थापन झाली होती. ठाकरे यांच्या कोकण दौर्‍यापूर्वी महाडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आणि अखेर एक 11 सप्टेंबर 1969 रोजी सुमारे शंभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाडमधील शिवसेना शाखेचे रीतसर उद्घाटन झालं.

पनवेल मधील शाखाप्रमुख माधव भिडे त्यासाठी जातीने महाडला आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थानिक पुढारी अनंत महादेव शहा होते. या बैठकीतील भिडे यांच्या भाषणाचा वृत्तांत पुढीलप्रमाणे होता,

आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने हिंदू धर्माचा विचार केलेला नव्हता. महिकावती देवीचे मंदिर तोडून टाकण्यात आले आणि मूर्ती पळवून नेण्यात आली तरीही मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा विचार कोणाच्या मनात आला नव्हता. उलट हे मंदिर म्हणजे एक मशीद आहे असाच प्रचार मुसलमानांनी सुरू केला आहे हे सारं काय चाललं आहे तुम्ही सर्वांनी एक होऊन मंदिर पुन्हा बांधला पाहिजे आणि तिथे देवीची प्रतिष्ठापना करायला हवी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेवढ्यासाठी येत असून, आपण त्यांना शक्य ती सर्व मदत करायला हवी”.

त्यापूर्वी 2 नोव्हेंबर 1969 रोजी मुंबईत चौपाटीवर झालेल्या सभेत बाळासाहेबांनी हिंदू धर्मियांवर अन्याय आणि मुस्लीमांची वाढती गुंडगिरी यावर अत्यंत कडवटपणे हल्ला चढवला होता.

“कल्याण जवळच्या दुर्गाडी किल्ल्यावरील देवी जशी मी हिंदूंना परत मिळवून दिली तसेच हे महिकावतीची मंदिरही मी पुन्हा हिंदूंच्या हवाली करणार आहे. मी स्वतः तिथे नारळ फोडणार असून कोणी माझ्या आड येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोक्यावर मी तो नारळ फोडीन “, हे बाळासाहेबांचे  त्या सभेतील शब्द होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे मुंबई तसेच पेण-पनवेल-महाड पट्ट्यात एकच खळबळ उडाली आणि आता त्यांच्या कोकण दौऱ्याच्या वेळी नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.  पण सेनाप्रमुखांच्या कोकण दौऱ्याच्या तारखा वारंवार बदलल्या जात होत्या आणि  रायगड जिल्ह्यातला तणाव वाढतच चालला होता.

अखेर 17 जानेवारी 1970 रोजी मोटर गाड्यांचा भलामोठा ताफा घेऊन ठाकरे महाडमध्ये आले. मंदिराचा भगडा भग्नावशेषावर त्यांनी भगवा ध्वज फडकवला आणि नारळ फोडला. त्यावेळी डॉ. बाबुराव मेहता भारतीय कामगार सेनेचे पहिले सरचिटणीस, हि महाडचे नगराध्यक्ष होते त्यांच्या घरी चहापान करून बाळासाहेब ठाकरे पुढे रवाना झाले होते.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.