हे आहे जगातलं सगळ्यात महाग मटण, घेताय काय?

आहा राडा राडा.. जेवणाच्या वेळेत काय विषय घेवून आल्यात. सगळ्यात महाग मटण.

काढा स्कॉर्पिओ भावड्यांनो. मटाण काय कधीपण खायला तयार असतो आपण.

ह्या एकट्या मर्दानं सरपंच थाळी संपवल्या. 

भावड्यांनो जरा कळ काढा. शांत घ्या, थंड डोक्यानं वाचा. सगळ्याच गोष्टी स्कॉर्पिओ काढून सुटत नसतात. कसय हे जगातलं सगळ्यात महाग मटण आहे. पुण्यातलं, औंरगाबादमधलं नायतर कोल्हापूरात मिळत नसतय.

तर ह्या जगातल्या सगळ्यात महाग मटणाची किंमत किती असेल..? 

शक्यच नाय अंदाज लावणं, माहिताय आम्हाला. तर या मटणाची किंमत आहे तीन ते सव्वातीन लाख रुपये. बर तीन ते सव्वातीन लाख रुपये किलो. फक्त एक लेगपीस. आणि त्यातपण इंटरेस्टिंग गोष्ट अशीय की, हे मटण असतय डुक्कराच. 

आगआयआय गं. डुक्कराचं, 

तो पण लेगपीस आणि तो पण साडेतीन लाखाला. भावड्यांनो घेतली का स्कॉर्पिओ मागं. घ्यायलाच पाहीजे. आत्ता शांतपणे वाचायच आणि हो फक्त वाचायचं आणि हो हे वाचून डुक्कर पाळायचां स्टार्टअप प्लॅन आखायचा नाही. हि डुक्कर भारतात जगणार नाहीत. 

जगात सात खंड आहेत. यातला युरोप जरा जास्तच फेमस आहे. या युरोपातल्या दक्षिण भागात पोर्तुगाल आणि या स्पेनमध्ये तयार होणार मटण जगात सगळ्यात महाग मटण म्हणून ओळखलं जातं. 

स्पेन देशात एक भाग आहे. स्पेनचा कोकण म्हणून जाबुगो हा भाग ओळखला जातो. तर या स्थानिक भागातली डुक्करांची जास्त अतिशय रुचकर आहे अस खवय्ये सांगतात. विशेष म्हणजे, एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल किंवा कोल्हापूरी तांबडा पांढरा अशी कोणतिही जाहिरातबाजी न करता ते हे मटण रुचकर आहे असं सांगतात. 

पण सगळ्यात महाग लेगपीसची काय भानगड? 

तर मॅटर असा आहे की इतर मटण असतय तसच हे मटण असतय विशेष काही नाही. डुक्कर कापलं कि गाव गोळा होतं आणि फडशा पाडतं. पण पण पण लेग पीस कोणी खात नाही. लेग पीस खास साठवून ठेवण्यात येतं. किती वर्ष तर तब्बल सात वर्ष. 

काय करतात डुक्कर कापलं की त्याचे लेगपीस घेतात. ती महिनाभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात. त्यानंतर तीन महिने उन्हाला टांगतात. चांगल खरपूस सुकलं की आपल्या तहखाना टाईप जागा असते. जिथं प्रकाश वगैरे काही येत नाही. एकदम सुख्खा भाग असल्यानं बुरशी वगैरे असला मॅटर नसतो. तर अशा ठिकाणी पाच ते सात वर्ष लेगपीस ठेवला जातो. पाच सात वर्षांनी तो लेगपीस बाहेर काढला की त्याची किंमत असते तीन ते साडेतीन लाख रुपये. 

हाण की बडीव केपा उडीव. मग काय नुसता पैसा. 

तस काही नसतय. हा प्रकार काय तांबडा पांढरा करुन, गाव गोळा करुन, काळा मसाला टाकून वगैरे करत नाहीत. मस्तपैकी फ्राय करुन एक एक स्लाईस करुन अगदी चवीन हे मटण खाल्ल जातं. तुम्हाला नाद असला तर स्पेनमध्ये जावून खावू शकता.

नायतर हायचं आपला तांबडा, पांढरा, नायतर अस्सल काळा मराठवाड्याचा मसाला. तीन लाखात पोत्यानं बोकडं आणि ट्रकानं कोंबड्या होवुदे राडा. 

हे हि वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.