BBC च्या एका चुकीमुळे 1971 च्या युद्धात भारताचा विजय सोप्पा झाला होता. 

1971 च युद्ध आठवलं की आठवतो तो भारतीय सैन्याचा पराक्रम. या युद्धामुळे पुर्व आणि पश्चिम पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. या युद्धामुळे बांग्लादेश नावाचे नवीन राष्ट्र निर्माण झाले, या विजयाच्या अनेक कथा आहेत. आजच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मिडीयाद्वारे केलं जाणारं वार्तांकन चूक की बरोबर याच्या चर्चा होत असताना असाच एक किस्सा बोलभिडू वाचकांना सांगू वाटतो.

हा किस्सा आहे 1971 च्या युद्धावेळी BBC ने केलेल्या एका चुकिच्या बातमीचा. पण या चुकीचा फायदा मात्र भारताला झाला होता. 

1971 च्या युद्धातील वॉर हिरोंपैकी एक महत्वाच नाव म्हणजे मेजर जनरल lan Cardozo. मेजर जनरल lan cardozo यांनी बांग्लादेशच्या निमिर्तीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती अस सांगितल जात, त्यांनीच एका कार्यक्रमात या गोष्टीचा उल्लेख केला होता.  

निमित्त होतं 1971 च्या युद्घाचे दुसरे हिरो सेंट्रल कमांड हेड लेफ्टनंट जनरल एफएन बिलिमोरिया यांच्या लेफ्टनेंट जनरल बिलिमोरिया : हिज लाईफ एन्ड टाईम्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं.    

2016 साली झालेल्या या पुस्तक समारंभावेळी ते म्हणाले होते की, 

BBC ला आम्ही धन्यवाद देतो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे युद्धाच वार्तांकन केलं होतं. आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून आम्ही BBC च्या वार्ताहरांना आमच्यासोबत येण्याची परवानगी दिली होती. BBC चे हे वार्ताहर आमच्या बटालियन सोबतच असत व प्रत्यक्ष युद्धीभूमीवर सुरू असणाऱ्या परस्थितीचे बातम्या सांगत. पण या दरम्यान  त्याच्याकडून एक चुक झाली. त्या चुकीमुळेच भारताला या युद्धात सर्वात मोठं यश संपादन करता आलं.

Cardozo युद्धादरम्यान 5 गोरखा रायफल्स बटालियनचे मेजर होते. त्यांच्या या बटालियम मध्ये ७५० सैनिक सामिल झाले होते. या बटालियनला सिलहेत जवळील अटग्राम वर ताबा मिळवण्याचे ऑपरेशन सोपवण्यात आले होते. 

याच दरम्यान बटालियनकडे खाद्य व इतर साधनसामग्रीची कमतरता होती. या परस्थितीत देखील 5 गोरखा रायफल्स बटालिनने पाकिस्तानच्या तीन ब्रिगेडियर, एक कर्नल, १०७ अधिकारीसह ७००० सैनिकांचे आत्मसर्पण घडवून आणले होते. 

lan Cardozo म्हणाले होते की,

युद्धादरम्यान झालेल्या त्या चुकीच्या बातमीच्या प्रसारणाचा फायदा घ्यायच आम्ही ठरवलं. झालं अस की BBC मार्फत भारताची “ब्रिगेड” सिलहेत येथे उतरल्याची बातमी सांगण्यात आली. वास्तविक 750 सैनिकांच्या बटालियनचा उल्लेख ब्रिगेड करण्यात आला. याच चुकीचा फायदा घेवून Lan Cardozo यांनी छोट्या छोट्या लढाई करून युद्ध जिंकण्याची योजना बनवली. कारण पाकिस्तान सैन्यासाठी देखील बातमीचा प्रमुख स्त्रोत हा BBC होेता. lan Cardozo यांना माहित होतं की या भागात पाकिस्तानची ब्रिगेड आहे. त्यांची संख्या देखील मोठ्ठी आहे. 

मात्र BBC वर भारतीय ब्रिगेड अशी बातमी प्रसारित झाल्यानंतर पाकिस्तानच्या ब्रिगेडसमोर अशी परस्थिती निर्माण केली की भितीमुळे त्यांना आत्मसमर्पण करावे लागेल. याचा फायदा म्हणजे १५ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या ब्रिगेडने 5 गोरखा राईफल्ससमोर आत्मसमर्पण केले. 

युद्धा दरम्यान मेजर जनरल यांना आपला एक पाय गमवावा लागला. त्यांचे शौर्य आणि चलाखीमुळे त्यांना अती विशिष्ट सेवा मेडल आणि सेना मेडल देवून सन्मानित करण्यात आले. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.