उठा भिडूंनो कामाला लागा : कोरोनामध्ये हे सहा बिझनेस आपण करू शकता.

हाताला काम नाही. कोरोनामुळे सगळं संपल्यात जमा आहे. परवड चाल्लेय, काय करू. बोलभिडूच्या मेलआयडीवर हा मॅसेज आला. सभ्य भाषेत सांगायचं तर सगळ्यांचीच फाटलेय. काय करायचं समजत नाही. आत्मनिर्भरचा जप केल्यानंतर पैसे मिळतील का? तर नाही.

पण कायतर धंदा शोधला पाहीजे हे नक्की.

आत्ता इथं दोन शक्यता आहेत. पहिली म्हणजे तुम्ही फक्त कोरोना आहे म्हणून थोड्या काळासाठी नवा बिझनेस शोधत असला किंवा लॉगटर्मसाठी विचार करत असाल. पहिली शक्यता आपण बासनात गुंडाळुया.

कारण आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही एखादी चांगली कल्पना घेवून मार्केटमध्ये उतरला, निष्ठेने धंदा केला तर तुमच्यासारखा बिझनेसमॅन कोणी नसणार आहे.

सध्या मार्केटची गरज, कोणत्या व्यवसायांना भविष्य असणार आहे याबाबत अनेक पत्रकार, व्यावसायिक, उद्योजक यांच्यासोबत बोलून आम्ही हे पाच व्यवसाय निवडले आहेत.

तुमच्या डोक्यात जरी अजून वेगळ्या कल्पना असतील तर अवश्य कमेंट करुन सांगा.

१) दूध पुरवठा.

मोठ्या शहरापासून तालुका पातळीपर्यन्त अनेक घरात पाकीटातले दूध येते. आत्ता विचार करा तुम्ही एक सोसायटी पकडली. या सोसायटीत घरपोच दूध देण्याची व्यवस्था केली तर. आत्ता तुम्ही म्हणाल हे तर चालूच आहे. पण आत्ता पिशवीतून दूध घेणं लोकांना धोक्याचं वाटू लागलं आहे.

याव ऐवजी तुम्ही दूधाच्या बाटल्यांचा वापर करु शकता. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र बाटल्या देवून त्यावर मार्किंग करणं महत्वाचं ठरेल. असं केलं तर त्या घरासाठी असणाऱ्या त्याच बाटलीतून त्यांना दूध मिळेलं. इथं पुरेशा सुरेक्षेची काळजी तुम्ही पटवून देवू शकलात तर एक चांगल बिझनेस मॉडेल उभा राहू शकेल.

२) फरशी बसवण्यापासून हातगाडीपर्यन्त.

बरेच परप्रांतिय कामगार आपआपल्या राज्यात गेले. सर्व काही स्थिर होवून ते पुन्हा येण्यासाठी किमान दिवाळी जाईल अस लोकं सांगतात. प्रत्येक कामात एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती.

उदाहरण फरशी बसवणारे फक्त राजस्थानी कामगार असत. तुम्ही ही मक्तेदारी मोडून काढू शकता.

योग्य वेळेत योग्य पैशात काम करणं हे एकमेव तत्व बाळगून पडेल ते काम करण्याची तयारी ठेवा. स्थानिक लोकांना काम करण्याची हीच संधी आहेत. या काळात आपले गिऱ्हाईक परमनंट होवू शकतात. डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवून काम करा, येणारे दिवस आपलेच असतील.

३) मेडिकल साधने.

मेडिकल साधनांचा पुरवठा हा पुढील वर्षभर कायम राहिलं अस लोक सांगतात. मास्क ही फक्त तात्पुरती गरज नसुन इथून पुढे लोक याचा कायम वापर करतील असं मार्केटमधील तज्ञ लोक सांगत आहेत.

पतंप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, पुर्वी भारतात PPE किट तयार होत नव्हते पण आज २ लाख PPE किट तयार होत आहेत. स्थानिक उदाहरण द्यायचं झालं तर एकट्या सांगली, कोल्हापूरातून आज दिवसागणिक ३० हजार PPE किट तयार केले जात आहे. यासाठीच्या परवागण्या देखील शिथील करण्यात आल्या आहेत.

तुम्ही याच बिझनेस मॉडेल करु शकता. लक्षात असुद्या आजही मास्क सारख्या गोष्टीत कोणताही मोठ्ठा ब्रॅण्ड नाही. कालांतराने लोकांना मास्क देखील ब्रॅण्डेड हवा असणार.

४) भाजीपाला पोहचवणे.

कोरोना काळात झालेली चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी स्वत: मार्केटमध्ये उतरून आपला माल विकू लागला. मध्यस्थाची गरज उरली नाही. मुंबईसारख्या शहरात हातगाडीवर भाजी घेवून दारोदारी विकणे ही गोष्ट भैय्या लोकांनी काबीज केली होती. ग्रामीण भागात व्यापारी नावाची एक स्वतंत्र रचना होती. पण कलिंगड, टरबूज, आंबे आणि भाजीपाला अशा कित्येक गोष्टी शेतकऱ्यांनी स्वत: गाडीत भरल्या आणि विकण्यास सुरवात केली.

या गोष्टीला संघटित स्वरून देवून बिझनेस उभारला जावू शकतो. तुम्ही शेतकरी असला तर हीच वेळ आहे. सोसायटी पकडून आपल्या मालासाठी हमखास ग्राहक शोधून ठेवू शकता. घरपोच माल पोहचवण्याची सिस्टीम उभा करून शकता.

५) घरपोच वस्तु पुरवणे.

काही महिन्यापुर्वी  ॲमेझॉन पासून ते फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या तोट्यात असल्याची चर्चा ऐकण्यात येत होती. बिग बिलीयन डे सारख्या भरखोस घोषणा करुन या कंपन्या मोठी सवलत देत असत. पण आज तुम्हाला अशा सवलती मार्केटमध्ये दिसून येणार नाहीत. कारण पैसे छापण्याची हीच वेळ असल्याचं या कंपन्याच्या चांगलच लक्षात आलं आहे.

तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तरी आपल्या वस्तू घरपोच पोहचवण्याची सुविधा निर्माण करा. आजही बरेच लोक इंटरनेट साक्षर नसल्याने ऑनलाईन खरेदी करुन शकत नाहीत. ऑनलाईन खरेदीच्या मर्यादा समजून आपला कोणताही उद्योग असो तो ऑनलाईन पासून फोन असा सुरू ठेवा.

फोन केल्यानंतर वस्तू काही काळात घरपोच मिळते ही गोष्ट स्थानिक मार्केट वर येण्यास फायद्याची ठरू शकते. विचार करुन बिझनेस मॉडेल उभा करा. नक्कीच फायदा होईल.

६) चाईन प्रॉडक्टना उत्तर. 

आपल्याकडे स्थानिक बाजारपेठ मोठी आहे. या बाजारपेठाचा फायदा चीन सारख्या राष्ट्रांना होत असतो. उदाहरण म्हणजे दिवाळीत आपल्याकडे आकाशकंदील देखील चायनिझ असतात. लहान मुलांच्या खेळण्यांपासून चे शोभेच्या अनेक गोष्टी चायनावरून मागवल्या जातात.

चायनावरून मागवण्यात येणाऱ्या गोष्टी व तुमच्या स्थानिक बाजारपेठेची गरज याचा व्यवस्थित अभ्यास करा. या वेगवेगळ्या वस्तूंपैकी योग्य वस्तू निवडून त्याच प्रोडक्शन करण्यास सुरवात करा.

लक्षात असूद्या आज ना उद्या पुन्हा या चायनिझ वस्तू मार्केटमध्ये येणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी असल्याप्रमाणेच किंमत ठरवा. तज्ञांचा सल्ला घ्या आणि या क्षेत्रात उडी मारा. 

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.