ईशान्य भारतातील खेळाडूंना पदक मिळतात त्यामागे मेहनत आहे बॉस…

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने रौप्य पदक मिळवून दिले. त्यांतर चानूचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या ऑलिम्पिक मध्ये भारताचे ११९ खेळाडू सहभागी झाले आहेत. यात ईशान्य भारतातील ५ खेळाडूंचा समावेश आहे.

मात्र मागच्या काही वर्षातील कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ईशान्य भारतातून येणाऱ्या खेळाडूने विशेष यश मिळविल्याचे पाहायला मिळते. पण त्यामागे मेहनत आहे बॉस.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालंड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यांना सेवन सिस्टर म्हणून ओळखले जाते. भारताच्या एकून लोकसंखेचा विचार केला तर केवळ ३.७ टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते.

२०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक मध्ये पाठविण्यात आलेल्या एकून खेळाडूंचा विचार केला ईशान्य राज्यातील ७ टक्के खेळाडू समावेश होता. हेच प्रमाण २०१२ मध्ये झालेय ऑलिम्पिक मध्ये ११ टक्के होते.

फुटबॉल, वेटलिफ्टिंग, आर्चरी, ज्युडो, बॉक्सिंग, तलवारबाजी आणि हॉकी या खेळांमध्ये ईशान्य भारतातील राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  कामगिरी बजावत भारताला अनेक पदके मिळवून दिले आहेत.

नेमकी काय कारणे आहेत ज्या मुळे भारताच्या इतर राज्यातील खेळाडू पेक्षा ईशान्य राज्यातील खेळाडू चांगले प्रदर्शन करतात. त्यांना कुठल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.  

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविणारे ईशान्य राज्यातील प्रमुख खेळाडू

कुंजाराणी देवीने वेटलिफ्टिंग मध्ये ५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून ३ सुवर्णपदक जिंकले आहेत. आसाम मधून येणाऱ्या बॉक्सर शिव थापा ला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेले आहे.

आसाम मधून येणाऱ्या जयंत तालुकदार यांनी २००६ मध्ये आर्चरीच्या वर्ल्ड कप मध्ये सुवर्णपदक जिंकेल आहे. एशियन गेम्स मध्ये आता पर्यंत २ वेळा कास्यपदक मिळविले आहे.

एल. सरिता देवी हिने २००९ मध्ये बॉक्सिंग विश्व विजेती ठरली होती. तर २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य पदक मिळाले आहे.

२०१२ मध्ये झालेल्या लंडन मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमला बॉक्सिंग मध्ये कास्य पदक मिळाले होते.

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कप्तान बायचिंग भुतियाने मोठी मजल मारली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय लीग मध्ये तो खेळला आहे.

२०१४ नंतर निधी वाढवला

ईशान्येकडील राज्यांसाठी क्रीडा मंत्रालयाकडून निधीच्या वाटपात काही प्रमाणात वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळते. २०१७ च्या अर्थसंकल्पात ईशान्यकडेल राज्यासाठी १४८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. तर त्यांच्या मागच्या वर्षी १३१.३३ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

२०१४ नंतर आलेल्या भाजप सरकारने ईशान्य राज्यातील हिमालयीन क्रीडा स्पर्धा वाढविण्यासाठी हिमालयीन प्रदेश क्रीडा महोत्सवावाचे आयोजन सुरु केले आहे.

ईशान्य राज्यातील प्रशिक्षण केंद्रे

इतर राज्यातील नागरिकांच्या तुलनेत ईशान्य भारतातील नागरिक खेळाबाबत जागरूक असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्यातील खेळाप्रती असलेली भावना लक्षात घेता मागच्या काही वर्षात त्या राज्यांमध्ये सराव, प्रशिक्षणासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.

  •  २०१६ मध्ये केलेल्या एका अभ्यासात आसाम, मणिपूर राज्यात अनेक ठिकाणी सिंथेटिक ट्रक असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे खेळाडूंना सराव करणे सोपे जाते. 
  • २०१७ पासून भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या विविध योजनाच्या अंतर्गत ईशान्य राज्यातील १४ हजार खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात १० हजार मुले तर ४ हजार मुलींचा समावेश आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या  केंद्रात ईशान्य भारतातील मणिपूर, मेघालय, मिझोरम, सिक्कीम आणि त्रिपुरा राज्यातून येणाऱ्या तरुणींना २७ खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा या केंद्रान मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या वतीने देशभरात १४ रिजन फुटबॉल अकॅडमी चालविण्यात येते. त्यातील एकअकॅडमी इंफाळ येथे आहे. यात हजारो तरुणांना प्रशिक्षण देण्यात येते. पुढील काही दिवसात गुवाहाटी येथे आर्चरी अकॅडमी सुरु करण्यात येणार आहे.
  • मेरी कोम सारख्या खेळाडूंनी यश मिळविल्या नंतर आपल्या भागात प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहेत. ज्यामुळे नवीन खेळाडूंना त्याचा फायदा होतो.
  • मणिपूर हे खेळासाठी पावरहाउस राहिला आहे. त्यात १९९९ मध्ये इम्फाल नॅशनल खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक खेळाडूंना एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले आहेत. मणिपूर मध्ये यओशंग फेस्टिवल भरविण्यात येतो. यात मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी होत असतात.
  • तत्कालीन क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी या वर्षाच्या सुरुवातील खेलो इंडिया अंतर्गत देश भरात ९ स्पोर्ट्स स्कूल सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. यातील आसाम येथे एक स्पोर्ट्स सुरु करण्यात आले आहेत. त्यात खेळाडूंच्या राहण्याची, सरावाची आणि प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असं सांगण्यात येत की,  खेळाला मिळणाऱ्या महत्वामुळे  ईशान्य भारतातील अनेक तरुणाचा कल  असल्याचे सांगण्यात येते.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.