शशी थरूर यांचं काँग्रेस अध्यक्षपदासाठी उभं राहणं गांधी परिवाराला अडचणीचं ठरणार आहे

”सोनिया गांधी यांची मी भेट घेतली आहे. त्यांनी मला काँग्रेस अध्यक्षपदासाठी उभं राहण्यासाठी परवानगी दिली आहे. ”

अशी माहिती शशी थरूर यांनी काल मीडियाशी बोलताना दिली. यामुळे दोन गोष्टी फिक्स झाल्या एक म्हणजे शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील आणि दुसरं म्हणजे गांधी घराण्याचे ते उमेदवार नसतील. जर ते गांधी घरण्याचे उमेदवार असते तर त्यांना अशी परवानगीची गरज लागली नसती.

त्यामुळे 1978 ते 2022 अशा गेल्या 44 वर्षात काँग्रेस अध्यक्षपदासाठी ही तिसरी निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

यावेळी गांधी घराणं स्वात उभा नं राहता घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या उमेदवाराला तिकीट देईल अशी चर्चा आहे. त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव देखील फायनल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र स्वतः अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदासाठी तितकीशी उत्सुकता नं दाखवता राहुल गांधी यांचंच नाव पुढे केलं आहे.

त्यासाठी राजस्थान काँग्रेस कमिटीने राहुल गांधी यांना अध्यक्ष व्हावं असा ठरवावी पास केला आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनेसुद्धा देखील असाच ठराव पास केला आहे. त्यामुळे राहुल गांधी शेवटच्या वेळी सरप्राईझ एंट्री घेणार का? हे ही पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. त्यातच राहुल गांधी यांनी

जब नाव बीच मझधार में फंस जाए, तो पतवार अपने हाथ में लेनी ही पड़ती है. ” 

अशी आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यामुळे राहुल गांधी काँग्रेसचं अडकलेल्या जहाजाला हातात घेण्याची भाषा तर करत नाहीयेत ना असे तर्क लावले जात आहेत. 

मात्र दुसऱ्या बजायला एवढी खळबळ असताना शशी थरूर मात्र आपली दावेदारी अनेक महिन्यांपासून लावून आहेत, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्यात्त यावी अशी मागणी करण्यासाठी जेव्हा G-२३ नेत्यांचा एक गट झाला होता त्याचाही शशी थरूर भाग होते. त्यामुळे शशी थरूर यांची उमेदवारी काँग्रेसमध्ये गांधी घराण्याच्या स्थानाला धक्का देणारी असू शकते.

यातील पाहिलं कारण असू शकतंय ते म्हणजे 

काँग्रेस नेतृत्व गांधी घराण्याबाहेर जाईल.

1978 ते 2022 गेल्या 44 वर्षात नरसिंह राव दोन वर्ष आणि सिताराम केसरी दोन वर्ष कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले. 44 वर्षांपैकी फक्त 4 वर्षच गांधी घराण्याच्या बाहेर कॉंग्रेसचं अध्यक्षपद जावू शकलं. नरसिंह राव आणि सिताराम केसरी यांची कारकीर्दही गांधी घराण्याला अपेक्षित अशी झाली नव्हती. दोघांनीही पक्षाध्यपद हातात घेतल्यानंतर गांधी घराण्याच्या म्हणण्यानुसार वागण्यास नकार दिला होता. त्यामुळे गांधी घराण्याने काँग्रेस अध्यक्षपद घराच्या बाहेर नेण्याची रिस्क नंतर घेतली नाही. 

२०१९ च्या लोकसभेतील निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपद स्वीकारत अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच राहील याची तजवीज केली होती.

शशी थरूर हे निवडणुकीत जिंकले तर पुन्हा एकदा नेतृत्व गांधी घरण्याबाहेर राहू शकतंय.

1991 नंतर गांधी घराण्याने तीन टर्म सत्तेत येऊनही गांधी घराण्याने कोणतंही मंत्रिपद स्वीकारलेले नव्हतं तरीही पक्षावर त्यांची पकड आहे. त्यामागचं कारण आहे त्यांच्या हातात राहिलेले पक्षअध्यक्षपद. मात्र शशी थरूर यांनी जर विजय मिळवला तर मात्र गांधी घराण्याचं काँग्रेसवरील नियंत्रण कमी होण्याची शक्यता असणार आहे.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे

शशी थरूर गांधी घराण्याचं ऐकूनच पक्ष चालवतील असं नाही

गांधी घराण्याच्या बाहेर जेव्हा जेव्हा पक्षाध्यक्षपद देण्याच्या चर्चा झाल्या. तेव्हा गांधी घराण्याने ते नाव आपल्याच मर्जीतील असल्याच काळजी घेतलं असल्याचं दिसतं. चित्रं केसरी यांचं नावसुद्धा याच कारणासाठी पुढे करण्यात आलं होतं. केंद्रात मंत्रिपदं देतानाही गांधी घराण्याशी निष्ठा हाच निकष लावण्यात आल्याचा आरोपही गांधी घराण्यावर झाला होता.

मात्र शशी थरूर गांधी घरण्याचं ऐकूनच गाडा हाकतील अशी परिस्तिथी नसल्याचे जाणकार सांगतात.
1978 ते 2007 पर्यंत थरूर हे संयुक्त राष्ट्रात अधिकारी होते. 2001 पर्यंत ते कम्युनिकेशन्स आणि पब्लिक इन्फॉर्मेशनसाठी अंडर-सेक्रेटरी जनरलच्या रँकपर्यंत पोहोचले.

2006 मध्ये यू.एन.च्या सेक्रेटरी-जनरल सेक्रटरी पदाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत लढत दिल्यानंतर ते संयुक्त राष्ट्रातून बाहेर पडले होते.

त्यानंतर शशी थरूर हे काँग्रेसच्या माध्यमातून राजकरणात आले. काँग्रेसमध्ये ते गांधी घराण्याच्या निष्ठेपेक्षा संयुक्त राष्ट्रातील त्यांचा अनुभव, त्यांचे वक्तृत्वगुण यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये महत्वाचं स्थान मिळवलं होतं.

तसेच अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभं राहण्याच्या मागे देखील त्यांनी काँग्रेसची अंतर्गत लोकशाही बळकट करण्याचं कारण दिलं आहे. त्यामुळॆ जर त्यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली तर गांधी घराण्याचा शब्दच प्रमाण असेल अशी जी सध्याची सिस्टिम आहे ते शाहशी थरूर यांच्या कार्यकाळात नसेल एवढं नक्की.

पक्षाच्या पडझडीच्या काळात गटबाजी बाहेर येणार 

काँग्रेस सध्या त्यांच्या इतिहासातल्या एका मोठ्या बॅड पॅच मधून जात आहे. २०१४ ते २०२१ या काळात काँग्रेसने सर्वाधिक आमदार आणि खासदार गमावले. 2014 ते 2021 पर्यंत 177 आणि या वर्षीच्या  गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी 20 आमदार काँग्रेसने गमावले आहेत. अनके राज्यात काँग्रेस जवळपास शून्यावर येऊ ठेपली आहे.

अशावेळी पक्षाला एकसंध ठेवणाऱ्या नेतृत्वाची गरज असणार आहे. जे इतक्या दिवस गांधी घराण्याने करून दाखवलं आहे. मात्र हेच काम शशी थरूर यांना जमेल का याबाबत शंका आहे. विशेषतः उत्तरेतील नेते किंवा गांधी घराण्याशी निष्ठा ठेवणारे नेते थरूर यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता कमी असल्याचं जाणकार सांगतात.

त्यातच G-२३ लॉबी देखील स्ट्रॉंग होऊ शकते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली डावलला गेल्याची भावना पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या मनात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत राहुल गांधीं यांची बिनविरोधपणे काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड व्हावी अशी मागणी केली जात होती तेव्हा  G-२३ लॉबीचा भाग असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यास G-२३ गटाकडून गांधी फॅमिली गटावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न देखील केले जाऊ शकतात. 

अजून एक म्हणजे राहुल गांधींच्या यात्रेवरून लक्ष हटेल 

सध्या राहुल गांधींची भारत जोडो ही यात्रा चालू आहे. १५० दिवसांच्या या महत्वकांक्षी यात्रेत राहुल गांधी काँग्रेसला २०२४ च्या निवडणुकीसाठी तयारी करण्याबरोबरच गांधींची काँग्रेसवरील पकड मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

मात्र याच दरम्यान शशी थरूर यांनी उमेदवारी दिल्याने काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणणुकीची रणधुमाळी झाल्यास यात्रेवरील सगळं फोकस या निवडणुकीवर शिफ्ट होऊ शकतोय. पक्षाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न असताना पक्षातील दुफळी या निम्मिताने बाहेर येऊ शकतोय.

त्यातच राहुल गांधी यात्रेच्या १५० दिवसांमधील ६० दिवस साऊथमध्ये असणार आहे. त्यामुळे दक्षिणेत चांगला परफॉर्मन्स करून २०२४ मध्ये भाजपाला उलथवण्याचा त्यांचा प्लॅन असणार आहे. जर शशी थरूर यांच्यामुळे दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद उभा राहिल्यास राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे काँग्रेसने दक्षिणेत निर्माण केलेली पॉझिटिव्ह इमेज धुळीस मिळू शकते. त्यामुळे शशी थरूर यांची उमेदवारी काँग्रेससाठी धोकायदायक असणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

  

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.