केजरीवाल नाही तर गुजरात आणि हिमाचलमध्ये आपचे हे ५ शिलेदार भाजपचं टेन्शन वाढवत आहेत

गेली २२ वर्ष गुजरात मध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित यांचे होम ग्राउंड असणाऱ्या गुजरातची निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही भाजपसाठी महत्वाची ठरणार आहे. देशाचे दोन दिग्गज नेते गुजरात मधून येत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

गुजरात बरोबर हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारीख घोषित झाली आहे. यापूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस आणि भाजप मध्ये सरळ लढत होत होती. मात्र या दोनही राज्यात आप चांगलीच फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळत आहे.

पंजाब मध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आपने आपला मोर्चा गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे वळविला आहे. त्या दृष्टीने जोरदार तयारी सुद्धा सुरु केली आहे. हिमाचल मध्ये तर आपने आपल्या ६८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर गुजरात मध्ये सुद्धा आपने आता पर्यंत ५५ उमेदवारांच्या नावांच्या घोषणा केली आहे.

दिल्ली, पंजाबच्या विजयानंतर आपला राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा म्हणून आप पक्ष आग्रही आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आप जोर लावला आहे. या दोन राज्याच्या निवडणुकांसाठी आपची यंग ब्रिगेट खरी लढाई लढत आहे. तसेच रणनीती ठरविण्याचे खरे काम हे पक्षाचे ५ शिलेदार करत आहे आहेत.

या सगळ्यात पहिला नंबर लागतो तो राघव चड्ढा यांचा

अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या वादानंतर आपचे संस्थापन असणारे एक एक करत बाहेर पडत गेले. त्यात कुमार विश्वास, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश होता. मात्र एक तरुण आपची रणनीती ठरवण्यात सगळ्यांच्या समोर असायचा. तसेच आता त्याची ओळख अरविंद केजरीवाल यांच्या सगळ्यात जवळील व्यक्ती राघव चड्ढा याची ओळख झाली आहे.  

आप पक्षाला पंजाब मध्ये जे यश मिळालं त्यात राघव यांचा महत्वाचा रोल होता. राघव हा ३४ वर्षीय तरुण पेशाने चार्टड अकॉउंटनट आहे. तो सध्या राज्यसभा सदस्य आहे. तसेच चड्ढा हे पंजाबचे मुख्यमंत्री भगवत मान यांच्या सरकारमध्ये सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास यांच्या प्रमाणे राघव चड्ढा हे २०११ मधील इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेतून पुढे आले आहेत.

 गुजरात विधानसभा निवडणुकीची सगळी कमान राघव यांच्या खांद्यावर आहे. गुजरात मध्ये पक्षाची काय रणनीती असायला हवी, कोणाला उमेदवारी द्यायची अशा प्रकारचे महत्वाचे काम राघव करत आहे. पंजाब मध्ये सुद्धा आपने राघव यांच्यावर अशाच प्रकारची जबाबदारी टाकली होती.

पंजाब मध्ये ११७ जागे पैकी ९२ जागेवर आपचे उमेदवार निवडून आले आणि पंजाब मध्ये आपची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे राघव यांचे पक्षातील वजन चांगलेच वाढल्याचे पाहायला मिळते. 

दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे राज्यसभा सदस्य संदीप पाठक यांचा

राघव चड्ढा यांच्या नंतर आप मध्ये तरुण तुर्क म्हणून संदीप पाठक यांचं नाव घेतलं जात. संदीप पाठक हे आयआयटी दिल्लीत प्राध्यापक होते. छत्तीसगड येथील असणाऱ्या पाठक यांना पंजाब मधून राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. पक्षाच्या स्थापनेपासून पाठक सोबत आहे.  

पुढील वर्षी होणाऱ्या छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याचे सांगितलं जात. राघव यांच्या बरोबर पक्षाची रणनीती ठरविण्याची काम पाठक करतात. पंजाब मध्ये केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना राज्यसभा देण्यात आली. 

पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेची सगळी जबाबदारी पाठक यांच्याकडे असते. हिमाचल प्रदेश मधील पक्षाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्याचे काम सुद्धा पाठक यांच्याकडे आहे. 

तिसरा नंबर लागतो तो म्हणजे गोपाल इटालीया यांचा 

गुजरात मधील आपचा चेहरा म्हणून गोपाल इटालीय यांचं नाव समोर येत आहे.  इटालिया गुजरात पोलिस कॉन्स्टेबल होते. त्यानंतर ते महसूल विभागात लिपिक झाले. हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलनात गोपाल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याच वेळी अरविंद केजरीवाल यांच्या लक्षात इटालीय आले. 

२०२० मध्ये गोपाल इटालीय यांनी आप मध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या नावाची परत एकदा चर्चा झाली. सध्या हेच गोपाल अरविंद केजरीवाल यांचे गुजरातमधील पॉइंट मॅन ठरले आहे. गुजरात आपसाठी निधी उभा करणे, पक्षाचे सदस्य वाढविणे, लोकांमध्ये जाऊन प्रचार करण्याचे मुख्य काम इटालीया यांच्याकडे देण्यात आले आहे.   

दिल्लीतून पक्षाच्या वतीने आखलेली रणनीती ग्राउंडवर राबविण्याचे काम इटालीया यांच्याकडे आहे. इटालीया यांच्या नेतृत्वाखाली आपला सुरत महापालिकेत २७ जागा मिळाल्या होत्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या भाष्यानंतर इटालीया यांच्यावर बरीच टिका होत आहे.

इटालीया यांच्यानंतर आपमध्ये इसुदान गढवी यांचे नाव घेतले जाते 

इसुदान गढवी V TV मध्ये संपादक होते. महामंथन या कार्यक्रमामुळे गढवी यांना गुजरात मध्ये चांगलेच ओळखले जाऊ लागले. त्यांनी जून २०२१ मध्ये आप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेच आपचे राष्ट्रीय सह-सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 

गुजरात निवडणुकीपूर्वी गढवी हे आप मध्ये प्रवेश करणार असा कयास २०२० मध्येच मांडण्यात आला होता. कारण त्यांची केजरीवाल यांच्याशी जवळीक वाढत चालली होती. तसेच केजरीवाल यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी गढवी एक आहेत. पत्रकार असल्याने त्यांना राज्याची बरीच माहिती आहे. त्यामुळे तिकिट वाटप, रणनीती ठरविण्यात गढवी हे महत्वाची भूमिका बजावत आहेत.

या सगळ्यात शेवटचं नाव येत ते म्हणजे सुरजित ठाकूर यांचे

सुरजित ठाकूर हे २०१२ पासून आप पक्षात आहेत. मात्र पक्षाच्या मुख्य सर्कल मध्ये ते कधीच नव्हते. मात्र हिमाचल प्रदेश मध्ये पक्ष अडचणीत असतांना पक्षाला सरवाल्यानंतर सुरजित ठाकूरची किंमत पक्षाला समजली.

हिमाचल मध्ये आठ वर्षे पासून आप धुरा संभाळणाऱ्या अनेक नेते भाजप मध्ये गेल्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यातच हिमाचल प्रदेश मध्ये आपचे सगळे मिशन दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन आणि दुर्गेश पाठक यांच्यावर होती. मात्र जैन यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने मे महिन्यात मनी कारवाई केली. त्यानंतर ते अजूनही जेल मध्ये आहे. 

त्यामुळे ठाकूर यांच्यावर हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. ते गेल्या काही वर्षांपासून हिमाचलमधील शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. तरुण आणि ग्रामीण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे. हिमाचल मध्ये ठाकूर वन मॅन आर्मी ची भूमिका निभावत आहे. 

आपचे हे ५ शिलेदार गुजरात आणि हिमाचल मध्ये भाजपाला तगडे आवाहन देत आहेत. 

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.