नुसतं बीएड करून भागत नाही, शिक्षकाच्या नोकरीसाठी ५ कोटींची लाच घेतली आहे

तुम्हाला तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवतोय का? नक्की आठवत असेल, शाळेचा पहिला दिवस कोणीही विसरू शकत नाही. पहिल्या तासाला वर्गशिक्षक सर्व मुलांनां आपलं नाव आणि मोठं होऊन तुम्हाला काय व्हायचं आहे ते सांगा, असं म्हणतात. त्यात ७० टक्के मुलांचं उत्तर आसायचं, सर मला मोठं होऊन तुमच्या सारखं शिक्षक व्हायचं आहे. हेच विद्यार्थी, कधी काळी आपल्या शिक्षाकाला दिलेल्या उत्तराचा आज शोध घेताना दिसतायत. एक तर सरकारची वेगवेगळी धोरणं येत आहेत. त्यामुळे शिक्षक बनण्यासाठी नको त्या गोष्टी केल्या जात आहेत. त्यात भ्रष्ट शिक्षण आधिकारी, शिक्षक होण्याचं स्वप्न दाखवत कोट्यावधी रूपयाचां भ्रष्टाचार करत आहेत.

शिक्षक विभागात नोकरी लावते म्हणून जवळपास ४० जणांना ५ कोटी रूपयांनां फसवण्यात आलं आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनां अटक करण्यात आली आहे. त्यांना का अटक करण्यात आली आहे? आणि  हे संपुर्ण प्रकरण काय आहे? हे आपण पाहू

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे जेरबंद झाल्यानंतर परीक्षा परिषदेचे आयुक्तपद रिक्त होतं. या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार शैलजा दराडे यांच्याकडेच देण्यात आला. शैलेजा दराडे या उपायुक्त पदाचं काम अगोदरच सांभाळत होत्या. तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर तो कार्यभार त्यांनां देण्यात आला आणि तेव्हा पासून त्या काम पाहत होत्या.

जून २०१९ मध्ये पोपट सुखदेव सर्यवंशी या व्यक्तीची भेट दादासाहेब दराडे यांच्यासोबत झाली. दादासाहेब दराडे हे आयुक्त शैलेजा दराडे यांचे भाऊ आहेत. त्यांनी आपली बहिण शैलजा दराडे ही शिक्षण विभागात अधिकारी आसल्याचं त्यांना सांगितलं. मग त्यांनी आपल्या दोन वहिनींना शिक्षक बनवायचं आहे, अशी इच्छा पोपट सुर्यवंशी यांनी बोलून दाखवली. दादासाहेब दराडे यांनी मी तुमच्या दोन्ही वहिनींना नोकरी लावतो म्हणून एक वेळा १२ लाख आणि नंतर १५ लाख असे त्यांच्याकडून २७ लाख रूपये घेतले.

मात्र अनेक दिवस झाले तरी दादासाहेब दराडे यांनी नोकरी लावली नाही, म्हणून  पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी दिलेले पैसे परत मागायला सुरुवात केली, परंतू पैसे देण्यात टाळाटाळ करण्यात आली. त्यांनी वारंवार मागणी करूनही पैसे परत केले नाहीत. सूर्यवंशी यांना आपली फसवणूक झाली असं कळल्यानंतर त्यांनी हडपसर पेलिसात धाव घेतली आणि झालेला सर्व प्रकार त्यांनी हडपसर पोलिसांना सांगितला. सुर्यवंशी यांच्या सांगण्यावरून शैलजा दराडे आणि दादासाहेब दराडे या दोन्ही बहिण भावा विरूध्द या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलेजा दराडे यांनी यूटर्न घेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत शैलजा दराडे यांनी आपल्या भावाचा हा उद्योग असल्याचं सांगितलं. त्यांनी वर्षभर आपला भावाशी आपला काहीही संबंध नाही असं सांगितलं. दादासाहेब दराडे हा आपला सख्खा भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन लोकांना कामे करुन देण्याची आश्वासनं देत आहे. त्यामुळे दादासाहेब दराडे हा माझा  भाऊ असला तरीही कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२० मध्ये शैलजा दराडे यांनी दिली होती.

शैलजा दराडे यांना कशी अटक करण्यात आली आहे?

गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्यावेळी पोलिस तपास सुरू झाला तेव्हा, यामध्ये एकटे सुर्यवंशीच नाही तर अजून ४४ शिक्षकांकडून त्यांना नोकरी लावू म्हणून दराडे यांनी पैसे घेतल्याचं समोर आलं आणि ही रक्कम जवळपास ५ कोटी रूपये किंवा त्यापेक्षाही अधिक आसण्याची शक्यता आहे. काही जणांकडून १२ तर काही जणांकडून १८ लाख अशा स्वरूपात रक्कम घेण्यात आली होती. पोलिस चौकशीत या सगळ्या संदर्भात तथ्य आढळलं. या संदर्भात एक ऑडिओ क्लिपही समोर आली. ज्यात शैलजा दराडे या पैशाची मागणी करत होत्या. त्यानंतर शिक्षक विभागाने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते.

२२ फेब्रुरवारी २०२३ रोजी ज्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता. जो कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर शिक्षण आयुक्त सुरज पांढरे यांनी ७ जुलै २०२३ रोजी राज्य शासनाला या बाबत सविस्तर अहवाल सादर केला. त्यामध्ये दराडे यांनी केलेलं काम गंभीर प्रश्न उपस्थित करणारं आहे, असं सांगण्यात आलं. त्याची दखल घेत राज्य शासनाचे उपसचिव टि.वा. करपते यांनी त्यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले होते. तब्बल पाच महिन्यानंतर शैलजा दराडे यांना २३ जुलैला निलंबित करण्यात आलं आणि आता त्यांनां या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी अटक झालेल्या फक्त शैलजा दराडे या एकमेव नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षण विभागातल्या अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार समोर आळे आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या या शिक्षण आधिकाऱ्यांची, शिक्षण विभागाच्या मार्फत चौकशीही सुरू आहे. पण, हे सर्व प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता शैलजा दराडे यांना झालेल्या शिक्षेमुळे शिक्षण विभागात होत असलेला गोंधळ थांबेल ही अपेक्षा आहे.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.