जन्मठेप म्हणजे फक्त १४ वर्ष तुरुंगवास हे खरं आहे का ?

एखाद्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, कि आपला पहिला समज असतो तो म्हणजे हा आरोपी चार पाच वर्षात सुटेल म्हणजेच तो कैदी काय आयुष्यभर खडी फोडायला गेलेला नाही.

जन्मठेप या शब्दाचा अर्थ जरी जन्मभराची शिक्षा असा असला तरी अनेकदा तस होताना दिसत नाही. त्यामुळेच एक समज आहे तो म्हण्जे जन्मठेपेची शिक्षा ठराविक कालावधीसाठीच असते. या शिक्षे बद्दल अजून एक समज आहे, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्याच्या दिवसाचे मोज माप हे दोन दिवसांचा एक दिवस असे केले जाते. यानुसार जर एखाद्या कैद्यला जर ८ वर्षाचा तुरुंगवास झाला तर त्याची सुटका चारच वर्षात होईल.

तर भिडू हे जे आपले समज आहेत त्याच्या बद्दलच तुम्हाला सांगायचं आहे.

जन्मठेप, म्हणजेच आयुष्यभराचा तुरुंगवास , हा अर्थ पूर्णतः बरोबर आहे. या बाबतीत खुद्द सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्या. के. एस. राधाकृष्णन आणि न्या. मदन बी. लोकुर यांच्या बेंचने या बाबत  स्पष्टीकरण  २०१२ मध्ये दिले होते.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कोणत्याही कैद्याची काही काळाच्या कारावासानंतर सुटका होण्याची सवलत आहे, हि समजूत चुकीची असून जन्मठेप म्हणजे आयुष्यभर तुरुंगवासच असे स्पष्टीकरण देखील या सुनावणीत दिले होते. त्यामुळे भिडू आपला जो समज आहे, की जन्मठेप म्हणजे काही काळासाठीच चक्की पिसिंग तो कायद्यानुसार चुकीचा आहे.

पण मग असे असून देखिल हे कैदी १४ ते २० वर्षांचीच शिक्षा भोगताना का दिसतात ? त्यांना तशी काही सवलत कायद्यात आहे का? असे प्रश्न राहतातच. काळजी करू नका तुम्हाला सगळ सांगायचं ठरवलच आहे त्यामुळे या प्रश्नांची उत्तर पण शोधून काढली आहेत.

तर जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर १४ ते २० वर्षात सुटण्याचा किंवा तुरुंगातून बाहेर पडण्याच्या सवलतीचा कसलाच अधिकार कैद्याला नाही आहे. एकदा शिक्षा झाल्यानंतर त्याला ती शिक्षा आयुष्यभर भोगावीच लागते.

ही सवलत एखद्या कैद्याला मिळते ती सरकारकडून. पण त्यात सुद्धा जन्मठेपेची शिक्षा ‘किमान’ १४ वर्ष भोगावीच लागते. असे कोर्टानेच स्पष्ट केले आहे.

फौजदारी दंडसंहितेच्या कलम ४३२ नुसार, जन्मठेपेच्या कैद्याला शिक्षेत सवलत देण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र, फौजदारी दंडसंहितेच्या ४३३-अ नुसर या सवलतीमुळे त्याची कारावासाची शिक्षा १४ वर्षांपेक्षा कमी करता येत नाही.

हा गैरसमज फक्त आपल्या सारख्या सामन्य लोकांमध्ये होता असे नाही, हा समज थेट कोर्टात देखील होता म्हणून खुद्द सुप्रीम कोर्टाला याचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

जन्मठेपेच्या शिक्षेबाबत अजून एक वाद आहे. एखद्या आरोपीला शिक्षा सुनावली जाते, ती एकाच कारणासाठी ते म्हणजे ती व्यक्ती शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर मुख्य प्रवाहात आली पाहिजे, म्हणजेच त्यांच्यात सुधारणा होऊन चांगल आयुष्य जगता याव म्हणून.

पण मग असं असेल तर जन्मठेपेच्या शिक्षेत आयुष्यभर जेल मध्ये राहिलेल्या कैद्याला, स्वत: सुधारण्याचा हेतूचं कुठे राहतो. हा वाद अनेक वेळा चर्चेचा विषय ठरला आहे.

म्हणूनच प्रत्येक शिक्षेसोबत माफी आणि सूट देण्याची तरतूद देखील  कायद्याने ठेवली आहे. आता सूट आणि माफी यात देखील फरक आहे. कारण माफी म्हणजे त्या आरोपीने केलेल्या गुन्ह्यातून त्याची कायमस्वरूपी मुक्तता करणे, आणि सूट म्हणजे त्या कैद्याला दिलेल्या शिक्षा कमी करणे.

हा अधिकार सरकार कडे असतो. कारण शिक्षा देताच संबंधित कोर्ट “functus officio” होत अर्थात कोर्ट अधिकारहीन होत, म्हणजे कोर्टाकडे त्या शिक्षेत बद्दल करण्याचा कुठला हि अधिकार राहत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा जन्मठेप हि आयुष्यभरासाठीचं असते आणि त्यातून सुटका व्हायची झालीच तर वागण सुधारल पाहिजे नाही तर त्या कैद्याला मरेपर्यंत तुरुंगातच राहावं लागेलं.

हे ही वाचा भिडू.

 

1 Comment
  1. vinayak bhasms says

    One question is there in jail how days count

Leave A Reply

Your email address will not be published.