या पाच गोष्टी सहज मुघलांच्या नावाने खपवल्या जातात. 

इतिहास दोन बाजूचा असतो. हिरो आणि व्हिलन. जिंकणारा कायमच हिरो असतो. त्यासाठी मोठमोठे लेख लिहले जातात. इतिहासात त्याच गुणगाण केलं जात तर हरणाऱ्याचा इतिहास लिहण्याच कष्ट देखील घेतलं जात नाही. घेतलच तर त्याच्या चुकांना ग्लोरिफाय केलं जातं. 

भारतीय इतिहासात पहायचं झालं तर मुघलांचा इतिहास हिरोच्या बाजूनेच लिहलेला आहे. त्यातही गुड मुगल आणि बॅड मुगल म्हणून दोन्ही बाजूने तो रंगवला जातो. ज्या प्रकारे इंग्रज नसते तर भारत कसा असता याची समीकरणं मांडली जातात तशीच मुगल नसते तर भारत कसा असता हे देखील सांगितलं जातं. असो, मुद्दा हा आहे की खरा, खोटा, या बाजूचा, त्या बाजूचा म्हणून जो इतिहास आपल्यापर्यन्त पाजरत राहतो त्यातून सर्वसामान्य ग्रहितकं फिक्स होतात. 

असच भारतात आढळणारी गोष्ट म्हणजे मुघलच्या नावाने खपवण्यात येणाऱ्या गोष्टी इतकच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

१)  मुघल नसते तर बिर्याणी नसती. 

अनेकांच मत अस आहे की बिर्याणी हि मुगलांनी भारतात आणली. पण याला कोणतेही ठोस पुरावा मिळत नाही. बिर्याणी हा मुळ शब्द बिरींज बिरीया असा असून तो पारशी असल्याच सांगण्यात येतं. भारतात बिर्याणी कशी आली हे सांगताना साधारण बाबर ने भारतात बिर्याणी आणल्याच सांगण्यात येत १६ व्या शतकात लिहण्यात आलेल्या आइन ए अकबरी मध्ये बिर्याणी आणि पुलाव यात कोणताच फरक नसल्याचं सांगण्यात येत. दूसरी थेअरी सांगितली जाते ती तैमुरलंगची तर तैमुरलंगच्या स्थानिक इतिहासात कोठेच बिर्याणी सारख्या पदार्थांची समावेश नसल्याचं सांगण्यात येतं. लिज्जी कोलंघम यांच्या मते, मुघलांच्या काळात असणाऱ्या पारशी आचाऱ्यांनी स्थानिक पदार्थ आणि भारतीय मसाले यांच्या मिश्रणातून बिर्याणी या मुळ पदार्थाला चव दिली.

तरिही बिर्याणीचे स्थानिक प्रकार दक्षिण भारतातील काही भाग सोडले तर संपुर्ण भारतात आढळतात. म्हणून बिर्याणी मुघलांनी भारतात आणली याबद्दल ठोस पुरावा नाही. तसेच हा पदार्थ मुळ भारतीय असल्याचच अनेकांच मत आहे. 

२) बाबर भारताच्या प्रेमात पडला होता. 

बऱ्याचदा बाबर भारताच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे तो इथे राहिला अस सांगण्यात येत पण बाबर पुर्णपणे भारताच्या प्रेमात होता का याच उत्तर त्याच्याच तुजूके बाबरी या डायरीत मिळतं. यात बाबर म्हणतो, 

हिंदूस्तान आकर्षित करुन घेणारा आहे पण इथले लोक सुंदर नाहीत. सामाजिक अवस्था पण खूप चांगली आहे अस नाही. तमीज, तहैजीब औंर बडां दिल या तिन्ही गोष्टी हिंदूस्तानमध्ये नाहीत. कला आणि शिल्प यांचे बाबत ज्ञान नाही. चांगले घोडे, मांस, टरबूज, खजूर यापैकी इथे काहीच नाही. बाजारात रोटी मिळत नाही. 

अशा प्रकारे हिंदूस्तान न आवडण्याची अनेक कारणे त्याने आपल्या डायरीत लिहली आहेत. 

३) मुगल नसते तर भारतात वास्तुकला नसती.

मुगल वास्तुकला हि नक्कीच प्रशंसनीय राहिलेली आहे. ताजमहल असो की लाल किल्ला या वास्तू मुगल वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून गणल्या जातात. मात्र या नसत्या तर भारतात वास्तुकलेला आधारच हे मिथक पसरवण्यात येते. अंजठा वेरुळच्या लेण्यापासून सांची स्तुप, खजुराहो मंदिर, दक्षिण भारतातील मंदीरे अशा कित्येक गोष्टी भारतीय शिल्पकलेचा नमुनाच आहे. सो मुगल नसते तर भारतात वास्तुकला विकसितच झाली नसती असं म्हणणं देखील चुकीच ठरतं. 

४) मुगल भारतात पहिला आले आणि नंतर युरोपीयन आले. 

भारताच्या कालिकत बंदरावर वास्को द गामा आला ते साल होतं १४९८. आणि बाबर भारतात आला ते साल होतं १५२६. त्यामुळे युरोपीयन लोकांच्या अगोदर मुगल भारतात आले हा देखील गैरसमज पसरवला जातो. वास्तविक पोर्तुगिज खलाशी भारतात आले त्यानंतर बाबर भारतात आला. 

५) गंगा जमुनी तहजीब आणि उर्दू मुगलांनी आणल्या. 

हे देखील मिथक मुगलांच्या नावावर पसरवलं जातं. जास्त करुन अकबराचा संबध यासोबत जोडला जातो. मात्र सुफी संप्रदाय, उर्दू आणि गंगा जमुनी तहजीब बाबरच्या अगोदरपासून असल्याच स्पष्ट होतं. अमिर खुसरो ने बाबरच्या अडीचशे ते तीनशे वर्षांपुर्वी जिहाले मिस्किन मकुन तगाफुल दुराए नैना बनाए बतिय़ा. लिहून उर्दूस सुरवात केली होती. हिंदू मुस्लीम एकता अकबराच्या काळास वाढीस लागल्याच सांगण्यात येत. तरी निझामुद्दीन औलिया भारतात त्या पुर्वी होवून गेले. त्यांच्या मजारला आजही हिंदू मुस्लीम एकतेच प्रतिक मानण्यात येत. 

अशा काही निवडक गोष्टींच्या पावत्या मुगलांच्या नावाने फाडण्यात येतात. हे खोट असलं तरी मुगलांच भारतीय संस्कृतीतलं स्थान कोणासही नाकारता येणार नाही.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.