मुघल देखील खेळायचे होळी, अशी असायची “ईद-ए-गुलाबी”.

काय म्हणता, मुघल ते पण होळी. मग काय तुम्हाला आत्तापर्यन्त कळलच असेल. बोलभिडू उगीच हवेतल्या गप्पा मारत नाही. आपलं कस असत सगळं डेटा टाकून प्रुव्ह करायचं. तर आत्ता काही लोक म्हणतील, खेळत असतील ब्वा. तर होय. हे ब्वा खरं आहे. मुघल पण होळी खेळायचे.

मुघलांच्या काळात देखील होळी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जात होता. मुघल काळात होली या सणाला ‘ईद-ए-गुलाबी” म्हणून ओळखलं जात होतं.

मुख्यत होळी हा हिंदूचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र आपण इतिहासाची पानं चाळली तर मुघल साम्राज्यात देखील होळीला मोठ्ठं महत्व असल्याचं सांगण्यात येतं.

भारतातल्या अनेक मुसलमान कवींनी आपल्या कवितेत होळीचा उल्लेख केलेला आहे. इतिहासकारांच्या मते मुघल काळात ईद सण जसा साजरा केला जात होता तसाच होळीचा सण साजरा केला जायचा.

अकबरनं जोधाबाई सोबत तर जहांगीरने नूरजहां सोबत खेळलेल्या होळीचं वर्णन इतिहासात सापडतं. तसंच अनेक मुघल पेटींग्समध्ये होळी खेळतांना दाखवलेलं आहे.

मात्र मुघल बादशाहा शहाजंहाच्या वेळी य़ा होळीला, 

ईद-ए-गुलाबी’ या ‘आब-ए-पाशी’ (म्हणजेच रंगाचा सण) म्हणून ओेळखलं जायचं.

मुघलांचा शेवटचा बादशहा बहादुर शाह जफर यांच्या कार्यकाळातली होळी ही प्रसिद्ध आहे. होळीच्या सणावेळी बहादुरशाह जफर मोठी तयारी करायचे. हवेली सजवायचे. गाणे, मैफिल ठेवायचे त्याचा पुरेपुर आनंद घ्यायचे.

ज्याप्रमाणं ईद सण साजरा केला जायचा तसंच होळीलाही यावेळी खुप महत्व होतं. तसंच यावेळी फुलांपासून होळीसाठी रंग बनवण्यात येत होते. त्यामुळे बहादुरशाह जफरला होळीमध्ये चांगलाच इंटरेस्ट होता. त्यांचे मंत्री त्यांना रंग लावायला आवर्जून यायचे असं इतिहासात सापडतं.

एवढंच नाही तर बाहुदरशहा जफर यांनी होळीच्या सणावर एक गीत सुद्धा लिहिलं होतं,

क्यों मोपे मारी रंग की पिचकारी

देख कुंवरजी दूंगी गारी (गाली)

इतिहासकारांच्या म्हणणांप्रमाणे, मुघल बादशहा होळीला महत्व देत होती. होळी खेळतांना त्याच्या वेगळाच अंदाज असायचा ते होळीच्या दिवशी एकमेंकांच्या अंगावर खुलाब पाणी शिंपडायचे भेट म्हणून गुलाब पाण्याच्या बाॅटल द्यायचे.

हिंदू- मु्स्लिम, गरीब-श्रीमंत असे सगळेच या सणांमध्ये सहभागी होऊन आनंद लुटायचे. एकमेंकांना रंग लावायचे.

मुघल काळात होळीला अन्यनसाधारण असं महत्व होतं. १९ व्या शतकापर्यंत हे धुमधडाक्यात चालत होतं. मात्र कालातरांने ते कमी झालं. तरीही भारताच्या अनेक भागात हिंदू आणि मुस्लिम हा सण आनंदाने साजरा करतात.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.