लोकांनी घरात बसावं म्हणून भुतं रस्त्यावर उतरलेत

आता तुम्हाला म्हणून सांगतो, कोरोनाचं लॉकडाऊन रामायण मधल्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच चाललंय. कोव्हीड 19 व्हायरसने सगळ्या जगाचा घरकोंबडा बनवलाय.

त्यात व्हाट्सअप्प वर नेचर इज हिलींग चे मेसेज यायलेत. मुंबईत मोकळ्या रस्त्यावर मोर फिरालेत, कुठं वाघ सिंव्ह तर कुठं घराच्या खिडकीतून हिमालय दिसायला लागलाय.

असच एका गावात रस्त्यावर दोन भुतं दिसली. बघणाऱ्याच्या फाटून तोंडात आल्या. नेचर हिल करता करता रिव्हेंज का घ्यायलंय कळना झालेलं.

नंतर पूर्ण स्टोरी कळाली.

झालंय काय की इंडोनेशिया मधल्या जावा बेटावर केपुह (चू.भु.देणेघेणे) नावाचं गाव आहे. तिथं रात्रीच्या वेळी भुतं रस्त्यावर निवांत बसलेली दिसली. ही भुतं माणसांनी लॉकडाऊन तोडू नयेत म्हणून आलेली.

आता इंडोनेशिया म्हणजे आपला लांबचा नातेवाईकच. तिथं पण हजारो कोरोना पॉजिटीव्ह सापडल्यात

पण काही बेणी असत्यात ज्यांना बाहेर पडायची खाज मिटत नाही.

सुरवातीला केपुह गावातल्या प्रशासनान गांधीगिरी करून सांगितलं, मग गाणी म्हणून सांगितलं. तरी पण लोक ऐकेनात म्हटल्यावर पोलिसांनी काठीला तेल लावून बाहेर पडणाऱ्यांची गाणी वाजवायला चालू केली.

आता पोलीस त्यांना बेदम हाणून हाणून कटाळली. पण हळूच बाहेर पडणाऱ्याची खुमखुमी काय सरत नाही.

आता काय करायचं अस विचार करत बसलेल्या गावचे लीडर Anjar Pancaningtyas( तुमचं तुम्ही तुमच्या जबाबदारीवर नाव वाचा) यांना अशीच एक नादया बाद आयडिया सुचली.

“भुतांना रस्त्यावर बसवायची”

इंडोनेशिया मध्ये एक फेमस भुताची स्टोरी आहे पोकाँग नावाची. ज्यात ममी प्रमाणे पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली भुतं लोकांना त्रास देण्यासाठी फिरत असतात.

pocong2 scaled

प्रशासनाने लोकांच्या या अंधश्रध्देला त्यांच्या सुरक्षिततेसाठी वापरायच ठरवलं.

गावातले दोन उडाणटप्पू भिडू कार्यकर्ते घेतले. एकाच नाव Deri Setyawan तर दुसऱ्याच नाव Septian Febriyanto. त्यांना पांढऱ्या कापडानी गुंडाळल आणि रात्री एका चौकातल्या बेंचवर नेऊन बसवलं.

पोलिसांना पण या भुतांची आधीच माहिती दिली.

नेहमी प्रमाणे रात्री पानबिडी खाऊन पाय मोकळं करायला येणारे गावकरी बेंचवर बसलेली भुतं बघून जबर घाबरले. बाहेर पडायचं बंद झालं. व्हाट्सअप्पवर एकमेकाला खबरदारी घ्यायचे मेसेज गेले.

पण आता हे किती दिवस चालणार. ये पब्लिक है सब जानती है.

त्यांनी शोधून काढलं की आपल्याला उल्लू बनवण्याचा प्रयत्न चालू आहे.

आता त्या भुतांचा उलटा इफेक्ट झालाय. आता लोक्स त्या भुतांना बघायला गर्दी करायलेत. आता काय बोंबलायचं,?

असो भिडूनो तुम्ही कुठं बी बाहेर उडू नका. सोशल डिसटन्स पाळा. तुमची काळजी घ्या म्हणजे गावाची काळजी घेतल्या सारख हाय.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.