वाढदिवसाच्या दिवशीच बीटकॉईनवाल्यांनी ट्विटरचा बाजार उठवला.

बीटकॉईन म्हणजे लफडा असच काहीस गेल्या काही वर्षात होऊन बसलंय. या क्रिप्टो करन्सीचा फुगा एवढा वाढून बसला होता की अमिताभ बच्चनला सुद्धा त्यांनी गंडा घातला होता. काल त्यांचे टार्गेट ठरले ट्विटरवरचे सेलिब्रेटी.

१४० शब्दांसारख्या कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान म्हणजे ट्विटर. जॅक डोर्सीने याची सुरवात २००६ साली केली. १५ जुलै २००६ ला हे टीवटीव पब्लिकसाठी खुल झालं. नेमका हाच काळ होता जगात सोशल मिडियाचं राज्य सुरु होण्याचा.

फेसबुक, whatsapp आणि ट्विटर यांनी तिथून पुढे अक्षरशः धुमाकूळ घातलं. देशोदेशीची सरकारे सुद्धा पाडली.

एरवी फक्त टीव्हीवरच्या इंटरव्ह्यूमध्ये दिसणारे सेलिब्रेटी रोज गुड मॉर्निग सारखे भेटू लागले. कोणत्याही करंट विषयावर त्यांचं मत काय, कुठल्या गॉसिपमध्ये किती सत्यता आहे हे आपल्याला थेट ट्विटरवरून कळू लागलं. कोणताही नेता पक्षातून फुटलाय हे सुद्धा सगळ्यात आधी त्याच ट्विटर प्रोफाईल बघून समजू लागल.

आपली mpsc करणारी दोस्त मंडळी सुद्धा आपल्याला फेसबुकवर असल्यावर चीप आणि ट्विटरवर असल्यावर हुशार समजू लागले.

असल्या गोष्टीपासून दूर असणारे सरकार देखील ट्विटरवर आले. आपले पंतप्रधान थेट यावरून जनतेशी संवाद साधू लागले तर सुरेश प्रभू,सुषमा स्वराज सारख्या कार्यक्षम मंत्र्यांनी ट्विटरवरून लोकांच्या समस्या सोडवल्या.

एवढच काय सोनू सूद सारख्या गड्याने फक्त ट्विटरचा वापर करून अनेक कामगार लॉकडाऊनच्या काळात युपी बिहारला पाठवले  आणि व्हिलनचा हिरो झाला.

एकूण काय तर आपण ट्विटरचे भक्त बनून त्यांना फॉलो करत होतो.

काल ट्विटरचा १४ वा बड्डे होता. आम्ही पण बड्डे विश केलं. आनंद महिंद्रा यांनी कोणाकोणाला मदत केली हे बघून काढल. KRK ची लेटेस्ट कोणा बरोबर भांडणं झाली ते चेक केलं. सगळ मस्त चाललेलं पण रात्री झोपेत एक  ट्विट दिसला, थेट बिल गेट्स यांचा.

“समाजाची परतफेड करण्यास मला प्रत्येकजण सांगत असतो, आता ती वेळ आली आहे. तुम्ही मला बीटकॉईनच्या रुपात 1000 डॉलर् पाठवला, मी तुम्हाला 2000 डॉलर्स परत पाठवीन.”

बिल गेट्स म्हणजे आमच्या साठी साक्षात देव. अहो कोणतीही घराणेशाही नसताना त्याने जगातला श्रीमंत माणूस होऊन दाखवल शिवाय रिटायर झाल्यावर सगळ्या जगाला पैसे दान वाटत फिरत असतोय म्हटल्यावर खरच अस शक्य असणार.

लगेच पाठोपाठ एलोन मस्क, बराक ओबामा यांच्यासारख्या महान लोकांचे ट्विट दिसू लागले. कोरोनाच्या काळात त्यांनी सुरु केलेल्या या क्रांतीकार्याला भारावून जाऊन मदत पाठवणारे लोक पण दिसू लागले. भारतीय वेळेनुसार रात्री ३ च्या सुमारास हे सगळ सुरु होतं.

elon musk 2

काही वेळाने खुद्द ट्विटरचा मेसेज आला कि,

भावानो सध्या ट्विटर हॅक झालेलं आहे. कोणीही कोणालाही पैसे पाठवू नका.

113419740 capture

कधीही हॅक होणार नाही असा गाजावाजा करणाऱ्या अॅप्पलच ट्विटर अकाऊंट सुद्धा गंडल होत मग बाकीच्यांची काय कथा.

कस थांबवायचं या विचाराने खुद्द ट्विटरवाले सुद्धा भंजाळून गेले होते. जवळपास तास दीड तास हा राडा सुरु होता. पण तो पर्यंत लाखो डॉलर्स पाठवले देखील गेले होते. अखेर सगळ्या ब्ल्यू टिकवाल्या ट्विटर युजरचे ट्विट बंद केले गेले आणि ही साथ आटोक्यात आली.

ट्विटर वाल्यांना हा १४ वा वाढदिवस प्रचंड महागात पडलाय हे नक्की. आणि हा बाजार उठवलाय जगातल्या महाचाप्टर समजल्या जाणाऱ्या बीटकॉईनच्या हॅकर्सनी. आता पैसे पाठवणार्या महाभागांना हे पैसे परत कसे मिळतात, ट्विटर काय उपाय करते हे बघणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.