म्हणूनच भारत एक खोज सारखी मालिका पुन्हा निर्माण होऊ शकली नाही… 

निसर्गाच्या आधी सत्य नव्हतं. असत्य नव्हतं. अंतराळ नव्हतं. की आकाश नव्हतं. पण मग लपलेलं होतं काय ? कुणी झाकून ठेवलं होतं पाणी ? जे सुद्धा अदृश होतं.

वरील ओळी ह्या खऱ्या तर ऋग्वेद मधील श्लोकाचं मराठीत रुपांतर आहेत. पण या ओळींची ओळख दोन दशकाआधी तयार झालेल्या भारत एक खोज या मालिकेतून झालेली आहे. त्यावेळी गाजलेलं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मृतीत अलगदपणे बसलेलं आहे.

एकूण ५३ एपिसोडची ही मालिका १९८८ ते १८८९ च्या काळात प्रत्येक रविवारी सकाळी ११ वाजता दूरदर्शनवर चालू व्हायची. त्यावेळी प्रेक्षकांनी या मालिकेला भरपूर प्रतिसाद दिला होता.

‘भारत एक खोज’ या हिंदी मालिकेचं दिग्दर्शन केलेलं आहे, हिंदी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक म्हणजेच ‘श्याम बेनेगल’ यांनी. अंकुर, निशांत, मंथन आणि भूमिका सारख्या अनेक चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी मालिका क्षेत्रात पाऊल ठेवलं.

१९८०-९० च्या दशकात अनेकांच्या घरी टीव्ही येऊन पोहचला होता; पण त्यावर योग्य कार्यक्रम खूप कमी होते. ग्रामीण भागात तर अख्या गावात मिळून एक कुणाकडे तरी टीव्ही असायचा. दिवसभर शेतात घाम गाळून सारं गाव एकत्र जमायचं आणि टिव्ही पाहायचं.

अश्यातच, मनोरंजन क्षेत्राच्या विकसनशील कालखंडात ‘ श्याम बेनेगल ’ यांनी ‘ भारत एक खोज ’ या नावाची नवी मालिका दूरदर्शनवर चालू केली.

अल्पकाळात मालिकालेला ग्रामीण आणि शहरी भागात खूप प्रेक्षक पाहू लागले. त्यावेळी ही मालिका भारताच्या मनोरंजन क्षेत्राला विकसित दिशेने घेऊन जाण्याकरीता अभिमानाची गोष्ट ठरली.

भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर ‘भारत एक खोज’ ही श्याम बेनेगल दिग्दर्शित मालिका आहे.

त्यानंतर आजपर्यंत मनोरंजनाच्या इतिहासात अशी एक ही मालिका पुन्हा निर्माण झाली नाही. जी खऱ्या माहितीचा स्त्रोत बनुन मनोरंजन करत राहील.

१९८० मध्ये भारतात रामायण आणि महाभारत या मालिका प्रचंड गाजत होत्या. कारण दोन्हीही प्रेक्षकांच्या भावनिक नात्याशी जोडलेल्या होत्या. घराघरात या मालिकांनी नातं घट्ट केलं होतं. त्यावेळी भारत सरकारला वाटलं की आता भारताच्या विशाल अशा इतिहासावर का नाही मालिका बनवावी ? कारण देशाचा इतिहास पाहायला सगळ्यांनाच आवडेल. या हेतूने देश इतिहासावर मालिका बनवण्याचं ठरवलं.

या मालिकेची पूर्णपणे जवाबदारी ‘श्याम बेनेगल’ यांच्यावर सोपवली गेली.

त्यांनीही मालिका करण्यास होकार दिला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की देशाच्या सर्व बाजूंनी असलेल्या इतिहासाच्या, कोणत्या तरी एका बाजूवर मी मालिका दिग्दर्शित करावी. त्यांची महाभारत ही मालिका करण्याची खूप इच्छा होती; पण ती त्यावेळी आधीच बी आर चोपडा यांना देण्यात आली होती.

त्यानंतर जेव्हा भारतीय इतिहासावर मालिका बनवण्याची भारत सरकारकडून ऑफर आली, तेव्हा मात्र त्यांनी लगेच होकारार्थी शिक्कामोर्तब केला. त्यात ती मालिका ‘ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ’ या नेहरूंच्या पुस्तकावर असल्याने त्यांचं त्याच्याशी वेगळच नातं होतं.

त्याविषयी श्याम बेनेगल म्हणाले होते की,

‘ डिस्कव्हरी ऑफ इंडिया ’ या पुस्तकासोबत माझं लहानपणीचं नातं आहे. मला हे पुस्तक माझ्या वाढदिवसाला मिळालं होतं. त्यामुळे लहानचं मोठं होताना कितीतरी वेळा वाचून त्याच्याशी माझं नातं घट्ट बनलं होतं. म्हणून ही संधी मी सोडायचीचं नाही, असं ठरविलं होतं.

आजही ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकाकडे भारतीय इतिहासाची प्रस्तावना रुपात पाहिलं जातं.

नेहरूंनी एप्रिल–सप्टेंबर १९४४ मध्ये अहमदनगरच्या जेल मध्ये कैद असताना हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकात त्यांनी ५००० वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास लिहिलेला आहे. या पुस्तकाचा आधार घेऊन श्याम बेनेगल यांनी ‘ भारत एक खोज ’ ही मालिका बनवून छोटया पडद्यावर पाऊल ठेवलं.

कारण मोठया पडद्यावर त्यांनी समांतर विचारांना प्रेरित करणारे अनेक सिनेमे करून स्वतःचं एक नाव केलं होतं. छोटया पडद्यावर कधीतरी काम करण्याची शेवटची इच्छा ही त्यांची ‘ भारत एक खोज ’ या मालिकेच्या मार्गाने पुर्ण झाली. त्यांच्या टीम मध्ये इतिहासाची योग्य प्रकारे साक्ष देणारे १५ इतिहासकार होते. त्यांनी मालिकेच्या प्रत्येक एपिसोडला लेखकांना खूप मार्गदर्शन केलं.

‘ भारत एक खोज ’ या मालिकेचं लेखन अतुल तिवारी, शमा जैदी सारख्या एकूण २५ लेखकांनी केलं.

या मालिकेचं लेखन १९८६ साली सुरु झालं. तब्बल १०,००० पेक्षा जास्त पुस्तकांच्या मदतीने श्याम बेनेगल यांच्या टीमने मालिकेवर काम केलं.

‘भारत एक खोज’ या मालिकेचा पहिला एपिसोड पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर १९८८ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला. प्रत्येक रविवारी ६० ते ९० मिनिटांपर्यंत असलेला एपिसोड रिलीज व्हायचा.

३५० पेक्षा जास्त भारतीय कलाकरांनी काम केलेली ‘ भारत एक खोज ’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

त्यातील अनेक कलाकार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधील होते, जे आज हिंदी चित्रपट सृष्टीत सुपरस्टार झालेले आहेत.

भारत एक खोज या मालिकेत श्याम बेनेगल यांनी नेहरूंच्या पात्राला प्रमुखचं ठेवलं. त्या पात्राची रोशन सेठ यांनी खूप उत्तम प्रकारे भूमिका साकारली. पडद्यावर मी नेहरूजी कसा दिसेल ? यासाठी त्यांनी नेहरुंचा खूप अभ्यास केला.

मालिकेचं सगळं शूटिंग मुंबई फिल्मसिटी मध्ये १४० पेक्षा जास्त लहान मोठया सेटवर करण्यात आलं. मालिका बेनेगल यांनी डॉक्युमेंटरी पद्धतीने साकारली असली तरी त्यात नाटकाला ही स्थान दिलं होतं.

रोशन सेठ, ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, शबाना आजमी, अमरीश पुरी, यांसारख्या अनेक मोठया कलाकरांनी करियर च्या सुरुवातीला या मालिकेत काम केलं आहे. भारत एक खोज ही मालिका टीमच्या प्रामाणिक अथक परिश्रमामुळे यशाच्या शिखरावर पोहचली.

आज TRP चा झालेला उदय आणि मसालेदार मालिकांच्या दूनियेत असणारी कमी मेहनत व झटकन रिझल्ट देण्याच्या विश्वात इतके परिश्रम घेवून मालिका तयार करणे अशक्यच आहे म्हणूनच भारत एक खोज सारखी मालिका पून्हा निर्माण होवू शकली नाही…

  •  भिडू कृष्णा वाळके 

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. रश्मी says

    बोलभिडू…तुमचे लेख कधी कधी खूप रोचक, कधी मनोरंजन करणारे व कधी कधी माहितीपूर्ण असतात…ते आवडतात..पण तो लेख इथे संकेतस्थळावर टाकताना त्यात शुद्धलेखनाच्या प्रचंड व अक्षम्य चुका असतात….लेख इथे टाकताना जरा काळजीपूर्वक तो तपासावा व मगच प्रकाशित करावा….

Leave A Reply

Your email address will not be published.