एकेकाळी भारतभर वट असणाऱ्या या सहा राजघराण्यांचे वंशज आज काय करतात..? 

एक काळ होता जेव्हा भारतात राजा महाराजांचं चालायचं. संपुर्ण भारतात संस्थानेच होती. वेगवेगळ्या शाह्या वगैरे होत्या. नंतर ब्रिटीश आले आणि त्यांनी एकेकाला धरून धरून तैनाती फौजा गिफ्ट दिल्या.

मग काय पुढच्या काळात अशी संस्थाने फक्त ब्रिटीशांचे मांडलीक म्हणूनच उरले. 

पण तुम्हाला वाटेल हे राजे गरिब व होतकरू असतील. तर भावांनो लय लय पैसा आणि खजिना बाळगूण हे राजे महाराजे असायचे. इतका पैसा की त्या काळातल्या तुलनेत ते युरोपातले एक दोन देश तरी सहज विकत घेवू शकले असते. 

पण प्रत्येकाचा काळ सारखा राहत नाही. आत्ता मुघलांच्या वंशजांचच बघा. हे वंशज सध्या कोलकत्त्याच्या एका झोपडीत राहतात. अक्षरश: भांडी घासतात. त्यांच्याकडे बघुन देखील कोणाला पटणार नाही की एकेकाळी हेच मुघल देशभर राडे घालण्यासाठी प्रसिद्ध होते. पुना ओक वाल्यांची माफी मागून सांगतो कोणाला पटणार नाही की यांच्याच आज्याच्या पणज्यांची त्यांच्या आज्यांनी ताजमहाल सारख्या गोष्टी बांधल्या. 

असो तर एकंदरीत भारतात असणाऱ्या तत्कालीन सात राजे महाराजांचे वंशज काय करतात हे सांगण्यासाठी हा लेख आहे. 

१) हैद्राबादचे निझाम. 

हैद्राबादच्या निझामाचे सध्याचे वंशच तुर्कीत राहतात. निझाम उस्मान अली अस त्यांच नाव आहे. आकड्यात सांगायचं झालं तर १७,४९,८०,०७,६०० रुपये इतकी त्यांची संपत्ती असल्याची माहिती २०१२ साली आली होती. तेव्हा जगभरातल्या प्रमुख १० श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना करण्यात आली होती. 

त्यांचा मुलगा मुकर्ररम देखील सध्या तुर्कीत राहतो. तसं निझामाचे वंशज म्हणून १२० जणांची नावे आहेत पण निझामाने आपले वंशज म्हणून आपल्या दोन आकडी मुलांना न घोषीत करता नातींना केलं. पुढे लग्न झाल्याने ते तुर्कस्थानात गेले आणि तुर्कीचे झाले.

मागच्याच वर्षी निझामाने लंडनच्या बॅंकेत ठेवलेल्या ३६० कोटींचा निकाल लागला आणि भारताने ही केस जिंकली. याचा वाटा भारतासह निझामाच्या १२० लोकांमध्ये वाटला जाईल अस सांगण्यात आलं होतं.

थोडक्यात काय तर आजही निझामाचे वंशज आपली शान ए शौकत बाळगूण आहेत. 

2) टिपू सुलतान

टिपू सुलतानाचा पराभव झाला तेव्हा त्याचा खजिना इंग्रजांनी लुटला. कसा तर अस म्हणतात की एकूण सहा बैलगाड्या भरून सोनं घेवून जाण्यात आलं होतं. टिपू सुलतान यांची वंशज पुढे थेट हिटलरच्या मागावर होती. ती स्टोरी तुम्ही इथे क्लिक करुन वाचू शकता. 

टिपूची मोठी मुलगी फातीमा बेगम हिला इंग्रजांनी कलकत्त्याला शिफ्ट केलं. आज त्यांची वंशावळ विस्तारली आहे पण हे सर्व जण झोपडीत राहतात. कोणी रिक्षा चालवतं तर कोणी टेलरचं काम करत. सायकल रिपेरिंग करण्याचा देखील उद्योग आहे. एकंदरीत टिपू सुलतानाच्या वंशजांचा तो थाटमाट राहिला नाही.

3) ओरिसाचे टिगरिया संस्थानचे ब्रजराज महाराज 

टिगरिया संस्थानच्या ब्रजराज महाराजांचा जन्म १९२१ सालचा. १९४३ साली ते राजे झाले. ते जेव्हा राजे झाले तेव्हा त्यांच्याकडे २५ एक कार होत्या. एक मोठा महाल होता. पण ते चर्चेत आले ते २०१५ साली. १ डिसेंबर २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची परिस्थिती हलाखिची असल्याचं सांगण्यात आला.

जूना थाटबाट गेला होता. त्यांची बायको राणी बिलासवती देवी या ओरिसाच्या आमदार होत्या. पण नंतरच्या काळात त्या देखील महाराजांना सोडून गेल्या. एका झोपडीवजा घरातच त्यांचा शेवट झाला. 

खालचा फोटो पहा महाराजांच्या शेवटच्या क्षणाची कल्पना येईल. 

Screenshot 2020 12 02 at 4.19.37 PM

4) त्रावणकोरचे वंशज. 

हं हं तेच ते सातवा दरवाजा उघडला की जग बुडणार वाले. पद्मनाभस्वामीच्या मंदीरातला खजिना वाले. जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि संस्थाने भारतात विलीन करण्यात आली तेव्हा त्रावणकोरचं संस्थान हे निझामानंतरच दोन नंबरचं पैसेवालं संस्थान होतं. 

उथराडोम तिरूनल मार्तंड वर्मा हे शेवटचे प्रमुख. २०११ साली त्यांच निधन झालं. त्यांनी आपली शेवटची इच्छा सांगितलेली की तो देवळातला खजिना सरकारच्या मालकीचा असावा. श्रीमंतांच्या यादीत दोन तीन नंबरला नसलं तरी ते पुरेशी पैसे आणि तितकाच मान सम्मान देखील बाळगूण आहेत. 

5) मुघलांचे वंशज 

मुघलांचे वंशज सध्या कलकत्ता इथे असतात. त्यांच्या घराण्याची जी महिला आहे ती आज भांडी घासते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे वंशज आहेत. याची स्टोरी आपण या पुर्वीच केली होती.

ती अगदी डिटेलमध्ये तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन वाचू शकता. 

6) नवाब वाजिद अली शाह यांचे वंशज 

अवधचा नवाब वाजिद अली शाह. इंग्रज जेव्हा त्याला पकडायला आले तेव्हा स्वत:ची चप्पल त्याला घातला आणि नाही आणि त्यामुळेच तो इंग्रजांना घावला. अत्यंत शान ए शौकत मध्ये तो रहायचा. रोज रात्री पार्ट्या करायचा. 

त्यांचे वंशज मात्र डॉ. कौकब कुदर मिर्झा कलकत्त्यामध्ये साध्या घरात रहायचे. २०२० सालातच कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. हुशार असणारा हा माणूस अलिगढ विद्यापीठात प्राध्यापक होता. 

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. akash malvadkar says

    apl Chatrapati shivaji maharaj yanch nav ka nahiy

  2. शिरीष श्रीधरः मोरे says

    सुंदर माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.