त्यांना कडकडून मिठ्ठी मारून म्हणालो, अरे तुम्ही तर आमचे सन्नाटा…

आज किशोर नांदलस्कर यांच निधन झाल्याची बातमी आली. कोल्हापूरात कुठल्यातरी पिक्चरचं शुटींग होतं. या शुटींगसाठी अभिनेते सयाजी शिंदे कोल्हापूरात होते. तेव्हा मी लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत कोल्हापूरातच होतो. काम आटपून सयाजी सरांना भेटण्यासाठी जायचं अस नियोजन झालेलं.

दिवस उरकला आणि अरविंद जगतापांनी सयाजी सरांना फोन केला. सयाजी सर कोल्हापूरातल्या सयाजी हॉटेलवर मुक्कामाला होते. जगताप सरांच्या सोबतीत सयाजी सरांना भेटण्याचा तो प्लॅन ठरलेला. गाडी हॉटेलच्या दिशेने वळली तेव्हा जगताप सर म्हणाले,

“अरे सयाजी सरांसोबत किशोर नांदलस्कर आहेत…”

खरं सांगू कोण किशोर नांदलस्कर अस माझ्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. सरांना म्हणालो कोण वो?
तेव्हा ते सांगू लागले, अरे ते नाही का सिंघम मध्ये होते…

नाय वो आठवलं…

अरे मुन्नाभाई MBBS मध्ये पण होते, वास्तव मध्ये पण होते बघ…

तरिही नाहीच आठवलं. जगताप सरांनी पण नाद सोडून दिला. सर म्हणाले भेटतील तेव्हा ओळखशील.

हॉटेलमध्ये गेलो. सयाजी सरांच्या रुमच्या दिशेने जाताना फक्त एकच डोक्यात होतं की कोण किशोर नांदलस्कर. इतक्या वेळात गुगल मारायला पाहीजे होतं पण म्हटलं राहूदे. समोर येतील त्यांना ओळख दाखवायची आणि निवांत रहायचं कशाला लोड घ्या…

रुमचा दरवाजा उघडला, सयाजी सरांनी हसत हसत स्वागत केलं. एका कोपऱ्यात पाठमोरे बसलेले ते दिसले. जरा पुढे जावून चेहरा व्यवस्थित बघितला तर जाग्यावरच उडालो. थेट त्यांच्या पायात. अरे हा तर आमचा सन्नाटा….!

चक्क आपण सन्नाटाला भेटणार आहोत हे माहिती असतं तर येईपर्यन्त लय जुळणी केली असती. त्यांच नाव देखील मला माहिती नव्हतं. यात तसा कमीपणा वाटत नाही. सन्नाटा म्हणून हा माणूस जितका आतवर घुसून गेला तितकं कोणी गेलं नव्हतं…

गप्पा रंगल्या, निवडक आणि मोजकं ते बोलत राहिले. बोलता बोलता त्यांनी लिहलेली चिठ्ठी हातावर ठेवली आणि म्हणले हे तुमच्या बोलभिडूवर छाप, मी लिहलय.

पुढचे चार पाच तास सन्नाटा सोबत मी गप्पा मारत होतो. इतक्या मोठ्या माणसाचा ऐकेरी उल्लेख करावा का? असही प्रश्न पडतो. पण सन्नाटाचा चेहरा डोळ्यासमोर आला की भारी वाटतं. ते लय जणांसाठी सन्नाटाच असतील.

खालील लिंकवर क्लिक करुन त्यांनी लिहलेला लेख तुम्ही वाचू शकता…

किशोर नांदलस्कर यांना बोलभिडूमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली….!

  • भिडू सौरभ पाटील

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.