मराठ्यांची धास्ती खाऊन औरंगजेबाने शंभूराजांना कैदेत ठेवण्यासाठी तुळापुरची निवड केली.

सतत बलाढ्य मोगल, तसेच पोर्तुगीज, सिद्दी व इतर शत्रूंशी झुंज देत शंभुराजांनी छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याला जपले, वाढवले !

शंभुराजांच्या स्वराज्याचे वाढते बळ पाहून औरंगजेब हादरला आणि त्याने फितुरांचा मार्ग अवलंबवत त्याने शंभुराजांना कैद केली. त्यांना तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर आणण्यात आले आणि त्यांचे अमानवी हाल-हाल केले.

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्केला आमिष दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि तिथेच घात झाला.

संभाजी महाराज रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे विसाव्यासाठी थांबले होते. त्यांनी सोबतची काही आगाऊ फौज रायगडाला पाठवून दिली आणि थोडेसे सैन्यदल सोबत ठेवून घेतली. अचानक गणोजी ने दाखवलेल्या गुप्त मार्गाद्वारे औरंगजेबाचा सरदार मुकरबखान तीन हजाराची फौज घेऊन संगमेश्वर येथे दाखल झाला. राजे बेसावध असतांना पकडले गेले साथीदार कवी कलश हि पकडले गेले आणि यांना ताबडतोब शेख निजामाने संभाजी महाराज व कलाशांना हत्तीवर बांधून संगमेश्वर सोडले.

कराड-वडूज-दहिवडी-फलटण मार्गे बहादूर गडावर नेऊन औरंगजेबासमोर हजर करण्यात आले.

राजांना साखळीने जखडलेले पाहून औरंगजेबाला जग जिंकल्याचा आनंद झाला.

बहादूर गड म्हणजे ८०० एकर क्षेत्र असलेला मजबूत किल्ला, परंतु तो भुईकोट आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठ्यांना बातमी मिळाली कि, संभाजी महाराजांना बहादूर गडावर कैद केले आहे. औरंगजेब याची धास्ती खाऊन होता कि, जर मराठ्यांना कळले कि संभाजी राजांना येथे कैद केले आहे तर ते गनिमी कावा करून यांना सोडवून नेतील, मराठी फौज म्हणजे प्रचंड डोंगरी किल्ले लढवणारे वीर मावळे आहेत, त्यांच्यासाठी एवढा मोठा बहादूर गड एखाद्या मातीच्या ढेकाळाप्रमाणे  हे तो जाणून होता.

त्यामुळे संभाजीराजांना अज्ञात स्थळी हलवणे गरजेचे झाले.

त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून औरंगजेबाने मोगल सरदारांच्या टोळ्या संपूर्ण बहादूर गडावर तैनात केल्या. आणि त्यात फेब्रुवारी महिना असल्यामुळे गडावर पाणी पुरेनासं झालं, पाण्यावाचून हाल होऊ लागले.

अशातच औरंगजेबाचा विश्वासू सल्लागार रायाराव हा तुळापूर गावचा सुभेदार होता. त्याने औरंगजेबास विनंती केली की या संभाजीस तुळजापूराला हलवा. (तुळापूर जि. पुणे ) आणि त्या ठिकाणचा भीमा इंद्रायणीचे पाणी कधीही आटत नसते त्यामुळे फौजेला ही पुरेशा पाण्याची सोय होईल असा विचार करण्यात आला.

त्या तुळजापूर हा सपाट प्रदेश आहे आणि इथे मराठे हल्ला करू शकत नाहीत, तरीही संभाजीला इथे आणल्या ची खबर गुप्त ठेवावी.

सल्लागाराचा हा सल्ला औरंगजेबाला पटला आणि त्याने तात्काळ राजांना बहादूर गडावरून हलविण्याचा निर्णय घेतला.  त्याला एका गोष्टीचे तथ्य वाटले कि यापूर्वीही शिवाजी राजे आणि संभाजी राजेने त्याला आग्र्याहून सुटले होते म्हणून त्याला पुन्हा तीच चूक करायची नव्हती.

रायाराव ने औरंगजेबाला म्हणाला कि, “फार पूर्वी संभाजीच्या आजोबाने म्हणजेच शहाजी राजांनी आम्हा लोकांना सुरक्षित स्थळी राहण्यासाठी एका गुप्त ठिकाणी २४ वाडे बांधून दिले होते, भीमा-इंद्रायणीच्या संगमावर म्हणजेच तुळापुर या गावी”.

त्यात तुळापुर हे एक हिंदू धर्मासाठी प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. अशा स्थळी औरंगजेब संभाजीला का बरं घेऊन येईल, इतर मुसलमानी गावे असतील कदाचित तिथे नेले असेल. आणि त्यात तुळापुर ला एकही किल्ला किंवा गड नाही त्यामुळे मराठे गोंधळून जातील. त्यात ते वाडे म्हणजे मराठ्यांचेच वास्तव्य त्यामुळे त्यांना या जागेची कल्पना येणार नाही.

छत्रपती संभाजी राजे बहादूर गडावरच कैद असल्याचे समजून ते त्यावर हल्ला करतील. मराठ्यांचा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटला पाहिजे अशा विचारांत रायाराव औरंगजेबाला रणनीती समजावत होता. आणि औरंगजेबाला मनोमन पटली होती. 

परंतु सगळ्यांना दहशत बसावी म्हणून त्याने आणखी एक योजना आखली . ती म्हणजे संभाजी राजांना आणि कवी कालश यांना गडावरून हलवण्याच्या अगोदर त्यांची उंटावरून  विदूषकाचे कपडे चढवून   धिंड काढण्यात आली.

त्यानंतर मुघल फौजेने बहादूरगड ते तुळापुर हे १२० किलोमीटर चे अंतर दोन दिवसात कापले. औरंगजेबाने आपला शाही तळ तुळापुरात ठोकला, आणि सोबत आणलेला तब्बल ५ लाखांचा फौज फाटा तिथे वसवला.

आणि शंभू राजांना त्याच संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात साखळदांडाने बांधून ठेवले ज्या मंदिराचा जीर्णोद्धार शहाजीराजांनी केला होतं

कवी कलश यांनाही शेजारीच बांधण्यात आले. आता संभाजी आपल्या ताब्यात आहे, बाहेर ५ लाखांची फौज पाहारा देत आहे, त्यामुळे सगळं काही माझ्याच मनासारखं होईल अशा समजात औरंगजेब होता.

सह्याद्री जिंकणे आपल्या बापालाही शक्य नाही याची खात्री औरंगजेबाला होती, सह्याद्रीच्या किल्ल्यांची ताकद काय आहे हे तो पुरंदरच्या तहाच्या वेळेसच जाणून होता. त्यावेळेस त्याने सर्व डोंगरी किल्ल्यांचा ताबा मागितला होतं. तेव्हा दुर्गम वाटणाऱ्या फक्त २३ किल्ल्यावरच शिवाजी महाराजांनी बादशहाची बोळवण केली होती. त्यामुळे त्याने तहाद्वारे सह्याद्रीचे दुर्गम किल्ले बादशाहाला द्यावेत, आणि त्या बदल्यात उत्तरेकडील हवा तेवढा मैदानी प्रदेश घ्यावा. अशा प्रकारच्या तहाच्या वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे काय झाले याचा इतिहास आपण जाणून आहोत.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.